गलगंडनिदान
गलगंडाची व्याख्या .
निबद्ध : श्वयथुर्यस्य मुष्कवल्लम्बते गले ॥
महान्वा यदि या र्हस्वो गलगण्डं तमादिशेत् ॥१॥
रोग्याच्या गळ्याला फार दिवस राहणारी अशीजी वृषणाप्रमाणे लोंबणारी लहान किंवा मोठीं सूज येते तिला गलगंड म्हणावे .
गलमंडाबी कारणें .
वात : कफश्चापि गले प्रदुष्टौ मन्ये समाश्रित्य तथैव मेद : ॥
कुर्वन्ति गण्डं क्रमशन्निलिङ्गै : समन्विंत तं गलगण्डमाहु : ॥२॥
रोगाच्या गळयामध्ये दूषित झालेले वात व कफ हे दोन्ही दोष आणि मेद हे त्याच्या ( गळयाच्या ) बाजूच्या शिरांमध्ये राहून क्रमाक्रमाने आपापल्या लक्षणांनी युक्त असा हा गलगंड उत्पन्न करतात . याचे वातजन्य , कफजन्य व मेदजन्य असे तीन प्रकार आहेत . पित्तजन्य गलगंड होत नाही .
वातजन्य गलगंडाचीं लक्षणें .
तोदान्वित : कृष्णशिरावनद्ध श्यावोऽरुणो वा एवनात्मकस्तु ॥
पारुष्ययुक्तश्चिरवृद्धिपाको यद्दच्छया पाकंमियात्कदावित् ॥
वैरस्यमास्यस्य च तस्य जन्तोर्भवेत्तथा तालुगलप्रशोष : ॥३॥
वातजन्य गलगंडाची लक्षणे :--- गळणाला झालेला गंड ( सुज्ञेचा गोळा ) निळया तांबडया रंगाचा आणि काळया शिरांनी व्यापलेला असणे , त्यांत सुया टोचडगप्रमाणे वेदना होणे , हातास खरखरीत लागणे व तसाच तो फार वेळाने वाढणे व व्कचित् पिकणे ( बहुतकरून न पिकणे ) याप्रकाची असून या रोगात रोग्याच्या तोंडास चव नसते व त्याची टाळू आणि गळा यांस कोरड पडते .
कफजन्य गलगंडाचीं लक्षणें .
स्थिर : सवर्णो गुरुरुग्रकण्डू : शीतो मद्दाश्चापि कफात्ममस्तु ॥
चिराभिवृद्धिं भजते चिराद्वा प्रपच्यते मन्दरुज : कदाचित् ॥
माधुर्यमास्यस्थ च तस्य जन्तोर्भवेत्तथा तालुगलप्रलेप : ॥४॥
कफजन्य गलगंड हा स्थिर , त्वचेच्या रंगाचा , जड , अतिशय कंड असलेला , मोठा , फार वेळाने वाढणारा व तसाच फार वेळाने थोडथोडा ठणका लागून ( कदाचित् ) पिकणारा असा असतो आणि हा झालेल्या रोग्याचे तोंड गोड व टाळू आणि गळा हे कफाने सारवल्याप्रमाणे होतात .
मेदजन्य गलगंडाचीं लक्षणें .
स्निग्धो गुरु : पाण्डुरनिष्टगन्धो मेदोभव : स्वल्परूजोऽतिकण्डु : ॥
प्रलम्बतेऽलाबूवदल्पमूलो देहानुरूपक्षयवृद्धियुक्त : ॥५॥
स्निग्धास्यता तस्य भवेच्च जन्तोर्गलेऽनुशब्दं कूरूते च नित्यम् ॥
जो गलगंड तुळतुळीत , जड , पांढर्या वर्णचा , दुर्गंधयुक्त , थोडाथोडा ठणका व अतिशय कंडू असलेला , दुध्या भोपळ्याप्रमाणे लोंबणारात लहान मुळाचा आणि देहानुरूप क्षय व वृद्धि पावणारा ( म्हणजे शरीर क्षीण झाले असता लहान होणारा व चांगले असता वाढणारा ) असा असतो तो मेदापासून झालेला जाणावा . यांत रोग्याचे तोंड तेल चोपडल्याप्रमाणे तुळतुळीत दिसते व तो बोलतांना नेहमी गळ्यातून त्याचा शब्द खोल निघतो .
गलगंडाचीं असाध्य लक्षणें .
कृच्छाच्छवसन्तं मृदुसर्वगात्रं संवत्सरातीतमरोचकार्तम् ॥
क्षीणं च वैद्यो गलगण्डजुष्टं भिन्नस्वरं चापि विवर्जतेत्तु ॥६॥
गलगंड होऊन एक वर्ष लोटलेला , सर्व गात्रे मृदु व शक्ति क्षीण झालेला , तोंडाची चव गेलेला , कष्टाने श्वास टाकीत असलेला व स्वर बदललेला असा जो रोगी असेल तो वैद्याने असाध्य जाणून सोडून द्यावा .