संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
वातरक्तनिदान

माधवनिदान - वातरक्तनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


वातरक्ताचीं कारणें .

लवणाम्लकटुक्षारस्निग्धोष्णाजीर्णभोजनै : ॥

क्लिन्नशुष्काम्बुजानूपमांसपिण्याकमूलकै : ॥१॥

कुलित्थमाषनिष्पावशाकादिपललेक्षुभि : ॥

दध्यारनालसौवीरसुक्ततक्रसुरासवै : ॥२॥

विरूद्धाध्यशनकोधदिवास्वप्नप्रजागरै : ॥

प्रायश : सुकुमाराणां मिथ्याहारविहारिणाम्‌ ॥३॥

स्थूलानां सुखिनां वातरक्तं प्रकुप्यति ॥

क्षारयुक्त , खारट , आंबट , तिखट , स्निग्ध , उष्ण व अपक्व असे अन्न खाणे , ओलसर किंवा वाळलेले असे पाण्यातील अथवा अनूप१ देशातील जीव यांचे मांस भक्षण करणे , मुळे वगैरे भाज्या पेंड , हुलगे उडीद , वाल , तिळाची चटणी , ऊस , दही , कांजी , सौवीर ( सात्‌ची आंबलेली कांजी ); शिरका , ताक , मध व धान्याची दारू या पदार्थांचे सेवन करणे , विरुद्ध पदार्थ ( दूध , मासे वगैरे ) खाणे , जेवणावर जेवणे , तसेच दिवसा निद्रा , रात्री जागरण व क्रोध या कारणांमुळे , सुखी , स्थूल व सकुमार असून अध्यवस्थित आहार व विहार करणारा जो पुरुष त्यास बहुतकरून वातरक्त रोग होतो .

वातरक्ताची संप्राप्ति .

हस्त्यश्वोष्ट्रैर्गच्छतश्चाश्नतश्च

विदाह्यन्नं सविदाहोऽशनस्य ॥

कृत्स्नं रक्तं विदहत्याशु तच्च -

स्नस्तं दुष्टं पाहयोश्चीयते तु ॥

तत्सम्पृक्तं वायूना दूषितेन

तत्प्राबल्यादुच्यते वातरक्तम्‌ ॥४॥

यास वातरक्त म्हणण्याचे कारण यात दूषित वायूचे प्राधान्य असून शरीरातील दूषित रक्त त्याच्याशी निश्रित होते . जो कोणी हत्ती , वोडा अथवा उंट यावर बसून फिरतो व दाहकारक अथवा ऊन ऊन असे अन्न खातो त्याच्या शरोरातील रक्त दूषित होऊन खाली पायात उतरून व प्रकुपित वायूशी मिश्र होऊन त्यास हा रोग होतो .

वातरक्ताचीं पूर्वरूपें ,

स्वेदोत्यर्थं न वा कार्ष्ण्यं स्पर्शाज्ञत्वं क्षतेऽतिरूक्‌ ॥

सन्धिशैथिल्यमालस्यं सदनं पिटिकोद्नम्‌ : ॥५॥

जानुजङघोरुकटयंसहस्तपादाङ्गसन्धिषु ॥

निस्तोद : स्फुरणं भेदो गुरुत्वं सुप्तिरेव च ॥६॥

कण्डू सन्धिषु रुग्दादो भूत्वा नश्यति चासकृत्‌ ॥

वैवर्ण्यं मण्डलोत्पत्तिर्वातासृकपूर्वलक्षणम्‌ ॥७॥

घाम फार येणे अथवा मुळी न येणे , अंग काळे आणि बधिर होणे , आळस येणे , साधे ढिले पडणे , अंगावर पुटकुळया उठणे . ग्लानी व जडत्व येणे , गुडवे , पिंडर्‍या . मांडया , कंवर , खांदे , हात , पाय व सांधे यामध्ये सुया टोचल्यासारख्या अथवा फाडल्यासारख्या वेदना होणे , जडपणा व बधिरता येणे , अंग फुरफुरणे , त्याचा वर्ण बदलणे व त्यावर मंडले उठणे , सांध्याच्या ठिकाणी कंड सुटणे , वारंवार शूल व दाह उत्पन्न होऊन नाहीसा होणे व क्षत पडले असल्यास त्या जागी अत्यंत ठणका लागणे ही वातरक्ताची पूर्वरूपे जाणावी .

वाताधिक वातरक्ताचीं लक्षणें .

वाताधिकेऽधिकं तत्र शूलस्फुरणतोदनम्‌ ॥

शोथश्च रौक्ष्यं कृष्णत्वं श्यावता वृद्धिहानय : ॥८॥

धमन्यङगुलिसन्धीनां संङकोचोऽङ्गग्रहोतिरुक्‌ ॥

शीतद्वेषोनुपशयस्तम्भवेपथुसुप्तय : ॥९॥

वर सांगितलेली वातरक्ताची लक्षणे क्षणात वाढणे व क्षणात नाहीशी होणे , अंग फुरफुरणे , शूल , व टोचल्याप्रमाणे वेदना हे प्रकार अधिक होणे , अंग काळेनिळे व रूक्ष नि घू न त्याच्या ठिकाणी सूज , ताठा , बधिरता व काटा येणे व ते जखडून जाणे , जाडया व अंगुलीचे सांधे यांचा संकोच होणे , थंड पदार्थांचा तिटकारा येणे व त्यांचे सेवन केले असता विकार वाढणे या प्रकारची लक्षणे वाताधिक वातरक्तात द्दष्टिस पडतात .

रक्ताधिक वातरक्ताचीं लक्षणें .

रक्ते शोथोऽतिरूक्‌ क्लेदस्ताम्रश्चिमिचिमायते ॥

रिनग्धरूक्षै : शमं नैति कण्डूक्लेदसामन्वित : ॥१०॥

वातरक्ताची सर्व लक्षणे रक्ताधिक वातरक्तात असून विषेश हा की सुजेच्या ठिकाणी अत्यंत वेदना व चिमचिम ( एक ठणक्याचा प्रकार ) असते व तिच्यातून तांबडी लस बाहते आणि तिला पाणी सुटते . कोणत्याही स्निग्ध अथवा रूक्ष पदार्थांनी हे बंद होत नाही .

पित्ताधिक वातरक्ताचीं लक्षणें .

पित्ते विदाह : सम्मोह स्वेदो मूर्च्छा मद ; सतृट्‌ ॥

स्पर्शासहत्वं रूग्राग : शोफ : पाको भृशोष्णता ॥११॥

पित्ताधिक वातरक्तात अत्यंत दाह व उष्णता , घाम , मूर्च्छा , तहान , सूज , धुंदी तसेच अंग लाल होणे , त्वावर बारीक पिवळे फोड येणे व त्यास स्पर्श असहा होणे , आणखी इंद्रियांचा नाश व मनास बेशुद्धि ही लक्षणे असतात .

कफाधिक वातरक्त .

कफे स्तैमित्य गुरुतासुप्तिस्निग्धत्वशीतता : ॥

कण्डूर्मन्दा च रुक्‌ द्वन्द्वसर्वलिङ्गं च सङ्करात्‌ ॥१२॥

कफाधिक वातरक्त झाले असता अंग जड , ओले गुंडाळल्यासारखे , तुळतुळीत व बधिर होते , मंदपणात कंड सुटते , व रोग्यास शैत्य उद्भवते व वेदना हलक्या होतात .

जेव्हा वातरक्तात दोन दोन पोषांचे अधिक्य असते तेव्हा त्यात असणार्‍या त्या दोन दोषांची लक्षणे असतात व त्रिदोषजन्य वातरक्तात तिन्ही दोषांची लक्षणे उत्पन्न होता .

उत्तान व गंभीर वातरक्त .

पादयोर्मूलमास्थाय कदाचिद्धस्तयोरपि ॥

आखोर्विषमिव कुद्धं तद्देहमनुसर्पति ॥१३॥

उत्तानमथ गम्भीरं द्विंविधं वातशोणितम्‌ ॥

त्वङमांसाश्रयमुत्तानं गम्भीरं त्वन्तराश्रयम्‌ ॥१४॥

वातरक्त पायांच्या मुळाशी व कधी कधी हाताच्याही मुळाशी उत्पन्न होते आणि वाढत वाढत उंदराच्या विषाप्रमाणे सर्व शरीरभर पसरते , याचे दोन प्रकार आहेत . त्यास उत्तान व गंभीर असे म्हणतात . उत्तान वातरक्त त्वचा व मांस यांचा आश्रय करून राहते व गंभीर वातरक्त त्यांहीपेक्षा शरीरात खोल गेलेले असते .

वातरक्तांत होणारे उपद्रव .

चस्वप्नारोचकश्वासमांसकोथशिरोग्रहा : ॥

संमूर्च्छामदरुक्‌तृष्णाज्वरमोहप्रवेपका : ॥१५॥

हिक्कापाङगुल्यवीसर्पपाकतोदभ्रभक्लमा : ॥

अङगुलीवक्रतस्फोटदाहमर्मग्रहार्बुदा : ॥१६॥

एतैरुपद्नवैर्युक्तं मोहेनैकेन वापि यत्‌ ॥

वातरक्तमसाध्यं स्याद्यशोर्थी परिवर्जयेत्‌ ॥१७॥

झोप जाणे , अरुचि , श्वास , बेशुद्धि , तहान , ज्वर , कंप , टोवल्याप्रमाणे दुखणे , अत्यंत वेदना , भ्रम , आयासावाचून थकवा , मर्मसस्थाने व मस्तक जखडणे , मांस सडणे , इंद्रियाचा नाश , अंगावर फोड व गाठी येणे , आग होणे , उचकी , पांगळेपणा , बोटे वाकडी होणे , धावरे , पाक ( पिकणे ) व मनोमोह अशा प्रकारचे उपद्नव वातरक्तात होतात . हे सर्व उपद्रव असले अथवा यापैकी फक्त बेशुद्वपणा असला तरी वातरक्त रोगी असाध्य जाणून यश इच्छिणार्‍या वैद्याने सोडून धावा .

वातरक्ताचीं साध्यासाध्य लक्षणें .

वातरक्तमसाध्यं स्याद्यच्चातिकान्तवत्सरम्‌ ॥

अकृत्स्नोपद्रवं याष्यं साध्यं स्यान्निरुपद्रवम्‌ ॥१८॥

एकदोषानुगं साध्यं नवं याप्यं द्विदोषजम्‌ ॥

त्रिदोषजमसाध्यं स्याद्यस्य च स्युरुपद्रवा : ॥१९॥

आजानुस्फुटितं यच्च प्रभिन्नं प्रस्रुतं च यत्‌ ॥

उपद्नवैश्व यज्जुष्टं प्राणमांसक्षयादिभि : ॥२०॥

वातरक्त होऊन एक वर्ष लोटले असता असाध्य होते . पण त्यापूर्वी उपाय केल्यास साध्य होते . तसेच जे वातरक्त ( म्हणजे नवे वातरक्त ) संपूर्ण उपद्रवविरहित असते तेही साध्य होते . वर सांगितलेले सगळे उपद्रव ज्यात होत नाहीत ते वातरक्त याप्य होऊन राह्ते त सगळे असता असाध्य होते . याशिवाय एकत्रिदोषोद्भव वातरक्त साध्य : द्विदोषोद्भव याप्य व त्रिदोषोद्भव असाध्य असे समजावे . गुडव्यापर्यंत गेलेले . स्वचा निधालेले , मेगा पडलेले , लस वहात असलेले आणि बल व मांसक्षपादि उपद्रवयूक्त अशा प्रकारचे वातरक्त हटकून रोग्याचा नाश करते .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP