मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
विबुधप्रिया

विबुधप्रिया

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


विबुधप्रिया, य० ३, ५,५,५.
होतसे विबुधप्रियाव्हय वृत्त तें बरवें तिथें ॥
रा स जा ज भ रा असे गण येति सा सरसे जिथें ॥
अक्षरें अठराच येतील पादिं मोजुनियां पहा ॥
दीनतारक दु: खहारक शत्रुमारक राम हा ॥१॥
चरणांत अक्षरें १८ गण - र, स, ज, भ, र.
उदाहरण * काचेश्वर.
भक्तवत्सल दीनमोचन पाव सत्वर तूं हरी ।
थोर संकट विघ्र उद्भट पातलें मज, केसरी ॥
नक्रगांठिसि सोडुनी पद मोकळें करि यादवा ।
झोंबला करुं काय तस्कर नाकळे मज माधवा ॥१॥
१२ जाति - अतिधृति. पादाक्षरें १९

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP