संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
नाडीव्रणनिदान

माधवनिदान - नाडीव्रणनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.

नाडीव्रणाचीं कारणें व प्रकार .

य : शोथमाममतिपक्वमुपेक्षतेऽज्ञो

यो वा व्रणं प्रचुरपूयमसाधुवृत्त : ॥

अभ्यन्तरं प्रविशति प्रविदार्य तस्य

स्थानानि पूर्वविहितानि तत : स पूय़ : ॥१॥

तस्यातिमात्रगमनाद्नतिरिप्यन्ने तु

नाडीव यद्वहति तेन मता तु नाडी ॥

दोषैस्त्रिभिर्भवति सा पृथगेकशश्च

संमूर्च्छितैरपि च शल्यनिमित्ततोऽन्या ॥२॥

वैद्यशास्त्राचे ज्ञान नसलेल्या रोग्याकडून पिकलेल्या सुजेचे ( ती पिकली नाही अशा समजुतीने ) बरोबर शोधन झाले नाही ( म्हणजे तिच्यातील पू काढला गेला नाही ); अथवा पुष्कळ पू झालेल्या व्रणाची उपेक्षा झाली आणि त्याकडून स्वच्छंदी आहारविहारादिकांचे कुपथ्य घडले ; तर तो त्याचा वाढलेला पू मागे सांगितलेल्या त्वचा , मांस , शिरा , स्नायु , संधि , अस्थि , कोष्ठ व ममें या स्थानी जाऊन जाऊन त्यांचा भेद करतो व त्या ठिकाणी तो फार खोल गेल्यामुळे जो मार्ग होतो त्यांतून तो नाडीप्रमाणे ( नळीप्रमाणे ) वाहु लागतो . या प्रकाराच्या रोगास नाडीव्रण म्हणतात . याचे तिन्ही दोषापासून पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन , तिन्ही दोष मिळून होणारा एक आणि शल्यापासून उद्भवणारा एक असे पाच प्रकार आहेत ; त्याची लक्षणे पुढे सांगितल्याप्रमाणे जाणावी .

पांच प्रकार

वातजन्य नाडीव्रण .

तत्रानिलात्परुषसूक्ष्ममुखी सशूला

फेनानुविद्धमधिकं स्नवति क्षपासु ॥१॥

वातापासून झालेला नाडीव्रण बारीक व रुक्ष अशा तोंडाचा असतो , तो वेदना उत्पन्न करतो व त्यातून फेसयुक्त स्राव होत असतो व तो रात्री तर फारच होतो .

पित्तजन्य नाडीव्रण .

पित्तात्तृषाज्वरकरी परिदाहयुक्ता

पीतं स्रवत्यधिकमुष्णमह : चापि ॥२॥

पित्तजन्य नाडीव्रणात दाह होतो , ज्वर येतो , तहान लागते व त्यातून कढत व पिवळ्या अशा पुवाचा स्राव होते असतो व तो दिवसा पुष्कळ होतो .

कफजन्य नाडीव्रण .

ज्ञेया कफाद्वहुघनार्जुनपिच्छिलास्ना

स्तब्धा सकण्डुररुजा रजनीप्रवृद्धा ॥३॥

कफजन्य नाडीव्रणास स्तब्धता असून कंड फार लागते आणि त्यातून पांडरा , चिकट व दाट असा पू वहात असतो आणि त्याच्या त्या वाहण्याचा जोर रात्री फार असतो .

सान्निपातिक नाडीव्रण .

दाहज्वरश्वसनमूर्च्छनवक्‌त्रशोषा

यस्यां भवन्ति विहितानि च लक्षणानि ॥

तामादिशेत्‌ पवनपित्तकफप्रकोपात्‌

घोरामसुक्षयकरीमिव कालरात्रिम्‌ ॥४॥

ज्या नाडीव्रणांत दाह , ज्वर , श्वास , मूर्च्छा , तोंड कोरडे पडणे वगैरे वर सांगितलेली सर्व लक्षणे असतात तो सान्निपातिक होय . हा फार भयंकर असून प्राणनाश करणारा आहे . या व्रणाच्या वेदनेत रात्र घालवणे हे प्राणघाति नि काळ रात्र घालवण्यासरखेच होय .

शल्यजन्य नाडीव्रण .

नष्टं कथञ्चिदनुमार्गमुर्दारितेषु

स्थानेषु शल्यमचिरेण गति करोति ॥

सा फेनिलं मथितमुष्णमसृग्विमिश्रं

स्रांव करोति सहस्न सरूजं च नित्यम्‌ ॥५॥

वर सांगितलेल्या त्वचा , मांस , वगैरे स्थनी कोणत्याहि कारणांमुळे काटा वगैरे मोडून आत राहिल्यास शल्यजन्या नाडीजणाचा उद्बल होतो . तेव्हा त्या नाडीव्रणांतून घुसळल्याप्रमाणे . कढत फेस आणि रक्त मांनी युक्त स्राव होत असतो आणि त्सा सतत ठणका लागतो .

दोषद्वयाऽभिहितलक्षणदर्शनेन

तिस्रोगतीर्व्यतिकरप्रभवास्तु विद्यात्‌ ।

केव्हा केव्हा नाडीव्रणात दोन दोषांचीच लक्षणे उत्पन्न होत असतात , तेव्हां त्यास द्वंद्वज नाडीव्रण म्हणावे . ते तीन प्रकारचे आहेत .

साध्यासाध्य नाडीव्रण

नाडी त्रिदोष प्रभवा न सिध्येत्‌

शेषाश्चतस्न : खलुयत्नसाध्या " ॥६॥

सर्व प्रकारच्या नाडीव्रणांपैकी सान्निपातिक नाडीव्रण असाध्य जाणावा ; बाकीचे चार प्रकार उपचार केल्याने साध्य होतात .

नाडीव्रणनिदान

नाडीव्रणाचीं कारणें व प्रकार .

य : शोथमाममतिपक्वमुपेक्षतेऽज्ञो

यो वा व्रणं प्रचुरपूयमसाधुवृत्त : ॥

अभ्यन्तरं प्रविशति प्रविदार्य तस्य

स्थानानि पूर्वविहितानि तत : स पूय़ : ॥१॥

तस्यातिमात्रगमनाद्नतिरिप्यन्ने तु

नाडीव यद्वहति तेन मता तु नाडी ॥

दोषैस्त्रिभिर्भवति सा पृथगेकशश्च

संमूर्च्छितैरपि च शल्यनिमित्ततोऽन्या ॥२॥

वैद्यशास्त्राचे ज्ञान नसलेल्या रोग्याकडून पिकलेल्या सुजेचे ( ती पिकली नाही अशा समजुतीने ) बरोबर शोधन झाले नाही ( म्हणजे तिच्यातील पू काढला गेला नाही ); अथवा पुष्कळ पू झालेल्या व्रणाची उपेक्षा झाली आणि त्याकडून स्वच्छंदी आहारविहारादिकांचे कुपथ्य घडले ; तर तो त्याचा वाढलेला पू मागे सांगितलेल्या त्वचा , मांस , शिरा , स्नायु , संधि , अस्थि , कोष्ठ व ममें या स्थानी जाऊन जाऊन त्यांचा भेद करतो व त्या ठिकाणी तो फार खोल गेल्यामुळे जो मार्ग होतो त्यांतून तो नाडीप्रमाणे ( नळीप्रमाणे ) वाहु लागतो . या प्रकाराच्या रोगास नाडीव्रण म्हणतात . याचे तिन्ही दोषापासून पृथक्‌ पृथक्‌ होणारे तीन , तिन्ही दोष मिळून होणारा एक आणि शल्यापासून उद्भवणारा एक असे पाच प्रकार आहेत ; त्याची लक्षणे पुढे सांगितल्याप्रमाणे जाणावी .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP