संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
आमवातानिदान

माधवनिदान - आमवातानिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


आमवाताचीं कारणें व संप्राप्ति .

विरुद्धाहारचेष्टस्य मन्दाग्नेर्निश्चलस्य च ॥

स्निग्धं भुक्तवतो ह्यन्नं व्यायामं कुर्वतस्तथा ॥१॥

वायुना प्रेरितो ह्याम : श्लेष्मस्थानं प्रधावति ॥

तेनात्यर्थं विदग्धोऽसौ धमनी : प्रतिपद्यते ॥२॥

वातपित्तकफैर्भूयो दूषित : सोऽन्नजो रस : ॥

स्नोतांस्यभिष्यन्दयति नानावणेंऽतिपिच्छिल : ॥३॥

युगुपत्कुपितावेतौ त्रिकसन्धिप्रवेशकौ ॥

स्तब्धं च करुतो गात्रमामवात ; स उच्चते ॥४॥

विरुद्ध आहार व विरुद्ध विहार करणे , व्यायाम न करणे अथवा स्निग्वपदार्थ सेवन करताक्षणी व्यायाम न करणे आणि अठराग्रि मंद होणे या कारणांमुळे दूषित वायूने प्रेरित झालेला रोग्याचा आम कफस्थानी जातो व तेथील कफाने अत्यंत दूषित होऊन त्याच्या धमनीत शिरतो , इतकेच नव्हे , तर वात , पित्त व कफ या तिन्ही दोषांनी दुष्ट तो अन्नाचा अपक्वरस नानावर्णयुक्त व बुळबुळीत असा स्रोतरास अभिष्यंद उत्पन्न करतो . रोग्याच्या शरीरात असा प्रकार असता वात व कफ हे एकाच वेळी प्रकोप पावून त्याच्या माकडहाडाचे संधीत शिरतात व शरीरास ताठ करतात . या रोगास आमवात असे म्हणतात .

आमवाताचीं लक्षणें .

अङ्गमर्दोऽरुचिस्तृष्णा आलस्यं गौरवं ज्वर : ॥

अपाक : शूनताऽङ्गानामामवात : स उच्यते ॥५॥

आमवात झाला असता अंग मोडून येणे , अन्न न पचणे , अरुचि व तसेच जडपणा , आळस , तहान , ज्वर , आणि गात्रांना सूत्र ही लक्षणे उत्पन्न होतात .

प्रकार व त्यांचीं लक्षणें .

पित्तात्सदाहरागं च सशूलं पवनानुगम्‌ ॥

स्तैमित्यं गुरू कण्डूं च कफजुष्टं तमादिशेत्‌ ॥६॥

आमवाताचे तीन प्रकार आहेत . पहिला पित्ताच्या प्रकोपामुळे होतो ; त्यांत शरीराचा वर्ण तांबडा व दाह ही लक्षणे असतात ; वायुच्या योगाने होणार्‍या दुसर्‍या प्रकारात शूल असतो व तिसरा कफप्रकोपामुळे होऊन त्यात ओलसरपणा , जडत्व व कंडू ही लक्षणे द्दष्टीस पडतात .

साध्यासाध्य विचार .

एकदोषानुग : साध्यो द्विदोषो याप्य उच्यते ॥

सर्वदेहचर : शोथ : स कृच्छ्र : सान्निपातिक : ॥७॥

ज्यात एकदोषाचा संबंध असतो तो आमवात साध्य होतो ; दोन दोषांचा असतो तो याप्य होऊन राहतो व त्रिदोषजन्य अथवा सन्निपातिक व जो सर्व देहभर पसरणारा आणि सूज असलेला आमवात तो कष्टसाध्य ( बहुश : असाध्य ) असतो .

आमवात वाढला असतां होणारे विकार .

स कष्ट : सर्वरोगाणां यदा प्रकृपितो भवेत्‌ ॥

हस्तपादशिरोगुल्फत्रिकजानूरुसन्धिषु ॥८॥

करोति सरुजं शोथं यत्र दोषै : प्रपद्यते ॥

स देशो रुजतेऽत्यर्थं व्याविद्ध इव वृश्चिकै : ॥९॥

जनयेत्सोऽग्निदोर्वल्यं प्रसेकारूचिगौरवम्‌ ॥

उत्साहहानिवैरस्यं दाहं च बहूमूत्रताम्‌ ॥१०॥

कुक्षौ कठिनतां शूलं तथा निदाविपर्ययम्‌ ॥

तृट्‌छर्दिभ्रममूर्च्छाश्च ह्रद्‌ग्रहं विट्‌विबन्धताम्‌ ॥११॥

जाडयान्त्रकूजमानाहं कष्टांश्चान्यानुपद्रवान्‌ ॥

आमवात १ वाढला असता तो सर्व रोगात अत्यंत दु : खकारक आहे , तो ज्य ठिकाणी जातो तेथे विंचवाने नांगी मारल्याप्रमाणे वेदना होत असतात आणि हात , पाय डोके , मांडया , गुहघे , घोटे व माकडहाड यांच्या संधीत सूज उत्पन्न होऊन तिला ठणका लागतो . तसेच यापासून अम्निमांद्य , अन्नद्वेष , निरुत्साह , जडत्व , दाह , शूल , तहान , ओकरी , जाडय , चक्कर , मूर्च्छा , मलावष्टंभ , बहुनुत्रत्व , कुशीत कठिणपणा आणि , याशिवाय तोंड फिके पडणे व त्यास पाणी सुटणे , रात्री झोप न येणे , दिवसा येणे आतडयात कुरकुर शब्द होणे , पोट फुगणे , ऊर दुखणे , हृदय जस्त्रडल्यासारखे वाटणे हे विकार व दुसरे भयंकर उपद्रन उत्पन्न होतात .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP