मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
हरिणी

हरिणी

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


हरिणी. य० ६,४,७.
म्हणति हरिणी त्या वृत्ताला पशूंत जशी रुरुं ॥
न स म र स हे आधी येती पुढेंच लघू गुरु ॥
प्रति चरणिंही येती सत्रा समानचि अक्षरें ॥
शरण गुरुच्या पाया जावें करीलचि तो बरे ॥
चरणांत अक्षरें १७. गण - न, स, म, र, स, ल, ग.
उदाहरण * मोरोपंत.
अभय दिधलें आहे वाहे शुचि प्रतिभाझरा ॥
विधुमणिंचिया सारा ताराप कारण पाझरा ॥
जडहि कविता जोडी गोडी गुणीं हरिच्या धरी ॥
सहज तुमचा हीना दीना प्रसाद समुध्दरी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP