रमा
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
रमा. य० ५,१०.
सुजन रमा कथिति असें पहा सुवृत्त ।
चरण जिचा बघुनि न जा न रा य युक्त ॥
प्रतिपदिं पंचदशचि अक्षरें विलोका ।
हरिविण कोण चुकवि तापदा कुलोका ॥
चरणांत अक्षरें १५. गण - न, ज, न, र, य.
उदाहरण * मोरोपंत.
अथ भरतप्रभृति निजानुजांसि सारें ।
कळवितसे निशिं कथिलें जसें स्वचारें ॥
चरणरजेंकरुनिच नाशितां अघातें ।
स्वमत असें कथित असे तदा तिघांतें ॥१॥
९ जाति - अष्टि. पादाक्षरें १६.
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP