संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
परिभाषा

माधवनिदान - परिभाषा

" शरिरेंद्रिय- सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची व्यापक आयुर्वेदीय  व्याख्या आहे.


श्री

प्रणम्य जग‍दुत्पत्तिस्थितिसंहारकारणम्‌ ॥

स्वर्गापवर्गयोर्द्वारं त्रैलोक्यशरणं शिवम्‌ ॥१॥

नानामुनीनां वचनैरिदानीं समास्त : सद्भिषजां नियोगात्‌ ॥

सोपद्रवारिष्टनिदानैङो निबध्यते रोगाविनिश्चयोऽयम्‌ ॥२॥

जगताची उत्पत्ति , पालन आणि संहार करणारा , स्वर्ग आणि मोक्ष यांचे द्वार आणि त्रैलोक्यास आधारभूत असा जो शिव त्यास नमस्कार करून , थोर वैद्यांच्या सूचनेवरून - अनेक ऋषींची वचने घेऊन - ज्यांत उपद्रव . मरणसूचक चिन्हें , रोग उत्पन्न करण्याचीं कारणें व रोग ओळखण्याचीं कारणें सांगितलीं आहेत असा हा रोगविनिश्चय नांवाचा ग्रंथ आम्ही संक्षेपेंकरून रचितों .

नानातन्त्रविहीनानां भिषजामल्पमेधसाम्‌ ॥

सुखं विज्ञातुमातड्‍कमयमेव भविष्यवि ॥३॥

नानाप्रकारचे वैद्यकग्रंथ ज्यांस माहीत नाहींत अशा अल्पबुद्धीच्या वैद्यांस सहज रीतीनें रोगज्ञान होण्यास हा ग्रंथ उपयोगी पडेल .

निदानंपचक .

निदानं पूर्वरूपाणि रूपाण्युपशयस्तथा ॥

संप्राप्तिश्चेति विज्ञानं रोगाणां पञ्चधा स्मृतम्‌ ॥४॥

निदान , पूर्वरूप , रूप , उपशय आणि संप्राप्ति ह्या पांच प्रकारांनीं रोगाचें ज्ञान होतें .

निदान . निमित्तहेत्वायतनप्रत्ययोत्थानकारणै : ॥

निदानमाहु : पर्यायै : ॥

निमित्त , हेतु , आयतन , प्रत्यय , उत्थान आणि कारण हे निदान शब्दाने पर्याय होत .

पूर्वरूप .

प्राग्रपं येन लक्ष्यते ॥५॥

उत्पित्सुरामयो दोषविशेषेणानधिष्ठित : ॥

पूर्वरूप म्हणजे पुढें होणार्‍या रोगाचीं पूर्व चिन्हें ; त्या होणार्‍या रोगाचीं विशेष चिन्हे मात्र त्यात व्यक्त होत नाहींत . ( जसें - आळस येणें , अंग मोडून येणें , अग्निमांद्य या चिन्हांवरून कोणता तरी ज्वर येणार इतकेंच कळतें , परंतु तो अमुकच प्रकारचा येईल हें निश्चयानें समजत नाहीं . कारण ‘ स्थान संश्रय ’ झालेला नसतो .)

लिङमव्यक्तमल्पत्वात्‌ व्याधानां तद्यथायथम्‌ ॥६॥

पूर्वरूप हें त्या त्या व्याधीचें बीजरूप अस्पष्ट चिन्हच समजावें .

रूप .

तदेव व्यक्ततां यातं रूपमित्यमिधीयते ॥

संस्थानं व्यजनं लिङं लक्षणं चिन्हमाकृति : ॥७॥

तेंच पूर्वरूप स्पष्ट झालें म्हणजे त्वास रूप म्हणतात . संस्थान , व्यजन , लिंग , लक्षण , चिन्ह आणि आणि आकृति हे रूपशब्दाचे पर्याय होत .

उपशय .

हेतुव्याधिविपर्यस्तविपर्यस्तार्थकारिणाम्‌ ॥

औषधान्नविहाराणामुपयोगं सुखावहम्‌ ॥८॥

विद्यादुपशयं ब्याधे : स हि सात्म्यमिति स्मृत : ॥

विपरीतोऽनुपशयो व्याध्यसात्म्यभिसज्ञंत : ॥९॥

हेतुविपरीत , व्याधिविपरीत , हेतुब्याधिविपरीत , हेतु विपर्यस्तार्थकारी ( हेतूशी समानजातीय असून परिणामीं उलट म्हणजे रोगशमन कार्य करणारे ), व्याधिविपर्यस्तार्थकारी अशा प्रकारची औषधें ; तशीच अन्नें आणि विहार ( वागणूक ) यांच्या सुखकारक उपयोगास व्याधीचा उपशय म्हणतात ; त्याचा हा व्याधिसात्म्य हा पर्याय शब्द जाणावा . औषधें , अन्नें व विहार यांच्या दुःखकारक उपयोगस अनुपशय अथवा व्याध्य तात्म्य म्हणतात . [ पुढील पानावरील कोष्टक पाहा .]

संप्राप्ति ,

यथा दुष्टेन दोषेण यथा चातुविसर्पता ॥

निर्वृतिराप्रयस्यासौ संप्राप्तिर्जातिरागति : ॥१०॥

त्या त्या कारणानें दुष्ट होऊन त्या त्या मार्गानें संवार करणार्‍या दोषापासून जी रोगाची उत्पत्ति होते तिला संपाप्ति ( ज्या दोषांनीं रोग उत्पन्न होतो तीं उत्पन्न होण्याची तर्‍हा ) म्हणतात . जाति आणि आगति हे शब्द तिचे पर्याय होत . ( चय ते स्थानसंश्रय अशी दोष संकमणकालीन रोगोदूभवाची प्राक्रिया म्हणजे संप्रप्ति .)

संप्राप्तीचे औपाधिकभेद .

संख्याविकल्पप्राधान्यबलकालविशेषत : ॥

सा भिद्यते :---

संख्या , विकल्य , प्राधान्य , बल आणि काल यांच्या अनुरोधानें तिचे पांच विभग होतात .

यथाऽत्रैव वक्ष्यन्तेऽष्टी ज्वरा इति ॥११॥

जसें येयेंच पुढें ज्वर आठ प्रकारचे असें सांगावयाचें आहे , यास संख्यासंप्राप्ति असें म्हणावें .

विकल्परूपसंप्राप्ति .

दोषाणां समवेतानां विकल्पोऽशांशकल्पना ॥

एकत्र प्रकुपित झालेल्या वातादि दोषांचा जो अंशांशत : विचार करणें त्या त्या दोषाचे कोणते गुण अधिक व कोणते कमी झाले यावरून त्यास विकस्यसंप्राप्ति म्हणतात . ( जसें :--- त्रिदोष कोप झाला असतां वातवृद्ध , पित्तवृद्धतर व कफवृद्धतम इत्यादि भेदांचा विचार करणें .) त्या दोषाची वाढ किती अंशानें झाली हे ठरविणें .

स्वातन्त्र्यपारतन्त्र्याभ्यां व्याध : प्राधान्यमादिशेत्‌ ॥१२॥

रोगाचा प्रादुर्भाव स्वतंत्रपणे झाला की अन्य रोगाच्या अंगभूत झाला यावरून त्याचें प्राधान्य किंवा अप्राधान्य जाणावे .

संप्राप्तचि बलाबल .

हेत्वादिकार्त्स्न्यावयवैर्बल विशेषणाम्‌ ॥

हेतु , पूर्वरूप , रूप , उपशय , संप्राप्ति ही सर्व असणे व कांहीं अशाने असणे यावरून संप्राप्तीचे बलाबल समजावें .

खालील कोष्टकावरून उपशयाच्या व्याख्येचा नीट बोध होईल -

नांव - हेतुविपरित

औषध - शीतज्वरावर मिरे , लसूण वगैरे उष्ण औषध

अन्न - श्रम आणि वायु यांनी झालेल्या व्याधीस सुरवा , दूध वगैरे

विहार - दिवसा निजल्याने झालेल्या कफास रात्री जागरण करणॆ .

नांव - व्याधिविपरित

औषध - अतिसारावर अफू वगैरे स्तंभक औषध

अन्न - अतिसारावर साळीचा भात , मेथी , बहुमूत्रावर सातु

विहार - मेदोरोगावर व्यायाम करणे .

नांव - हेतुव्याधीविपरित

औषध - वायुने आलेल्या सुजेवर वातहारक आणि शोथहारक दशमूळ

अन्न - संग्रहिणीवर ताक .

विहार - दिवसा निजल्याने कफात्मक आळसावर रात्री जागरण .

नांव - हेतुविपर्यस्तार्थकारी

औषध - भाजलेल्या चुन्याची निवळी व खोबरे यांचे मिश्रण

अन्न - पिकावयास आलेल्या गळवावर ्पोटीस बांधणे .

विहार - वातजन्य उन्मादास त्रास देणे .

नांव - व्याधिविपर्यस्तार्थकारी

औषध - ओकारीवर ओकारी करणारी जी माशी चिचा मळ देणे .

अन्न - अतिसारावर रेच करणारे दूध .

विहार - पेरवासाने आलेल्या थकव्यावर अंग रगडणे .

नांव - हेतुव्याधिविपर्यस्तार्थकारी

औषध - उष्णतेने झालेल्या दाहावर अगरुचा लेप

अन्न - मदात्ययावर अल्प मद्य पाजणे .

विहार - उन्हाळ्याच्या बाधेवर झळवणी घालणें .

नक्तंदिनर्तुभुक्तांशौर्व्याधिकालो यथामलम्‌ ॥१३॥

रात्र , दिवस ऋत्‌ व अन्नपचन ( प्रारंभ , मध्य व अंत्य ) काल याच्या ज्या भागांत वातादि दोश प्रबल असतात तेच काल त्या त्या पासूअन उत्पन्न होणार्‍या रोगांन्नहि लागू आहेत .

इति प्रोक्तो निदानार्थ : स व्यासेनोपदेक्ष्यते ॥

याप्रमाणें निदान शब्दांत अंतर्भूत होणार्‍या गोष्टी सांगितल्या : त्याचेंच पुढें विस्तारपूर्वक विवरण करावयाचें आहे .

सर्वेषामेव रोगाणां निदानं कुपिता मला : ॥

तत्प्रकोपस्य तु प्रोक्तं विविधाहितसेवनम्‌ ॥

प्रकुपित झालेले दोष ( वात , पित व कफ ) हे सर्वच रोगांचें कारण आहेत . ते दोष प्रकुपित होण्यास अनेक प्रकारचें अपथ्यसेवन कारण आहे .

वातादि दोषाखेरीज रोगाचीं कारणें .

निदानार्थकरो रोगो रोगस्याप्युपजायते ॥

तद्यथा ज्वरसम्तापाद्नक्तपित्तमुर्दार्यते ॥१५॥

रक्तपित्ताज्ज्वरस्ताभ्यां श्वासश्चायुपजायते ॥

प्लीहाभिवृद्धया जाठरं जठराच्छोफ एव च ॥१६॥

अर्शोभ्यो जाठरं दु : खं गुल्मश्चाप्युपजायते ॥

प्रतिश्यायादथो कास : कासात्संजायते क्षय ॥१७॥

क्षयोरोगस्य हेतुत्वे शौषस्याप्युपजायते ॥

रोगहि रोगाचें निदान होतो , म्हणजे एका रोगापासून दुसरा रोग उत्पन्न होतो . जसें - ज्वरसंतापापासून रक्तपित उद्भवतें ; रक्तपित्तापासून ज्वर उद्भवतो . रक्तपित्त आणि ज्वर यांपासून श्वासाची उत्पत्ति होते . प्लीहा वाढून उदररोग होतो . उदरापासून सूज उत्पन्न होते ; तसेच मूळव्याधीपासून उदर आणि गुल्म हे रोग उदभवतात . पडशापासून खोकला व त्या खोकल्यापासून ओज : प्रमृति धातुक्षय उत्पन्न होतो ; व हाच क्षय राजयक्ष्म्याला उत्पन्न करतो .

ते पूर्वं केवला रोगा : पश्चाद्धेत्वर्थकारिण : ॥१८॥

ते पूर्वी नुसते रोगच असून मागून दुसर्‍या रोगांचीं कारणें होतात ; जसें मुळव्याध असतां उदर उत्पन्न होतें .

कश्चिद्धि रोगो रोगत्य हेतुर्मूत्वा प्रशाम्यति ॥

न प्रशाम्यति चाप्यन्यो हेत्वर्थं कुरुतेऽपि च ॥१९॥

एवं कृच्छ्रतमा नृणां द्दश्यन्ते व्याधिसंकरा : ॥

एखादा रोग दुसरा रोग उत्पन्न वरून शांत होतो ; तर दुसरा एखादा रोग अन्य रोग उत्पन्न वरून आपणहि तसाच राहतो . त्याप्रमाणें रोगांची ही गुंतागुंत मनुष्यास अत्यंत पीडा करणारी होते . नानाप्रकारचे दुसरे रोग उत्पन्न करणार्‍या रोगाची चिकित्सा बहुतकरून विरुद्ध असते . म्हणून ते बरे करण्यास कठीण असतात .

तस्माद्यत्नेन सद्वैद्यैरिच्छद्भि : सिद्धिमुत्तमाम्‌ ॥२०॥

ज्ञातव्यो वक्ष्यते योऽयं ज्वरादीनां विनिश्चय : ॥

यास्तव चांगली सिद्धि मिळावी अशी ज्या चांगल्या वैद्यांची इच्छा असेल यांनीं पुढें सांगितलेले ज्वरादि रोगाचें निदान प्रयत्नानें जाणावें .

परिभाषा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP