कुष्ठरोगनिदान
कुष्टरोगाचीं कारणें व प्रकार
विरोधीन्यन्नपानानि द्रवस्निग्घगुरुणि च ॥
भजतामागतां छर्दि वेगांश्चान्यात् प्रतिघ्नताम् ॥१॥
व्यायाममतिसन्तापमतिभुक्त्वा निषेविणाम् ॥
घर्मश्रमभयार्तानां दुतं शीताम्बुसेविनाम् ॥२॥
अजीणीध्यशिनां चैव पञ्चकर्मापचारिणाम् ॥
नवान्नदधिमत्स्यातिलवणाम्लनिषेविणाम् ॥३॥
माषनूलकपिष्टान्नतिलक्षीरगुडाशिनाम् ॥
शीतोष्णलङ्घनाहारान् क्रमभुक्त्वा निषेविणाम् ॥
व्यवायं चाप्यजीर्णेऽन्ने निद्रां च भजतां दिवा ॥४॥
विप्रान् गुरून् घर्षयतां पांप कर्म च कुर्वताम् ॥
वातादयस्र्यो दुष्टास्त्वग्रक्तं मांसमम्बु च ॥५॥
दुषयन्ति स कुष्ठानां सप्तको द्रव्यसङग्रह : ॥
अत : कुष्ठानि जायन्त सप्त चैक्रादशैव च ॥६॥
( दूध , मसे वगैरे ) संयोगविरुद्र , तसे व पातळ , स्निग्व व जड असे अन्नधान्य खाणे अथवा नवीन अदमुरे दही , मासे , खारट आणि आंबट पदार्थ , व त्यांचप्रमाणे उडीद , मुळे , पिठाचे ( लाडू वगैरे ) केलेले पदार्थ , तीळ , दूध व गूळ ( नेहमी ) सेवन करणे , अपक्वान भक्षिणे अथवा जेवणावर जेवणे , पोटमर जेवून संताप , व्यायाम यांपासून पीडा होणे , उन्हातून आल्यावर , श्रम झाल्यावर , भव वाटल्यावर तत्क्षणी गार पाणी पिणे , अव्यवस्यित वमन - विरेचनादि पंचकर्मे होणे , मलमूत्रादिकांच्या अथवा वांतीच्या वेगाचा रोघ करणे . जेवण झाले असता अतिशय चालणे अथवा कडक ऊन घेणे , वैद्यशास्त्रात सांगितलेल्या मर्यादेबाहेर शीत , उष्ण , लंघन व भोजन यांचे सेवन करणे , दिवसा निजणे आणि जेवण झाल्यावर अन्न जिरले नसता स्रीसमागम करणे ही कृत्ये करणार्या व त्याचप्रमाणे पाप आचरणार्या व गुरुबाह्मणांवा अपमान करणार्या अशा मनुष्याचे शरीरातील वातादि तिन्ही दोष प्रकुपित होतात व ते त्ववा , रक्त , मांस आणि उदक यास दूषित करून त्याच्या ठिकाणी भयंकर असा कुष्ठरोग उत्पन्न करतात . हा कुष्ठरोग सात प्रकारची महाकुष्ठे व अकरा प्रकारची क्षुद्र कुष्ठे मिळून अठरा प्रकार चा होतो , व तो होण्यास ( वात , पित्त व कफ ) हे तिन्ही दोष व ( त्ववा , रक्त , मांस व उदक ही ) चार दूष्यें मिळून या सात कारणांचा संबंध अवश्य असावा लागतो .
सप्त महाकुष्ठें ( रक्तपिती )
कुष्ठानि सप्तधा षैदो : थपृग्द्वन्द्वे : समागतै : ॥
सवष्वपि त्रिदोषेषु व्यपदेशोऽधिकत्वत : ॥७॥
वर कुष्ठरोग अठरा प्रकारचा होतो म्हणून सांगतले त्यापैकी सात प्रकारची जी महाकुष्ठे होतात ती तिन्ही दोषांपासून पृथक पृथक होणारी तीन , दोन दोन दोषापासून होणारी तीन , तिन्ही दोषांपासून होणारे एक याप्रमाणे ( सात ) जाणावी . च सातहि प्रकारात त्रिदोषांचा संबंध असतो . तथापि ज्या प्रकारांत ज्या दोषाचे भाविक्व असेल त्याचे नाव त्यास देऊन वैद्यांनी रोग्याची चिकित्सा करावी .
सप्त महाकुष्ठांचीं पूर्वरूपें व नांवें .
अतिश्लक्ष्णखरस्पर्शस्वेदास्वेदविवर्णता : ॥
दाह : कण्डूस्त्वचि स्वापस्तोद : कोठोन्नतिर्भ्रम : ॥८॥
व्रणानामधिकं शूलं शीघ्रोत्पत्तिश्चिरस्थिति : ॥
रूढानामपि रूक्षत्वं निमित्तेऽल्पेऽतिकोपनम् ॥९॥
रोमहर्षोऽसृज : कार्ष्ण्यं कुष्ठलक्षणमग्रजम् ॥
जेथे कुष्ठ व्हावयाचे असते ती शरीरावरील जागा हातास अत्यंत गुळगुळीत अथवा खरखरीत लागणे , तेथे घाम येणे अथवा मुळी न येणे ; दाह होणे , कंड सुटणे , वर्ण बदलणे , स्पर्शज्ञान न होणे , टोचल्यासारखे दुखणे व गांधीलमाशी डसल्यांप्रमाणे गांधी येणे , भ्रमण होणे , त्याचप्रमाणे यक्तिंचित कारणाने त्वरित व्रण उदभवणे व तो फार दिवस राहणे व त्याच्या ठिकाणी ठणका फार असून तो भरून आला असताहि रुक्ष असणे व किंचित् निमित्त घडल्याने विकोपास जाणे ही व दुसरी रोग्याप्त आयासावाचून थकवा येणे , त्याच्या अंगावर काटा उभा राहणे व त्याच्या रक्तास काळेपणा येणे या प्रकारची वर सांगितलेल्या सप्त महाकुष्ठांची पूर्वरूपे द्दष्टीस पडतात . यांची कापाल , औदुंबर , मंडल , ऋष्पजिव्हा , पुंडरीक , सिब्म व काकण याप्रमाणे नावे असून त्यांची लक्षणे पुढे क्रमाने सांगितल्याप्रमाणे जाणावी .
कापाल महाकुष्ठ ,
कृष्णारुणकपालाभं यद्रुक्षं परुषं तनु ॥
कापालं तोदबहुलं तत्कुष्ठं विषमं स्मृतम् ॥१०॥
पहिले महामुष्ठ कापाल , हे काळया अथवा तांबुस खापराच्या वर्णाचे , पातळ त्वचा झालेले पण खरखरीत व रूक्ष आणि टोचणी लागलेले असते व याची चिकिसा करण्यास वैद्यास कठिण असते .
औदुंबर महाकुष्ठ .
रुग्दाहरागकण्डूभि ; परीतं लोमपञ्जरम् ॥
उदुम्बरफलाभासं कुष्टमौदुम्बरं वदेत् ॥११॥
दुसरे महाकुष्ठांस औदुंबर हे उंबराच्या फळसारखे दिसते व शूल ( वेदना ), दाह , कंड व लाली या लक्षणांनी युक्त असून त्यातरचे केस भोरे होतात .
मंडल महाकुष्ठ .
श्वेतं रक्तं स्थिरं स्त्यानं स्रिग्धमुत्सन्नमण्डलम् ॥
कृच्छ्रमन्योऽन्यसंयुक्त कुष्ठं मण्डलमुच्यते ॥१२॥
तिसर्या महाकुष्ठास मंडल अशी संज्ञा असतो . हे कष्टसाध्य आहे . याची पांढरी , तांबडी , कठीण , ओलसर , गुळगुळीत व त्वचेच्यार आलेली अशी मंडळे रोग्याच्या शरीरावर उदभवुन ति एकमेकांशी लागलेली अर्श असतात .
ऋष्यजिव्ह महाकुष्ठ .
कर्कशं रक्तपर्यन्तमच्या श्यावं सवेदनम् ॥
यद्दष्यजिव्हासंस्थानमुसवजिव्हं तदुच्यते ॥१३॥
चवथे महाकुष्ठ ऋष्याच्या ( रोहीच्या ) जिहिसारखे असते म्हणून यास ऋष्यजिव्ह असे नाव देतात . हे रूक्ष , मध्ये काळे व कडा तांबडया असलेले व वेदनांनी युक्त झालेले अशा प्रकारचे असते .
पुंडरीक महाकुष्ठ .
सश्वेतं रक्तपर्यन्तं पुण्डरीकदलोपमम् ॥
सोत्सेधं च सरागं च पुण्डरीकं प्रचक्षते ॥१४॥
पाचवे महाकुष्ठ जे पुंडरीक ते पांढर्या कमळाच्या पानासारखे किंचित् पांढरे व किंचित् त्वचेच्यावर आलेले आणि मध्ये तांबूस असून कडा अगदी लाल झालेले अशा प्रकारचे द्दष्टीस पडते .
सिघ्म महाकुष्ठ .
श्वेतं ताम्रं तनु च यद्रजो घृष्टं विमुञ्जति ॥
प्रायेणोरसि तत्सिध्ममलाबुकुसुमोपमम् ॥१५॥
सहाव्या प्रकारच्या महाकुष्ठास लोकांत सिध्म ( शिवे ) असे म्हणतात . हे बहुतकरून रोग्याच्या उरावर उद्भवते व पातळ आणि वर्णाने पांढर्या भोपळयाच्या फुलासारखे ( वर्ण पांढरा व तांबूस असे ) असते व हे घासले असता याचा भूस पांढरा ढांबुस निघतो .
काकण महाकुष्ठ ,
यत्काकणन्तिकावर्णं सपाकं तीव्रवेदनम् ॥
त्रिदोषलिङ्गं तत्कुष्ठं काकणं नैव सिध्यति ॥१६॥
महाकुष्ठाच्या सातव्या प्रकारास काकण अशी सांज्ञ असून हे त्रिदोषलक्षप्पांनी युक्त असल्यामुळे असाध्य असते . याचा वर्ण गुंजेसारखा ( म्हणजे मध्ये काळा व कडेला तांबडा अथवा मध्ये व तांबडा कडेला काळा ) असतो ; हे किंचित् पिकते व याच्या जागी तीव्र वेदना उद्भवतात .
याप्रमाणे सप्त महाकुष्ठाची लक्षणे झाली . आता यापुढे एकादश क्षुद्रकुष्ठांची लक्षणे क्रमवार सांगितलेली समजून घ्यावी .
चर्मकुष्ठ .
अस्वेदनं महावास्तु यन्मत्स्यशकलोपमम् ॥
तदेककुष्ठं चर्माख्यं बहलं हस्तिचर्मवत ॥१७॥
पहिले चर्मकुत - हे हत्तीच्या कातडयाप्रमाणे जाड व माशाच्या खवल्यासाखे असून शरीराच्या पुष्कळ भागावर पसरते व यास घाम सुटत नाही .
किटिभ कुष्ठ .
श्यावं किणखरस्पशं परूषं किटिभं स्मृतम् ॥
दुसरे किटिभकुष्ठ - हे निळया वर्णाचे व व्रणाच्या घट्टयाप्रमाणे खडबडीत व रूक्ष असे असते
वैपादिककुष्ठ ,
वैपादिकं पाणिपादस्फोटनं तीव्रवेदनम् ॥१८॥
तिसरे वैपादिक कुष्ठ - हे तीन वेदनांनी युक्त असून याच्यामुळे रोग्याच्या हाता पायांस भेगा पडतात . ( यास जळवात असे नाव आहे .)
अलसककुष्ठ ,
कण्डूमद्भि : सरागैश्च गण्डैरलसकं चितम् ॥
चवये अलसक कुष्ठ - हे फार कंड सुटणार्या व तांबडया वर्णाच्या अशा फोडांनी व्याप्त असते .
ददुमंडलकुष्ठ ,
सकण्डूरागपिटिकंददुमण्डरुमुद्नतम् ॥१९॥
पाचवे . दद्रुमंडळ कुष्ठ - हे वर उचललेले मंडलकार असे उद्भवते च कंड , लाली , आणि फोड या लक्षणांनी युक्त असते . ( यास नायटा असे नाव आहे .)
चर्मदलकुष्ठ .
रक्तं सशूलं कण्डूमत्सस्फोटं यद्नलत्यपि ॥
तच्चर्मदलमाख्यातं संस्पर्शासहमुच्यते ॥२०॥
सहावे चर्मदल कुष्ठ - हे तांबडया वर्णाचे व वेदना , कंड आणि फोड यांनी व्यापलेले व त्यास स्पर्श सहन होत नसलेले असे व स्राव युक्तही असून याच्यामुळे रोग्याची त्वचा फाटते . ( यास इसब म्हणतात .)
पामाकुष्ठ ,
सुक्ष्भाबब्धय : पीडका : स्नाववत्य : ॥
पामेत्युक्ता : कण्डुमत्य : सदाहा : ॥
सातवे पामाकुष्ठ - यात बारीक बारीक असे पुप्कळ फोड उद्भवून त्यात्न लस वाहते व त्याच्या ठिकाणी कंड व आग अतिशय असते . ( यास पैण म्हणतात .)
कच्छुकुष्ठ ,
सैव स्फोटैस्तीव्रदाहैरूपेता
ज्ञेया पाण्यो : कच्छुरूग्रास्फिजोश्च ॥२१॥
आठवे कच्छु कुष्ठ - हे नाव जेव्हा पामाकुष्ठातील फोड मोठाले व अत्यंत आग होत असलेले असतात तेव्हा त्यास देतात ; हे हातावर अथवा कुल्लयावर उद्भवते व वास खरूज असे म्हणतात .
विरफोटककुष्ठ .
स्फोटा : श्यावारुणाभासा विस्फोटा : स्युस्तनुत्वच : ॥
नववे विस्फोटक कुष्ठ - हे निळया व तांबूस वर्णाचे आणि पातळ त्वचेचे जे फोड उदभवतात ते होय .
शतारूकुष्ठ .
रक्तं श्यांव सदाहार्ति शतारु : स्याद्वहुव्रणम् ॥२२॥
दहावे शतारुकुष्ठ - हे काळ्या व तांबडया वर्णांनी मिश्रित अनेक व्रणांनी युक्त वदाह आणि वेदना यांनी व्याप्त असे असते .
विचर्चिकाकुष्ठ ,
सकण्डु : पिटिका श्यावा बहुस्नावा विचर्चिका ॥२३॥
काळ्या वणाची , कंड असलेली व पुष्कळ स्राव करणारी अशी पुळी जेव्हा शरीरावर उद्भवते तेव्हा विचर्चिका अशी संज्ञा देतात . हा शुद्रकुष्ठाचा अकरावा प्रकार समजावा .
कुष्ठरोगांतील दोषाधिक्य लक्षणें .
खरं श्यावारुणं रूक्षं वातकुष्ठं सबेदनम्
पित्तात्प्रकुथितं दाहरागस्नावान्वितं मतम् ॥२४॥
कफात्क्लेदि घनं स्निग्धं सकण्डूशैत्यगौरवम् ॥
द्विलिङ्गं द्वन्द्वजं कुष्ठं त्रिलिङ्गं सान्निपातिकम् ॥२५॥
कुष्ठरोगात वाताच प्राधान्य असता कुष्ठ काळसर अथवा तांबूस वर्णाचे , खरखरीत , रूक्ष वेदनांनी युक्त असे असते , पित्ताचे पाधान्य असता कुजलेले , लाल झालेले व जड जाड , दाह आणि स्राव यांनी व्यापलेले द्दष्टीस पडते , आणि कफाधिक्य असता स्निग्ध , थंड , कंड सुटणारे व लस वाहणारे असे ( कुष्ठ ) आढळून येते , जेव्हा कुष्ठरोगात दोन दोन दोषांचे प्राधान्य असते , तेव्हा ज्या दोन दोषापासून कुष्ठ उदूभवले असते त्याची लक्षणे संयुक्त झालेली त्यात दिसतात व सन्निपातिक कुष्ठात तिन्ही दोषांची लक्षणे एकक्टलेली असतात .
आता उतरोत्तर धातुगत कुष्ठामुळे काय काय प्रकार घडतात ते पहा ---
सप्तधातुगत कुष्ठरोगाचीं पृथक् पृथक् लक्षणें .
त्वक्स्थे वैवर्ण्यमङ्गेपु कुष्ठे रौक्ष्यं च जायते ॥
त्वक्स्वापो रोमहर्षश्च स्वेदस्यातिप्रवर्तनम् ॥२६॥
कण्डूर्विपूयकश्चैव कुष्ठे शोणितसंश्रिते ॥
बाहुल्यं बक्त्रशोषश्च कार्कश्यं पिडिकोद्नम : ॥२७॥
तोद : स्फोट : स्थिरत्व च कुष्ठ मांससमाश्रिते ॥
कौण्यं गतिक्षयोऽङ्गानां सम्भेद : क्षतसर्पणम् ॥२८॥
मेद : स्थानगते लिङ्गं प्रागुक्तानि तथैव च ॥
नासाभङ्गोऽक्षिरागश्च क्षतेषु कृमिसम्भव : ॥२९॥
स्वरोपघातश्च भवेदस्थिमज्जा समाश्रिते ॥
दम्पत्यो : कुष्ठबाहुल्यादुष्टशोणिशुक्रयो : ॥
यदपत्यं तयोर्जातं ज्ञेयं तदपि कुष्ठितम् ॥३०॥
जेव्हा कुष्ठरोग रसधातुगत असतो तेव्हा रोग्याच्या शरीराचा वर्ण पालटतो , ते रूक्ष होते , त्यावर काटा येतो , त्यास फार घाम सुटतो व त्वचेचे स्पर्शज्ञान नष्ट होते , तो ( कुष्ठरोग ) रक्ताशी मिडला म्हणजे शरीरास कंड सुटतें व पू फार वाहू लागतो . मांसास मिळाला असता त्याच्या तोंडास कोरड पडते व त्याचे अंग खरखरीत होऊन त्यावर पुळया उठतात . व त्यास टोचणी लागते आणि त्याचप्रमाणे . फोड उप्तन्न होऊन ते फार दिवस राहतात . मग जेव्हा कुष्ठरोग मेदधातूस जाऊन पोचतो तेव्हा रोग्याच्या हाताचीं बोटे झडतात , त्याची चालण्याची गति खुंटते , अंगास फूट लागते किंवा त्यावर क्षते पडून ती पसरतात आणि या शिवाय आता सांगितलेली रस , रक्त व मांसगत कुष्ठाचीहि सर्व लक्षणे त्याच्या ठिकाणी उद्भवतात . पुढे हा रोग रोग्याच्या अस्थीला मिळतो व त्या घातूच्या आतील मज्जेशीहि संयुक्त होतो तेव्हा त्याचे नाक झडणे , डोळे लाल होणे , घसा बसणे व अंगावरील क्षतात किडे पडणे या प्रकारची अधिक लक्षणे झालेली द्दष्टीस पडतात आणि शेवटी तो शुक्रगत झाला असता वर सांगितलेली रसादि घातुगत कुष्ठांची सर्व लक्षणे एकेवेळी त्याच्या ठिकाणी उदभवतात व अशा प्रकारच्या कुष्ठरोगामुळे ज्याचे शुक्रशोणित दूषित झालेले असते अशा दंपत्यास ( स्त्रीपुरुष ) होणारे अपत्यहि कुष्ठरोगी होते .
कुष्ठरोगाचीं साध्यासाध्य लक्षणें .
साध्यं त्वग्रक्तमांसस्थं वातश्लष्माधिकं च यत् ॥
मेदसि द्वन्द्वजं याप्यं वर्ज्यं मज्जास्थिसंश्रितम् ॥३१॥
कृमिहल्लासमन्दाग्निसंयुक्तं यत्त्रिदोषजम् ॥
भिन्नं प्रस्नुताङ्गं च रक्तनेत्रं हतस्वरम् ॥
पञ्चकर्मगुणातीतं कुष्ठं हन्तीह कुष्ठिनम् ॥३२॥
रस , रक्त व मांस या तीन घातूंपर्यंत गेलेला कुष्ठरोग बरा होतो ; व तसाच ज्यात वात व कफ हे दोष प्रधान असतात तोहि साध्य असतो . मेदधातुगत कुष्ठरोग व त्याचप्रमाणे द्वंद्वज कुष्ठरोग हे याप्य ( औषध वेत आहे तोपर्यंत बरे होणारे व ते सोडले असता पुन : उद्भवणारे ) होऊन राहतात ; आणि अस्थि व मज्जा यास जाऊन भिडलेले ( व शुक्रगत असे कुष्ठरोग ) असाध्य म्हणून चिकित्सा करण्यास वर्ज्य असतात . जो ( कुष्ठरोग ) त्रिदोषजन्य आहे व त्यात कृमि , मळमळ व मंदाग्नि ही लक्षणे उद्भवली आहेत तो , व ज्यात पू वहात असून रोग्याचे डोळे लाल झाले आहेत , घसा बसला आहे व ( वमनविरेचनादि ) पंचकर्माचा परिणाम उयावर होणे अशक्य झाले आहे तो , हे दोन्ही प्रकारचे कुष्ठरोग रोग्यास मारक होतात .
कोणत्या कुष्ठरोगांत कोणते दोष प्रधान असतात .
वातेन कुष्ठं कापालं पित्तेनौदुम्बरं कफात् ॥
मण्डलारख्यं विचर्ची च ऋष्याख्यं वातपित्तजम् ॥३३॥
चमैंककुष्ठं किटिभं सिध्मालसविपादिका : ॥
वातश्लेष्मोद्भवा : श्लेष्मपित्ताद्दद्रु शतातारुषी ॥३४॥
पुण्डरीकं सविस्फोटं पामा चर्मदलं तथा ॥
सर्वै : स्यात् काकणं पूर्वत्रिक दद्रु सकाकणम् ॥
पुण्डरीकर्ष्यजिव्हे च महाकुष्ठानि सप्त तु ॥३५॥
सर्व प्रकारच्या कुष्ठरोगात त्रिदोषसंबंध असतो असे मागे सांगण्यात आले आहे , तरी चिकित्सेच्या सोयीसाठी कोणत्या कुष्ठरोगात कोणता दोष प्रधान म्हणून समजवा याविषयी ‘ माधवाचार्य ’ येणेप्रमाणे सांगतात :--- कापालकुष्ठात वाताचे प्राधान्य असते , औदुंबरात पित्ताचे असते , आणि मंडल व विचर्चिका या दोहोंत कफाचे असते . वात पित्त या दोनदोषांपासून ऋष्यजिव्हा , वात व कफ या दोहोंपासून चर्म , किटिभ , सिध्म , अलस व विपादिका ; आणि कफपित्तापासून द्रदू , शतारू , पुंडरीक , विस्फोट , पामा व चर्मदल या निरनिराळया क्षुद्र व महाकुष्ठ रोगांची उत्पत्ति होते , म्हणून हा द्वंद्वज होत व काकण कुष्ठरोगात तिन्ही दोष समान असतात म्हणून तो सान्निपातिक होय असे जाणावे काधालदि सप्तमहाकुष्ठे कोणती ( व एकादश क्षुद्र कोणती ) ती वर नामनिदेंश करून पृथक पृथक सांगितलीच आहेत .
श्वित्र .
कुष्ठैकसम्भवं श्वित्रं किलासं वारूणं भवेत् ॥
निर्दिष्टमपरिस्नावि त्रिधातूद्भवसंश्रयम् ॥३६॥
कुष्ठरोग होण्याविषयीची जी आरंभी ( विरूद्धाशन गुरुद्वषादि ) कारणे सांगितली आहेत त्याच कारणांपासून श्वित्र अथवा पांढरे कोड उद्भवते ; यासच किलास अथवा वारूण म्हणतात . त्यातून स्राव होत नाही व हे रक्त , मांस व मेद या तीन घातूंचा आश्रय करून राहते . याची वतदि दोषभेदाने होणारी विशेष लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे जाणावी .
श्वित्राचीं लक्षणें .
वाताद्रुक्षारूणं पित्तात्ताम्रं कमलपत्रवत् ॥
सदाहं रोमविध्वंसि कफाच्छेतं घनं गुरु ॥३७॥
सकण्डूरम क्रमाद्रक्तमांसमेदन्सु चादिशेत् ॥
वर्णेवैवेदृगुभयं कुच्छ्रं तच्चोत्तरोत्तरम् ॥३८॥
श्वित्र ( पांढरे कोड ) वायुमुळे रूक्ष व तांबूस होते ; पितामुळे लाल कमळाच्या पानाप्रमाणे भडक होऊन त्याच्या ठिकाणी आग होते व त्यावरचे केस झडतात , आणि कफामुळे ते पांढते , जाड व जड असे होऊन त्यास कंड सुटते , श्वित्र किंवा किलास याचे वातजन्य , पित्तजन्य व कफजन्य हे तिन्ही प्रकार क्रमाने रक्त , मांस व मेद या धातूंशी संयुक्त होऊन होतात व त्याचप्रमाणे रक्ताश्रित असता तांबडा , मांसाश्रित असता तांबूस व मेदाश्रित असता पांढरा , असे त्याच्या वर्णाचे प्रकार झालेले द्दष्टीस पडतात . हे प्रकार एकाहून एक अधिक कष्टसाध्य होत .
श्वित्राचीं साध्यासाध्य लक्षणें .
अशुक्लरोमबहलमसंश्लिष्टमथो नवम् ॥
अनग्निदग्धजं साध्यं श्वित्रं वर्ज्यमतोऽन्यथा ॥३९॥
गुह्यपाणितलौ ष्ठेषु जातमप्यचिरन्तनम् ॥
वर्जनीयं वि शेषे स किलासं सिद्धिमिच्छता ॥४०॥
जे श्वित्र नवीन , अं ग भाजन न झालेले व पातळ असे असून ते शरीरावर दोन्ही अंगांनीं मिळालेले नसते व त्सेच त्यावरचे केस पांढरे झालेले नसतात ते भाग साध्य करण्याचीं वैद्याने इच्छा धरावील बाकीचे कोणत्याही कारचे ते असले तरी त्यात साध्य होणे नाही . त्याचप्रमाणे गुद्यस्था नी , तळहातावर तळपायावर व ओठावर उदभवलेले कोड ( श्वित्र ) अगदी नवीन जरी असले तरी ते बरे करण्यात वैद्यास यश येणार नाहीं .
सांगर्गिक रोग .
प्रसङगात् गात्रसस्पर्शान्नि : श्वासात्सहभोजनात् ॥
सहशय्यासनाच्चापि वस्त्रमाल्यानुलेपनात् ॥४१॥
कुष्ठं ज्वरश्व शोषश्च नेत्राभिष्यन्द एव च ॥
औपसर्गिकरोगाश्च सङकामन्ति नरान्नरम् ॥४२॥
सर्व प्रकारचे कुष्ठरोग व त्याचप्रमाणे ज्वर , धातुक्षय , डोळे येणे व साथीचे रोग हे सांसार्गिक आहेत व ते ज्या रोग्यास झालेले असतात त्याशी संग अथवा सतत सहवास केला असता , त्याच्या शरीराचा स्पर्श झाला असता , त्याच्या श्वासोच्छवासाने दूषित हवेत राहिले असता , त्याचे वस्त्र पांघरले असता , त्याने हुंगलेले पुष्प हुगिले असता व त्याच्या गंधादि अनुलेपनाचा स्वीकार दुसर्या कोणी केला असता त्याग होऊन पुन : आणखी त्याच्या संसर्गाने दुसर्यास याप्रमाणे होत जातात .