ग्रहणीची संप्राप्ति व लक्षणें .
अतिसारे निवृत्तेऽपि मन्दाग्नेरहिताशिन : ॥
भूय : सन्दूषोतो वन्हिर्ग्रहणीमभिदूषयेत् ॥१॥
एकैकश : सर्वशश्च दोषैरत्यर्थमूर्च्छितै : ॥
सा दुष्टा बहुशो भुक्तमाममेव विमुञ्चति ॥२॥
पक्वं वा सरुजं पूति मुहुर्बद्धं मुहुर्द्रवम् ॥
ग्रहणीरोगमाहुस्तमायुर्वेदविदो जना : ॥३॥
अतिसार १ बरा झाला असताहि जठराग्नि मंद झालेल्या रोग्याकडून जरा खाण्यात कुपथ्य घडले तर त्याचा जठराग्नि पुन : दूषित होऊन ग्रहणीला दूषित करतो , मग आधींच दूषित झालेली ग्रहणी वात , पित्ता , कफ या दोषापैकीं एकेकाच्या दोषामुळे किंवा सर्वांव्या दोषांमुळे अत्यंत दूषित झाली असतां रोग्याने खाल्लेले अन्न बहुधा अपक्वच किंवा पक्व त्याच्या गुदद्वारावाटे बाहेर सोडते , त्यावेळी मुरडा फार होतो व मलास अत्यंत घाण येते , वायूच्या दोषाने मल वारंवार घट्ट होतो व पित्तदोषाने वारंवार पातळ किंवा भस्रा होतो . ( गहणी दूषित झाल्यामुळे हा होतो म्हणून ) वैद्य यांस ग्रहणीरोग म्हणतात .
ग्रहणीचीं पूर्वरूपें .
पूर्वरूपं तु तस्त्येदं तृष्णालस्यं बलक्षय : ॥
विदाहोऽन्नस्य पाकश्च चिरात्कायस्य गौरवम् ॥४॥
तहान लागणे , आळस येणे , बलनाश होणे , अन्नपचन होतांना जळजळ लागणे . अन्नपचन उशीरा होणे व शरिराला जडत्व येणे ही लक्षणे कोणास होऊं लागली म्हणजे त्याला ग्रहणी होणार असे समजावे .
वातिक ग्रहणीचीं कारणें .
कटुतिक्तकषायातिरूक्षसन्दुष्टभोजनै : ॥
प्रमितानशनात्यध्ववेगनिग्रहमैथुनै : ॥५॥
मारूत : कुपितो वन्हिं संच्छाद्य कुरुते गदान् ॥
वातग्रहणी म्हणजे रोग्याने कडू , तिखट व अति रूक्श व संयोगविरूद्व १ पदार्थ खाल्लायामुळे , तसेच थोडे खाल्लयाने किंवा उपास केल्याने आणि फार चालण्याचे श्रम , मलमूत्राच्या वेगाचा अवरोध व अत्यंत स्त्रीसंग या गोष्टी केल्याने वातदोष प्रकोप पावून त्याच्या जठराग्नीला दूषित करून जो विकार उत्पन्न करतो तो . याचे अनेक प्रकार आहेत ते पुढे लिहिल्याप्रमाणे समजावे .
वातिक ग्रहणी . पासून होणारे विकार .
तस्यान्नं पच्यते दुःखं शुक्तपाकं खराताङ्ग ॥६॥
कण्ठास्य शोष : क्षुत्तृष्णा तिमिरं कर्णयो : स्वन : ॥
पार्श्वोरूवङक्षणग्रीवारुगभीक्ष्णं विषूचिका ॥७॥
ह्रत्पीडा कार्श्यदौर्बल्यं वैरस्यं परिकर्तिका ॥
गृद्धि : सर्वरसानां च मनस : सदनं तथा ॥८॥
जीर्णे जीर्यति चाध्मानं भुक्ते स्वास्थ्यमुपैति च ॥
स वातगुल्मह्रद्रोगप्लीहाशङकी च मानव : ॥९॥
चिराद्दु : खं द्रवं शुष्कं तन्वामं शब्दफेनवत् ॥
पुन : पुन : सृजेद्वर्च : कासश्वासार्दितोऽनिलात् ॥१०॥
( वातिक ग्रहणी झाली असता ) रोग्याने खाल्लेले अन्न मोठया कष्टाने पचणे व त्याचा पाक आंबट होणे , शरीर खरखरीत होणे , गळ्यास व तोंडास कोरख पडणे , तहान व भूक लागणे अंधेरी , वारंवार कानांत शब्द होणे , बरगडया , मांडया , जांगाड आणि मान यांच्या ठायी दुखणे व गुदद्वार व तोंड यांच्या वाटे कच्चे अन्न पडणे , छातीत दुखणे , व गुदद्वाराचे ठिकाणी कातरल्यासारखे वाटणे , अंग वाळणे , व शक्ति जाणे तोंडास चव नसणे , सर्व रस खाण्याचीम इच्छा होणे , अन्न जिरले अथवा जिरत असता पोट फुगणे व काही खाल्ले असता समाधान वाटणे , मोठया कष्टाने व फार वेळाने शौचास लागून त्यावेळी कधी पातळ व कधी कोरडा , थोडा आम व शद्वयुक्त व फेसयुक्त असलेला असा मळ पडणे , मनास ग्लानि येणे , व वातगुल्म , प्लीहा , ह्रद्रोग हे आपणास झाल्याची शंका येणे , वायूच्या प्रकोपामुळे खोकला व श्वास हे उत्पन्न होणे असे अनेक विकार रोग्याच्या ठायी उत्पन्न होतात .
पित्तग्रहर्णाचीं कारणें व लक्षणें .
कटवजीर्णविदाह्यम्लक्षाराद्यै : पित्तमुल्वणम् ॥
आप्लावयद्धन्त्यनलं जलं तप्तमिवानलम् ॥११॥
सोऽजीर्णं नीलपीताभं पीताभ : सार्यते द्रवम् ॥
सधूमोद्नारह्रत्कण्ठदाहारुचितृडर्दित : ॥१२॥
अत्यंत तिखट , न शिजलेले , जळजळ करणारे , आंबट , तेलकट , खारट असे पदार्थ खाल्लयामुळे वाढलेले पित्त :--- जसे तपलेले पाणी अग्नि विसबते तसे :--- जठराग्नीला विसवून टाकते . त्यामुळे शरीराचा रंग पिवळा पातळ , कच्चा व निळयापिवळया रंगाचा असा मळ विसर्जन् करतो , करपट ढेकर येतात , छातीत व गळयात जळजळ होते , अरुचि व तहानेने त्याचा ज्जीव व्याकुळ होतो .
कफग्रहणीचीं कारणें व लक्षणें .
गुर्वतिस्निग्धशीतादिभोजनादतिभोजनात् ॥
भुक्तमात्रस्य च स्वप्नाद्धन्त्याग्निं कुपित : कफ : ॥१३॥
तस्यान्नं पच्यते दु : खं ह्रल्लासच्छर्द्यरोचका : ॥
आरयोपदेहमाधुर्यकासष्ठीवनपीनसा : ॥१४॥
ह्रदयं मन्यते स्त्यानमुदरं स्तिमितं गुरु ॥
दुष्टो मधुर उद्नर : सदनं स्नीष्वहर्षणम् ॥१५॥
भिन्नामश्लेप्यसंसृष्टगुरुवर्च : प्रवर्तनम् ॥
आकृशरयापि दौर्वल्यमालरयं च कफात्मके ॥१६॥
जड , अतिस्निग्ध व थंड इ० पदार्थ खाल्लामुळे , अतिशय जेवल्यामुळे व जेवताक्षणी झोंप घेतल्यामुळे वाढलेला कफ जठराग्नीचा नाश करतो . त्याच्या योगाने रोग्यास अन्न कष्टाने पचते , उम्हासे , ओकारी व अरुचि ह्या उत्पन्न होतात . तोंड कफाने सारवल्यासारखे व गोड होते . तसेच खोकला व कफाचा बेडका पडणे , पडसे येणे , पोठ ताठणे व जड होणे , ह्रदय दाटल्यासरखे वाटणे , अग्निमांद्य होणे , विकृत व मधुर ढेकर येणे , ग्लनि , स्त्रीसंभोगाची इच्छा नसणे , आळस येणे , अंग कृश न होता शक्तितहीन होणे आणि कुटीर आमकफमिश्रित , जड व पातळ असा मळ पडणे ही लक्षणे त्याच्या ठायी उत्पन्न होतात .
त्रिदोषजन्य ग्रहणीचीं लक्षणें .
पृथग्वातादिनिर्दिष्टहंतुलिङगसमागमे ॥
त्रिदोषं लक्षयेदेवं तेपां वक्ष्यामि भेषजम् ॥१७॥
वात , पित्त व कफ या दोषांमुळे उत्पन्न होणार्या ग्रहणीची जी पृथक लक्षणे सांगितली आहेत ती एकत्र झालेली द्दष्टीस पडली म्हणजे त्रिदोषजन्य ग्रहणी रोग झाला म्हणून समजावे . ( वरील श्लेकात तेषां वक्ष्यामि भेषजम् हे केवळ श्लोकपाद पूरणार्थ लिहिलेले आहे .)