संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
कावीळ

माधवनिदान - कावीळ

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


कावीळ होण्याचीं लक्षणें व कारणें .

पाण्डुरोगी तु योऽत्यर्थं पित्तलानि निषेवते ॥

तस्य पित्तमसृङमांसं दग्ध्वा रोगाय कल्पते ॥१७॥

हारिद्रनेत्र : स भृशं हारिद्रत्यहनखानन : ॥

रक्तपीतशकृन्मूत्रो भेकवर्णो हतेन्द्रिय : ॥१८॥

दाहाविपाकदौर्बल्यसदनारुचिकर्षित : ॥

कामला बहुपित्तैषा कोष्ठशाखाश्रया मता ॥१९॥

कालान्तरात्खरीभूता कृच्छ्रा सात्कृम्भकामला ॥

पांडूरोग झालेल्या रोग्यानें पित्तकारक पदार्थ सेवन केले असतां त्याचें पित्त प्रकोप पावून तें शरीरांतील रक्तमांसांस दग्ध करतें ; व त्यामुळे कामला ( कावीळ ) उत्पन्न होते . रोग्याचे डोळे फार पिवळे होणे , त्याची त्वचा , नखें व तोंड यावर पिवळेपणा येणें , तसेंच मल , मूत्र हीं लाल व पिवळी होणें , हतकेंच नाहीं तर तो रोगी केवळ बेडकाप्राणें सर्वांगभर पिवळा होणें , ही त्या कामलेचीं वरून दिसणारी लसणें होत . हीं झाली असतां रोग्यास दुर्बलता येऊन त्याच्या सर्व इंद्रियांची शक्ति नष्ट होते ; अंगाचा दाह होतो व त्यास ग्लानि येते , आणि त्याचप्रमाणें अन्नाचा द्वेष उत्पन्न होऊन तें खाल्ले तरी पचत नाहीं , या पित्तप्रकोपामुळें होणार्‍या कामलेल्या दोन जाती असून एक कोठयाचा आथव करून असते व दुसरी रक्तादि सर्व धातूंचा आश्रय करून राहते म्हणजे सर्व शरीराम्याशी असते ( कारण तिजमुळे रोग्याचे सर्व अंग पिवळे होते .)- कामलेच्या कोठयाच्या आश्रय करून राहणार्‍या पहिल्या जातीस कुंभकामला म्हणतात . ती रोग्याच्या ठिकाणी फार दिवस राहून जुनी झाली म्हणजे बरी होण्यास फार कष्ट पडतात .

काविळेचीं असाध्य लक्षणें .

कृष्णपीतशकृन्मूत्रो भृशं शूचश्च मानव : ॥

संरक्ताक्षिमुखच्छर्दिविण्मूत्रो यश्च ताम्यति ॥२०॥

दाहारुचितृडानाहतन्द्रामोहसमन्वित : ॥

नष्टाग्निसंज्ञ : क्षिप्रं च कामलावान्विपद्यते ॥२१॥

छर्द्यरोचकहृल्लासज्वरक्लमनिपीडित : ॥

नश्यति श्वासकासार्तो विड्‌भेदी कुम्भकामली ॥२२॥

कामला झालेल्या रोग्याचा मळ काळा व मूत्र पिवळे झालें किंवा दोन्ही अत्यंत लाल झालीं ; अंगावर जाड सूज आली , डोळे व तोंड यांचे ठिकणीं फार लाली आली , उलटी होते तीहि लाल झाली आणि मुर्च्छा आली म्हणजे तो रोगी वांचणें शक्य नाहीं ; त्याचप्रमणि अंगाचा दाह , स्मृतिनाश , अग्निमांद्य , अरुचि , तहान , पोटास फुगवटी , झापड व मूर्च्छा या लक्षणांनी युक्त असलेला कामलेचा रोगीही वाचत नाही . कुंभकामलेनें पीडित झालेल्या रोग्याच्या ठायीं जर ओकारी , अरुचि , मळमळ , श्रमावाचून थकवा , दम , खोकला , ज्वर आणि अतिसार ही लक्षणें उत्पन्न झालीं तर तो निश्चयानें मरणार म्हणून समजावे .

पांडुरोगांत होणार्‍या हलीमल रोगाचीं लक्षणें .

यदातु पाण्डोर्वर्ण : स्याद्धरित : श्यावपीतक : ॥

बलोत्साहक्षयस्तन्द्रा मन्दाग्नित्वं मृदुज्वर : ॥२३॥

स्त्रीष्वहर्षीऽङ्गमर्दश्च दाहतृष्णारुचिर्भ्रम : ॥

हलीमकं तदा तस्य विद्यादनिलपित्तत : ॥२४॥

पांडुरोग्याच्या शरीराचा वर्ण हिरवा , सांवळा किंवा पिवळा झाला ; तसेंच त्याचे जल व उस्साह दे नष्ट झाले . तंद्र आनि अग्निमांद्य , बारीक ज्वर येणें , स्त्री संभोगाविषयी मन विटणे , अरुचि उत्पन्न होणे , अंग मोडून येणें , तहान लागणें , अंगाचा दाह होणें ; व चकर येणें ; हे उपद्रव त्याच्या ठिकाणीं दिसूं लागले म्हणजे वातपित्तजन्य हलीमक रोग त्यास झाला आहे म्हणून समजावें .

पानकी रोगाचीं लक्षणें .

सन्तापो भिन्नवर्चस्त्वं बहिरन्तश्च पतिता ॥

पांडुता नेत्रयोर्यस्य पानकी लक्षणं भवेत्‌ ॥२५॥

पांडुरोगांत पानकी रोग उत्पन्न झाला असतां रोग्याचें अंग आंतून व बाहेरून पिवळें होतें , त्याच्या डोळ्यांच्या ठायी पांढरेपणा येतो , मळ पातळ पडतो आणि त्यांची इंद्रिये व मन ही संताप पावतात .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP