मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
मंदारमाला

मंदारमाला

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


मंदारमाला य० ४, ६,६,६.
मंदारमाला कवी बोलती हीस कोणी हिला अश्वघाटी असें ॥
साता तकारीं जिथें हा घडे पाद तेथें गुरु एक अंती वसे ॥
या मोजितां एक पादांत निभ्रांत येतील बेवीस कीं अक्षरें ॥
वारावया ताप तारावया यास नारायणा तूंचि ये सत्वरें ॥१॥
चरणांत अक्षरें २२. गण - त, त, त, त, त, त, त, त,ग.
उदाहरण * मोरोपंत.
वाचाळ मी नीट पाचारितों धीट याचा नयो वीट साचा हरी ॥
खोटा जरी मी चखोटा मधें तूंचि मोठा कृपेचा न तोटा धरीं ॥
दाता सुखाचा सदा तारिता आपदाताप हे एकदा तापटीं ॥
या संतसेवाव्हया संपदा हे भया संग नाशील या संकटीं ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP