मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
हरिणीप्लुता

हरिणीप्लुता

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


हरिणीप्लुता.
विषमीं त्रिसकार ल गा असे ॥ न भ भ र क्रम हा च समीं वसे ॥
विषमीं अकरा चरणीं युता ॥ व्दिदश अक्षर ती हरिणीप्लुता ॥१॥
चरण १ ला, ३ रा - अक्षरें ११. गण - स, स, स, ल, ग.
चरण २ रा, ४था - अक्षरें १२. गण - न, भ, भ, र.
उदाहरण *
मजला गिरिराज कळीव या ॥ वनलतांत न कीं लपली प्रिया ॥
कृश अंग तिचें अति निर्मळ ॥ प्रिय निरंतर भाषण कोमळ ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP