संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
विसर्परोगनिदान

माधवनिदान - विसर्परोगनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


विसर्प रोगाचीं कारणें संप्राप्ति व प्रकार .

लवणाम्लकटूषणादिसंसेवादोषकोपत : ॥

विसर्प : सप्तधा ज्ञेय : सर्वत : परिसर्पणात्‌ ॥१॥

पृथकत्रयस्त्रिभिश्चैको विसर्पा द्वन्द्वजास्त्रय : ॥

वातिक : पैत्तिकश्वैव कफज : सान्निपातिक : ॥२॥

चत्वार एते वीसर्पा वक्ष्यन्ते द्वन्द्वजास्त्रय : ॥

आग्नेयो वातपित्ताभ्यां ग्रन्थ्याख्य ; कफवातज : ॥३॥

यस्तु कर्दमको घोर : स पित्तकफसम्भव : ॥

खा रट , आंबट , तिखट व उष्ण वगैरे पदार्थ सेवन केल्यामुळे वातादि दोष प्रकुपित झाले असता त्यापासून ( सात प्रकारचा ) विसर्प रोग उद्भवतो . हा सर्व शरीरावर पसरतो म्हणून यास विसर्प अथवा धावरे असे म्हणतात . याचे वात , पित्त व कफ या तीन दोषांपासून पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन , तिन्ही दोष मिळून होणारा सान्निपातिक एक व द्वंद्वज तीन मिळून सात प्रकार असतात व द्वंद्वजांपैकी वातपित्तजन्य विसर्पास अग्निविसर्प , कफवातजन्यास ग्रंथिविसर्प व पित्तकफजन्यास कर्दम विसर्प , याप्रमाणे वैद्य दुसरी नावे देतात .

विसर्पांतील दोष व दूष्यें .

रक्तं लसीका त्वमांसङं दूष्यं दोषास्त्रयो मला : ॥

विलर्पाणां समुत्पत्तौ विज्ञेया : सप्तघातव : ॥४॥

विसर्प रोगात वात , पित्त व कफ हे तीन दोष व त्याचप्रमाणे रक्त , लस , त्वचा आणि मांस ही चार दूष्ये असून हे तीन दोष व चार दूष्ये मिळून सप्तधातु त्याच्या उ त्प त्तीला कारणे असतात असे समजावे .

वातविसर्पाचीं लक्षणें .

तत्र वातात्परीसर्पो वातज्वरसमाकृति : ॥

शोफस्फुरणनिस्तोदभेदायासार्तिहर्षघाम्‌ ॥५॥

वातजन्य विसर्प रोगाची लक्षणे मागे सांगितलेल्या वातज्वरासारखी असून त्याशिवाय सूज , वेदना , स्फुरण , ठणका , फूट , श्रम , पीडा आणि रोमांच हे प्रकार यांत अधिक असतात .

पित्तविसर्प .

पित्ताद्‌ दुतगति : पित्तज्वरलिङ्गोऽतिलोहित : ॥

 

पित्तविसर्पाचा वर्ण अत्यंत लाल असून त्याची सर्व लक्षणे पित्त ज्वरासारखी असतात व हा शरीरावर जलद पसरतो .

कफविसर्प .

कफात्कण्डूयुत : स्निग्घ : कफज्वरसमानरुक्‌ ॥६॥

कफविर्पात होणारी पीडा कफज्वरासारखीच असून तो तुळतुळीत दिसतो व त्यास कंड फार सुटते .

सान्निपातिक विसपे . सन्निपातसमुत्थश्च सर्वरूपसमन्वित : ॥७॥

वर सांगितलेल्या वात , पित्त व कफ यांपासून होणार्‍या विस र्पा ची लक्षणे या त एकत्र झालेली द्दष्टीस पडतात तो सान्निपातिक विसर्प होय .

वातपित्त विसर्प अथवा अग्निविसर्प याचीं लक्षणें .

वातपित्ताज्ज्वरच्छर्दिमूर्च्छातीसारतृङभ्रमै : ॥

अस्थिभेदाग्निसदनतमकारोचकैयुत : ॥८॥

करोति सर्वमङ्गं च दीप्ताङ्गारावकीर्णवत्‌ ॥

यं यं देशं विसर्पश्च विसर्पति भवेच्च स : ॥९॥

शान्ताङ्गारासितो नीलो रक्तो वाऽशूपनीयते ॥

अग्निदग्धइव स्फोटै : शीघ्रगत्वाद दुतं च स : ॥१०॥

मर्मानुसारी वीसर्प : स्याद्वातोऽतिबलस्तत : ॥

व्यथेतऽड्गं हरेत्सज्ञां निद्रां च श्वासमीरयेत्‌ ॥११॥

हिक्कां च स गतोऽवस्थामीद्दशीं लभते नर : ॥

क्वचिच्छर्मारतिग्रस्तो भूमिशय्यासनादिषु ॥१२॥

चेष्टमानस्तत : क्लिष्टो मनोदेहसमुद्भवान्‌ ॥

दुर्बोघामश्नुते निद्रां सोऽग्निर्वासर्प उच्चते ॥१३॥

वातपित्तविसर्पं अथवा अग्निविवर्प झालेला रोगी ज्वर , ओकारी , मूर्च्छा , अतिसार , तहान , घेरी , अस्थिभेद ( हाडे फुटणे ) अग्निमांद्य , अंधारी , चक्कर व अरुचि या लक्षणांनी युक्त असतो . शरीरावर रसरशीत निखारे ठेवल्याप्रमा णे त्याची आग होते व ज्या ठिकाणी हा रोग पसरतो ते ठिकाण कोळशाप्रमाणे काळे - निळे व तांबडे होऊन त्वरीत सुजते व त्यावर विस्तवाने भाजल्याप्रमाणे फोड येतात . याशिवाय ह्या रोगात वात शीघ्रगति व बलवान्‌ असल्यामुळे लागलीच रोग्याच्या हृदया ला मिडतो व त्याच्या सर्व शरीराचे ठिकाणी वेदना उत्पन्न करतो ; त्यामुळे त्याचे ज्ञान नष्ट होते . त्यास झोप मुळी च येत नाही . वारंवार उचकी येते , श्वास वाढतो अस्वस्थपणामुळे भुईवर व अंथरुणावर कोठेही बसला अथवा पडला तरी त्यास चैन पडत नाही . हालचाल केल्यामुळे पूर्वींच्या होणार्‍या क्लेशात मात्र पडते आणि शेवटी देह व मन यांस अत्यंत दुःख भोगावे लागल्याने प्राप्त होणारी जी महानिद्रा ( मरण ) ती त्यास गाठते . या रोगास ( अग्निविसर्पास ) आग्याधावरे असे म्हणतात .

कफवात विसर्प अथवा ग्रंथिविसर्प .

कफेन रुद्ध : पवनो भित्वा तं बहुधा कफम्‌ ॥

रक्तं वा वृद्धरक्तस्य त्वकशिरारनायुमांसगम्‌ ॥१४॥

दूषयित्वा च दीघीणुवृत्तस्थूलखरात्मनाम्‌ ॥

ग्रन्थीनां कुरूते मालां सरक्तां तीव्ररुग्ज्वराम्‌ ॥१५॥

श्वासकासातिसारास्य शोषहिक्कावमिभ्रमै : ॥

मोहवैवर्ण्यमूर्च्छाङ्गभङ्गाग्निसदनैर्युताम्‌ ॥१६॥

इत्ययं ग्रन्थिवीसर्प : कफमारुतकोपज : ॥

कफवातविसर्प अथवा ग्रंथिविसर्प हा रोग कफ व वात दोहोंच्या कोपाने होतो . जेव्हा आपल्याच कारणांनी कफ कुपित होऊन तो रोग्याच्या शरीरांत संचार करणार्‍या वाय़ूस प्रतिबंध करतो तेव्हां तो वायूही प्रकुपित होऊन रक्तवृद्धि असलेल्या व्यक्तीच्या कफाला किंवा त्वचा , शिरा , स्नायु व मांस यांत वाढलेले रक्ताला लहान , मोठया , खरखरीत व वाटोळी अशी गाठीची माळ उत्पन्न करतो . यासच ग्रंथिविसर्प अथवा गाठयाविसर्प असे म्हणतात . हा झाल्याने अतिसार , वांति , उचकी , चक्कर , घेरी , मूर्च्छा व अग्निमांद्य हे प्रकार उद्‌भ वू न ज्वर येतो , अंग मोडून येते व रोग्याचा वर्ण बदलतो . त्याच्या तोंडास कोरड पडते व त्या उद्‌भवलेल्या माला - कार गाठींना अत्यंत ठणका लागतो .

कफपित्त विसर्प अथवा कर्दम विसर्प रोगाचीं लक्षणें .

कफपित्ताज्ज्वर : स्तम्भो निद्रा तन्द्रा शिरोरूज : ॥

अङ्गावसादविक्षेपप्रलापारोचकभ्रमा : ॥१७॥

मूर्च्छाऽग्निहानिर्भेदोऽस्थ्नां पिपासेन्द्रियगौरवम्‌ ॥

आमोपवेशनं लेप : स्नोतसां स विसर्पति ॥१८॥

प्रायेणामाशयमं गृण्हन्नैकेदशं न चांतिरुक्‌ ॥

पिडकैरवकीर्णोऽतिपीतलोहितपाडुरै : ॥१९॥

स्निग्धोऽसितो मेचकाभो मलिम : शोफवान्‌ गुरु : ॥

गम्भीरपाक : प्राज्योष्मा स्पृष्ट : क्लिन्नोऽवदीर्यते ॥२०॥

पङकवच्छीर्णमांसश्च स्पष्टस्नायुशिरागण : ॥

शवगन्धिश्च वीसर्प : कंर्दमाख्यमुशन्ति तम्‌ ॥२१॥

कफपित्त विसर्प अथवा कर्दम विसर्प यास चिख ल्या विसाप असे आपल्यांत नांव आहे . हा रोग प्रथम रोग्याच्या आमाशयावर उद्‌भवून मग सर्व शरीरावर पसरतो . हा एकेच ठिकाणी फार दुखत नाही ; तरी याच्या ठिकाणी अत्यंत जळजळ असून यावर पिवळया , तांबडया व पांढर्‍या अशा पु ळ्या उद्‌भवतात ; तसेच याचा वर्ण तुळतुळीत शाईसारखा म ळकट असून हा वर सुजलेला , आंत पिकलेला व जड असा दिसतो . आणि दाबला असता ओला होतो ; त्यास मेगा पडतात , चिखलासारखे मांस गळू लागून त्या ठिकाणच्या शिरा व स्नायू उघडे पडतात , व मग यांस प्रेताची घाण य़ेऊं लागते . अशा प्रकारच्या या रोगाने व्यापलेल्या रोग्याचे अंग ताठते , तो हातपाय पाखडतो , त्याची हाडे फुटतात , त्यास आंव पडते व याशिवाय निद्रा , तंद्रा , ग्लानि , मस्तकशूल , घेरी , बडबड , मूर्च्छा , अरुचि , अग्निमांद्य , तहान व जडत्व या विकारांपासून त्यास पीडा होते .

क्षतजन्य विसर्पाचीं लक्षणें .

बाह्महेतो : क्षतात्क्रुद्ध : सरक्तं पित्तमीरयन्‌ ॥

विसर्पं मारुत : कुर्यात्‌ कुलित्थसद्दशैश्चितम्‌ ॥

स्फोटै : शोथज्वररुजादाहाढयं श्यावशोणितम्‌ ॥२२॥

वर सांगितलेल्या विसर्प रोग्याच्या सात प्रकारांखेरीज आणखी क्षतजन्य विसर्पं म्हणून एक प्रकार आहे . हा बाह्य कारणांमुळे रोग्याच्या शरीरावर क्षत पडल्यामुळे त्याचा वायु प्रकोप पावून तो रक्तासह पित्ताला क्षतांत आणून उत्पन्न करतो ; याचे रक्त काळसर होते यावर सूज व हुलग्यासारखे फोड येतात , त्यास ठणका लागतो , दाह होतो व त्यामुळे रोग्यास ज्वर येतो .

विसर्प रोगाचे उपद्रव .

ज्वरातिसारौ चमथुस्त्वङमांसदरणं क्लम : ॥

अरोचकाविपाकौ च विसर्पाणामुपद्नवा : ॥२३॥

ज्वर , अतिसार , ओकारी , तहान , अन्नाचे अपचन , आयासावाचून थकवा , अरूचि , त्वचा व मांस फाटणे हे उपद्रव विसर्प रोग झाला असता उत्पन्न होतात .

विसर्प रोगांची साध्यासाध्य लक्षणें .

सिध्यन्ति वातकफपित्तकृता विसर्पा :

सर्वात्मक : क्षतकृतश्च न सिद्धिमेति ॥

पित्तात्मकोऽञ्जनवपुश्च भवेदसाध्य :

कृच्छ्राश्च मर्मसु भवन्ति हि सर्व एव ॥२४॥

वात , पित्त व कफ या एकेक दोषापासून झालेले विसर्पं साध्य होतात . पण सान्निपातिक वक्षतजन्य विसर्प असाध्य असतात , ज्या पित्तापासून होणार्‍या विसर्पात रोग्याचे अंग काजळासारखे काळे पडते , तो विसर्पहि असाध्य समजावा . याशिवाय रोग्याच्या मर्मस्थानी होणारे सर्व विसर्प कष्टसाध्य होत .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP