आर्यालक्षण
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
आर्यालक्षण.
आर्येच्या प्रथमपदीं, व्दादश मात्रा तशाच तिसर्याला ॥
अष्टादश दुसर्याला, आणिक चवथ्यास पंचदश ॥
१ ल्या चरणांत मात्रा १२: २ र्या चरणांत मात्रां १८;
३ र्या चरणांत मात्रा १२; ४ थ्या चरणांत मात्रा १५.
उदाहरण * उत्तररामचरित्र नाटक.
नूतन पल्लव फुटला, असला तरु आणिला प्रियेनें तो ॥
लवकर चाखायाला, तोंडाशीं गज पहा नेतो ॥
मात्रा आर्या होण्यास एवढेंच लक्षण पुरेसें नाहीं. आर्येंत विषम म्हणजे पहिला, तिसरा, पांचवा व सातवा हे गुण ज गण नसावे व सहावा गण ज गण अथवा न गण असावा, असा नियम आहे पूर्वार्धात चार चार मात्रांचा एकेक गण असे सात गणव पाडतां येऊन आणखी शेवटीं दीर्घ अक्षर असावें. उत्तरार्धातही चार चार मात्रांचे पांच गण असून सहावा गण एकाच लघु अक्षराचा असावा व सातवा गण चार मात्रांचा असून शेवटीं गुरु अक्षर असावें.
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP