वसंततिलकां
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
वसंततिलकां य० पा०.
जाणा वसंततिलकाव्हय तेंच वृत्त ॥
येती जिथें त भ ज जा ग ग हे सुवृत्त ॥
संख्या चतुर्दश पदांतिल अक्षरांची ॥
होतें जनांत अपकीर्ति निरक्षरांचा ॥
चरणांत अक्षरें १४. गण - त, भ, ज, ज, ग, ग.
उदाहरण * शांकुतल नाटक.
घोडे कधीं न खळती रविच्या रथाचे ॥
उल्लघितो पवन भाग सदा नभाचे ॥
भूभार शेष धरि संतत मस्तकांहीं ॥
राजास विश्रम तसा क्षणमात्र नाहीं ॥
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP