चरकाने मुख्य कर्णरोग वातजन्य , पित्तजन्य , कफजन्य , व सान्निपातिक असे चार सांगितले असून , दुसर्यांनी दुसरे बरेच सांगितले आहेत . त्या सर्वांची लक्षणे खाली क्रमवार सांगतो .
वातजन्य कर्णरोग ,
नादोऽतिरूक्कर्णमलस्य शोष :
स्नावस्तनुश्चाश्रवणं च वातात् ॥
वात्तजन्य कर्णरोगात वाय़ूच्या प्रकोपाने कानात नाद होणे , ऐकू न येणे , ठणका लागणे , कानांतून पातळ स्राव होणे व त्यांतील मळ सुकून जाणे याप्रमाणे लक्षणे असतात .
पित्तजन्य कर्णरोग .
शोथ : सरागोदरण विदाह :
सपीतपूतिस्नवणं च पित्तात् ॥१॥
पित्तजन्य कर्णरोगात पित्तामुळे कान सुजून लाल होणे व त्यांत भेगा पडणें . आग होणे आणि त्यातून पिवळया व घाण मारणार्या अशा पातळ पदार्थाचा स्राव होणे हे प्रकार द्दष्टीस पडतात .
कफजन्य कर्णरोग .
वैश्वुत्यकण्डूस्थिरशोथशुक्ला -
स्निगधास्नुनि : श्लेष्मभवेति रुक च ॥
कफजन्य कर्णरोगाची लक्षणे :--- कफप्रकोपाने भलतेच ऐकू येणे , कानात अशी सूज उद्भवून तिला खाज सुटणे व स्निग्व आणि पांढर्या वर्णाचा पातळ पदार्थ कानातून स्रवणे याप्रमाणे होत .
सान्निपातिक कर्णरोग .
सर्वाणि रूपानि च सन्निपातात्
स्नावश्च तत्राधिकदोषवर्ण : ॥२॥
सान्निपातिक कर्णरोगात तिन्ही दोषांची वर सांगितलेली लक्षणे एकवटलेली असून त्यात कानावाटे होणारा स्राव ज्या दोषाचे अधिक्य असेल त्याच्या वर्णाचा असतो .
याप्रमाणे कर्णरोगाचे मुख्य प्रकार झाले , आता इतर ग्रंथकारांनी सांगितले आहेत त्यांची नावे व लक्षणे येणेप्रमाणे .
कर्णशूलाचीं लक्षणें .
समीरण : श्रोत्रगतोऽन्यथाचरन् समन्तत : शूलमतीव कर्णयो :
करोति दोषैश्च यथा समावृत : स कर्णशूल ; कथितो दुरासद : ॥
पहिल्या प्रकारास कर्णशूल म्हणतात व हा कष्टसाध्य आहे . कानांतील वायु , कफ , पित्त व रक्त या दुसर्या दोषांनी व्याप्त झाला असता तो कानामध्ये उलट गतीने फिरतो व त्यामुळे अत्यंत वेदना उत्पन्न होतात : ही त्यांची लक्षणे होत .
कर्णनादाचीं लक्षणें .
कर्णस्नोत : स्थिते वाते शृणोति विविधान् स्वरान् ॥
भेरीमृदङ्गशङखानां कर्णनाद : स उच्चते ॥४॥
दुसर्या प्रकारास कर्णनाद हे नाव आहे . यात वायु कानाच्या भोकात जाऊन राहिला असता नगारा , मृदंग , शंख यांचे आवाज व दुसरे अनेक स्वर ऐकू येतात
बाधिर्याचीं लक्षणें .
यदा शब्दवहं वायु : स्नोत : आवृत्य तिष्ठति ॥
शुद्ध : श्लेष्मान्वितो वापि बाधिर्यं तेन जायते ॥५॥
तिसरा प्रकार बाधिर्य होय . हे नुसता वायु अथवा कफवेष्टित वायु जेव्हा प्रकोप पावून शब्दवाहक धमन्यांचा आश्रय करतो तेव्हाम उद्भवते व रोग्यास कानांनी मुळी ऐकू येत नाही .
कर्णक्ष्वेडाचीं लक्षणें .
वायु : पित्तादिभिर्युक्तो वेणुघोषोपमं स्वनम् ॥
करोति कर्णयो : क्ष्वेडं कर्णक्ष्वेड : स उच्चत्ते ॥६॥
चवथ्या प्रकारास कर्णक्ष्वेड अशी संज्ञा देतात . यात पित्तादि दोषांनी मिश्रित झालेला वायु कानात अलगूज , पावा वगैरे वेळूच्या वाद्यासारखा आवाज उत्पन्न करतो .
कर्णस्नावाचीं लक्षणें .
शिरोऽभिघातादथवा निमज्जनाज्जले प्रपाकादथ वापि विद्रधे :
स्नवेद्धि पूयं श्रवणोऽनिलार्दित : स कर्णसंस्नाव इति प्रकीर्तित : ॥
पाचवा प्रकार कर्णस्वाव . हा डोक्यास आधात झाल्याने , पाण्यात पोहताना , पाणी कानात शिरख्याने अथवा कानांत गळू होऊन ते पिकल्याने वायूचा प्रकोण होऊन होतो व यांत कानांदूम पू स्रवतो .
कर्णकेडू .
मारुत : कफसंयुक्त : कर्णे कण्डूं करोति च ॥
सहाव्या प्रकारास कर्णकंडु म्हणतात . यात कफमिश्रित वायु कानामध्ये अतिशय कंड उत्पन्न करतो .
कर्णगथूक .
पित्तोष्मशोषित : श्चेष्मा कुरुते कर्णगूथक : ॥८॥
सातवा प्रकार कर्णगुथक . हे नाव पित्ताच्या उष्णतेमुळे कफ सुकला असता योमुळ कानांत चमतो त्यास देतात .
कर्णप्रतिनाहलक्षणें .
स कर्णगूथो द्रवतां गतो यदा विळायितो घ्राणमुले प्रथञ्चतो ॥
तदा स कर्णप्रतिनाहसंज्ञितो भवेद्धिकार : शिरसोऽभंदकृछ ॥
आठवा प्रकार कर्णप्रतिनाह . यात कानातील पळ द्रवकम होऊन अथवा स्नेहाधर्माविकांमुळे आर्द्र होऊन नाकात व तोंडात शिरतो . हा विकार फार दिवस गहित्यास यापासून पुढे अर्धझिशीचाही ( अर्धें डोके दुखण्याचा ) विकार उदभवतो .
कृमिकर्णाचीं लक्षणें .
यदा तु मूर्च्छन्त्यथवापि जन्तव : मृजन्त्वपत्यान्यथवापि मक्षिका : ॥
तदाञ्जनत्वाच्छ्रवणो निरुच्यते भिषग्मिराद्यै : कृमिकर्णको गद : ॥
पतङ्गा : शतपद्यश्च कर्णस्नोत : प्रविश्य हि ॥
अरतिं व्याकुलत्वं च भृशं कुर्वन्ति बेदनाम् ॥११॥
कर्णो निस्तुद्यते तस्य तथा फुरफुरायते ॥
कीटे चरति रूक्तीव्रा निष्पन्दे मन्दवेदना ॥१२॥
कर्णरोगाच्या नवव्या प्रकारास कृमिकर्णक म्हणतात . कानात किडे पडतात अथवा माशा अंडी घालतात तेव्हां जुने वैद्य कृमिरोगांत सांगितल्या प्रकारची लक्षणे असलेला हा विकार म्हणतात . याशिवाय कानांत कधी कधी पतंग , गोमा व गोमाशा या शिरतात तेव्हा कान फुरफुरतो , त्याला ठणका लागतो व सुया टोबल्यामुळे त्यांत वेदना होऊन रोग्याचा जीव अत्यंत व्याकुळ होतो . या वेदना पतंगादि कीटक कानांत फिरू लागला असता तीव्र होतात व तो शांत राहिला असता मंद असतात .
कर्णविद्रधीचीं लक्षणें .
क्षताभिघातप्रभवस्तु विद्रधिर्मवेत्तथा दोवकृतोऽपर : पुन : ॥
सरक्तपीतारुणमस्नमास्नवेत् प्रतोदधूमायनदाहचोषवान् ॥
दहावा प्रकार कर्णविद्रधि होय , हा कान कोरल्याने दुखावला गेला अथवा कांही लागून क्षत पडते तर त्यामुळे उद्भवतो व त्याचप्रमाणे वातादि दोषप्रकोपानेहि उत्पन्न होतो . त्याचे ठिकाणी आग असते , यातून धूर निधाल्यासारखे वातते ; यास सुयांनी टोचल्यासारख्या अथवा तुंबडी लावल्यासारख्या वेदना होतात आणि हा फुटला असता यातून तांबूस व पिवळट रक्ताचा स्राव होतो .
कर्णरोगाचे इतर प्रकार .
कर्णपाकस्तु पित्तेन कोथविक्लेदकृद्भवेत् ॥
कर्णविद्रधिपाकाद्वा जायते चाम्बुपूरणात् ॥१४॥
पूयं स्नवति वा पूर्ति स ज्ञेय ; पूतिकर्णक :
कर्णशोथार्बुदार्शांसि जानीयादुक्तलक्षणै : ॥१५॥
अकरावा प्रकार कर्णपाक , हा कानात पाणी गेल्यामुळे अथवा वर सांगितलेला कर्णविद्रधि पिकल्यामुळे होऊन त्याच्या योगाने कान सडतो व चिवळतो आणि बारावा प्रकार पूतिकर्णक यात कानावाटे घाण पू वाहतो . या कर्णरोगाच्या सांगितलेल्या बारा प्रकारांशिवाय कर्णशोथ , कर्णार्श असे आणखी त्याचे तीन प्रकार वैद्यशास्रात सांगितले आहेत . याची लक्षणे मागे सांगितलेल्या शोथ , अर्बुद व अर्श या रोगाप्रमाणे असल्यामुळे ती तेथेच पाहावी ; येथे त्यांची द्विरुक्ति करीत नाही .
आतां कर्णपाली रोगाविषयी लिहितो .
परिपोटकाचीं लक्षणें .
सौकुमार्याच्चिरोत्सृष्टे सहसाऽतिप्रवर्धिते ॥
कर्णशोथो भवेत्पाल्यां सरुज : परिपोटवान् ॥१६॥
कृष्णारुणनिभ : स्तब्ध : स वातात्परिपोटक : ॥
टोचलेल्या कानाची भोके कान कोवळा असल्यामुळे पुष्कळ दिवस तशीच सोडून एकदम वाढविली तर त्याच्या पाळीला सूज येऊन तो फुगतो ; या प्रकारच्या रोगास परिपोटक ( हिंगुरडे ) म्हणतात . हा वातजन्य आहे व यांत वायूमुळे कानास आलेला फुगा काळा व तांबूस वर्णाचा , आणि कठिण असा असतो .
उत्पाताचीं लक्षणें .
गुर्वाभरणसंयोगात्ताडणाद्धर्षणादपि ॥१७॥
शोथ : पाल्यां भवेच्छयावो दाहपाकरुजान्वित : ॥
रक्तो वा रक्तपित्ताभ्यामुत्पात : स गदो मत : ॥१८॥
सोन्यामोत्याचे जड दागिने कानांत घातल्यामुळे अथवा त्याच्या ठिकाणी ताडण अथवा घर्षण केल्यामुळे ( कानांच्या ) पाळीला हिरव्या , निळया अथवा तांबूस वर्णाची सूज येऊन तिला ठणका लागणे , आग होणे व ती पिकून पू स्रवणे या रोगास उत्पात असे नांव आहे , हा रक्त व पित्त यांचा प्रकोप झाल्याने उद्भवतो .
उन्मन्थकाचीं लक्षणें .
कर्णं बलाद्वर्धयत : पाल्यां वायु : प्रकुप्यति ॥
कफं प्रगृह्य क्रुरुते शोफं स्तब्धमवेदनम् ॥१९॥
उन्मन्थक : सकण्डूको विकार : कफवातज : ॥
कानाचे भोक बळेच मोठे केले असता होणार्या वातकफजन्य कर्णपाळीच्या रोगास उन्मंथक अशी संज्ञा असून , यांत कुपित झालेला वायु कफाशी मिश्रित होऊन तो कानाच्या पाळीमध्ये कठिण अशी सूज उत्पन्न करतो . या सुजेच्या ठिकाणी वेदना कमी असतात , पण कंड असते .
दु : खवर्धन लक्षणें .
संवर्धमाने दुर्विंद्धे कण्डूदाहरुजान्वित : ॥
शोफो भवति पाकश्च त्रिदोषो दुःखवर्धन : ॥२०॥
वाईट रीतीने कान टोचला गेला असता जर तो तसाच वाढू दिला तर कानाच्या पाळीला शोथ ( सज ) येतो ; यास दु : खवर्धन म्हणतात व हा कंड , दाह व ठणका या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचा पाक होतो .
परिलेहीचीं लक्षणें .
कफासृक्कृमिसंभूत : स विसर्पान्नितस्तत : ॥
लिहेत्सशष्कुलीं पालीं परिलेहत्यिसौ स्मृत : ॥२१॥
कानाच्या पाळीला कफ व कृमि यांपासून जी सूज उत्पन्न होऊन पाळीवर सर्वत्र पसरते तिला परिलेही ही संज्ञा देतात , हिच्यामुळे कानी ची पाळी सर्व झडून जाते .