संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
मूत्रकृच्छनिदान

माधवनिदान - मूत्रकृच्छनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


मूत्रकृच्छ्राचीं कारणें व प्रकार .

व्यायामतीक्ष्णौषधरूक्षमद्यप्रसङ्गनित्यदुतपृष्ठयानात्‌ ॥

आनूपमत्स्याध्यशनादजीर्णात्स्युर्मूत्रकृच्छ्राणिनृणामिहाष्टौ ॥

दररोज मद्य पिणे , अनूप ( पुष्कळ पाणी व झाडी असलेल्या ) देशांतील मृग पक्ष्यांचे मांस व मासे खाणे , रूक्ष जेवणावर जेवणे , निरंतर शीघ्र गतीच्या ( घोडा वगैरे ) यानाच्या पाठीवर बसून प्रवास अथवा व्यायाम करणे आणि तीक्ष्ण औषधे घेणे व अजीर्ण या कारणांमुळे मनुष्यास मूत्रकृच्छ्ररोग होतो . याचे तिन्ही दोषांपासून पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन व सर्व दोष मिळून होणारा एक हे चार आणि शल्य , मल , शुक्र व अशमरी या चार कारणांपासून स्वतंव्रपणे होणारे चार असे एकंदर आठ प्रकार सांगितले आहेत .

संप्राप्ति .

पृथङमला : स्वै : कुपिता निदानै : सर्वेऽथवाकोपमुपेत्य बस्तौ ॥

मूत्रस्य मार्गं परिपीडयन्ति यदा तदा मूत्रयतीह कृच्छ्रात्‌ ॥२॥

आपआपल्या कारणांनी दूषित झालेला बात , पित्त व कफ या तीन दोषांपैकी एखादा किंवा हे तिन्हीही दोष रोग्याच्या वस्तीत प्रकोप पावले असता जेव्हा त्याच्या मूत्रमार्गास पीडित करतात तेव्हा त्यास मोठया कष्टाने लध्वीला होते . यासच मूत्रकृच्छ अथवा उन्हाळे असे म्हतात .

वातजन्य मूत्रकृच्छ्र .

तीव्रार्तिरुग्वङक्षणबस्तिमेदे

स्वल्पं मुहुर्मूत्रयतीह वातात्‌ ॥

जांगाडे , मूत्राशय व शिश्र यांमध्ये तीव्र वेदना उद्भवणे आणि लध्वीला थोडेथोडे व वरचेवर होते ही वातजन्य मूत्रकृच्छ्रांची लक्षणे जाणावी .

पित्तजन्य मूत्रकृच्छ्र .

पीतं सरक्तं सरुजं सदाहं

कृच्छ्रं मुहुर्मूत्रयतीह पित्तात्‌ ॥

पित्तजन्य मूत्रकृच्छ्रात किंचित्‌ लाली असलेले असे पिवळया रंगाचे मूत्र लध्वीच्या वेळी वारंवार व मोठया कष्टाने बाहेर पडते व ते पडताना शिश्रत दाह व वेदना हा उत्पन्न होतात .

कफजन्य मूत्रकृच्छ्र .

बस्ते : सलिङ्गस्य गुरुत्वशोथौ

मूत्रं सपिच्छं कफमूत्रकृच्छ्रे ॥

कफजन्य मूत्रकृच्छ्राची लक्षणे :--- शिश्र व बस्ति यांस जडत्व व सूज येणे व मूत्र बुळबुळीत होणे ही असतात .

सान्निपातिक मूत्रकृच्छ्र .

सर्वाणि रूपाणि तु सन्निपातात्‌

भवन्ति तत्‌ कृच्छ्रतमं तु कृच्छ्रम ॥४॥

सन्निपातजन्य मूत्रकृच्छ्रात तिन्ही दोषांची लक्षणे द्दष्टीस पडतात ; व अशा प्रकारचा हा रोग कष्टसाध्य होतो .

शल्यजन्य मूत्रकृच्छ्र .

मूत्रवाहिषु शल्येन क्षतेष्वभिहतेषु च ॥

मूत्रकृच्छ्रं तदाघाताजायते भृशदारुणम्‌ ॥५॥

वातकृच्छ्रेण तुल्यानि तस्य लिङ्गानि लक्षयेत्‌ ॥

मूत्रवाहिनी धमन्या किंवा शल्याने घावाने विद्ध होऊन जेव्हा दुखावल्या जातात तेव्हा अत्यंत भयंकंर मूत्रकृच्छ्र उत्पन्न होते ; त्याची लक्षणे वर सांगितलेल्या वातजन्या मूत्रकृच्छ्राच्या लक्षणासारखीच असतात .

मलजन्य मूत्रकृच्छ्र .

शकृतस्तु प्रतीघाताद्वायुर्विगुणतां गत : ॥

आध्मानं वातसङं च मूत्रसङं करोति च ॥६॥

मलाचा अवष्टंभ झाला असता वायु उलट गति होऊन मूत्राचा अवरोध करतो . या मूत्रकृच्छ्रांत पोट फुगते व वातजन्य वेदना होतात .

अश्मरीजन्य मूत्रकृच्छ्र .

अश्मरीद्देतु तत्पूर्वं मूत्रकृच्छ्रमुदाहरेत्‌ ॥

मृत्रशयात झालेल्या मुतखडयाच्या योगाने होणार्‍या मूत्रकृच्छाच्या अश्मरीजन्य मूत्रकृच्छ्र म्हणतात .

शुक्रजन्य मूत्रकृच्छ्र .

शुक्रे दोषैरुपहते मूत्रमार्गे विधारिते ॥

सशुक्रं मेहयेत्कृच्छ्राद्वस्तिपेहनशूलवान ॥७॥

वातादिदोषाच्या योगाने शुक्र दूषित झाल्यामुळे मूत्रमार्ग कोंडला असता शुक्रजन्य मूत्रकृच्छ्ररोग उत्पन्न होतो . यांत कष्टाने लध्वीला होणें . मूत्राबरोबर शुक्र स्रवणे आणि बस्तीत व शिश्रांत ठणका लागणे ही लक्षणे द्दष्टीस पडतात .

अश्मरी व शर्करा .

अश्मरी शर्करा चैव तुल्यसम्भवलक्षणे ॥

विशेषणं शर्कराया : शृणु कीर्तयतो मम ॥

पच्यमानाऽश्मरी पित्ताच्छोष्यमाणा च वायुना ॥

विमुक्तकफसन्धाना क्षरन्ती शर्करा मता ॥९॥

हृत्पीडा वेपथु : शूलं कुक्षावग्निश्च दुर्बल : ॥

तथा भवति मूर्च्छा मूत्रकृच्छ्रं च दारूणम्‌ ॥१०॥

अश्मरी ( मुतखडा ) व शर्करा यांची संप्राप्ति व लक्षणे सारखीच आहेत तरी त्यांत जो विशेष आहे तो पुढे सांगितल्याप्रमाणे नीट ध्यानात घरावा . पित्तामुळे पक्व होणारी व वायूमुळे शोषली जाणारी अशी अश्मरीकफाचे संघानत्व म्हणजे घट्ट बनण्याचा गुण नष्ट होऊन तो खडाफुठीर होतो . तेव्हा लघवी करतेवेळी अश्मरीचे कण मूत्रावाटे पडू लागतात . हिलाच शर्करा अथवा रेव असे म्हणतात . या रेवीमुळे रोग्याच्या ह्रदयात व कुशीत वेदना होतात . जठराग्रि मंद पडतो , मूर्च्छा येते , अंग कापते व भयंकर मूत्रकृच्छ्र रोग उत्पन्न होतो .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP