संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
शारीरव्रणनिदान

माधवनिदान - शारीरव्रणनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


व्रणाचे दोन प्रकार .

द्विधा व्रण : परिज्ञेय : शारीरागन्तुभेदत : ॥

दोषैराद्यस्तयोरन्य : शस्त्रदिक्षतसम्भव : ॥१॥

रोग्याच्या ठिकांणी होणार्‍या व्रणाचे दोन प्रकार आहेत ते - एक शारीरव्रण व दुसरा आंगतुकव्रण , याप्रमाणे जाणाए , पहिला प्रकार शरीरांतील वातादि दोषापासून उद्भवतो व दुसरा होण्यास शस्त्रदिकांचा घाव करण असतो . या दोन्ही प्रकाराचेही आणखी पोटप्रकार अनेक आहेत : त्यांपैकी शारीरव्रणाचे पुढे सांगितल्याप्रमाणे द्दष्टीस पडतात .

वातिक व्रणलक्षणें .

स्तब्ध : कठिणसंस्पर्शो मन्दस्रावो महारुज : ॥

तुद्यते स्फुटति श्यावो व्रणो मारुत सम्भव : ॥२॥

पहिला प्रकार वातापासून उद्भवतो , त्याची लक्षणे - व्रण ताठलेला , काळया वर्णाचा , भेगा पडलेला व स्पर्श केला असता हातात कठीण लागणारा असा असून त्यातून स्राव थोडा होतो , पण ठणका फार लागतो व सुई टोचल्यासारखी वेदना असते .

पैत्तिक व्रणलक्षणें .

तृष्णामोहज्वरक्लेददाहदुष्टयवदारणै : ॥

व्रणं पित्तकृतं विद्याद्नन्धै : स्नावश्च पूतिकै : ॥३॥

दुसरा प्रकार पितापासून झालेला असतो . त्यातील घाण ओला , स्राव करणारा , भेगा पडलेला , सडलेला घाण मारणारा व दाहयुक्त असून रोगी मूर्च्छा , ज्वर व तहान या लक्षणांनी पीडित होतो .

कफजन्य व्रणलक्षणें .

बहुपिच्छो गुरु : स्निग्ध : स्तिमितो मन्दवेदन : ॥

पाण्डुवर्णोऽल्पसङक्लेदी चिरपाकी कफोद्भव : ॥४॥

तिसर्‍या प्रकारचा कफजन्य व्रण हा पांढर्‍या वर्णाचा , जड , स्थिर , स्निग्व , थोडा स्राव व थोडी वेदना करणारा व पुष्कळ काळाने पिकणारा असा असतो व त्यातून पुष्कळसा बुळबुळीत कफ पडतो .

रक्तोरक्तस्नतीरक्ताद्‌द्वित्रिज : स्यात्तदन्वयै : ॥५॥

शारीरव्रणाच्या चवथ्या , पांचव्या व सहाव्या प्रकारांपैकी , पहिला रक्तजन्य व्रण ; यांत व्रणाचा वर्ण रक्तासारखा असून त्यातून रक्तस्राव होतो . दुसरा द्वंद्वज व्रण हा तीन दोषापैकी एक दोष व रक्त यांपासून उद्‌भवतो व तिसरा सान्निपातिक व्रण . तो दोन दोष व रक्त यांच्यासंबंधाने झालेला असतो .

सुखव्रणाचीं लक्षणें .

त्वङमांसज : सुखे देशे तरुणस्यानुपदुत : ॥

धीमतोऽभिनव : काले सुखे साध्य : सुखव्रण : ॥६॥

गुणैरन्यतमैर्हीनस्तत : कुच्छ्रो व्रण : स्मृत : ॥

सवैंर्विहीनो विज्ञेय : सोऽसाध्यो निरुपक्रम : ॥७॥

जो व्रण तरूण व वैद्यशास्त्राचे नियम जाणणार्‍या रोग्यास त्याच्या शरीरावरील मर्मस्थान सोडून स्वचा व मांस यांत होमंत अथवा शिशिर या ऋतूसारख्या सुखकर काळी झालेला व कोणत्याही उपद्रवाने रहित असा असेल तो सुखव्रण होय व तो साध्य आहे . या सर्व गुणांपैकी काही अभाव असल्यास तो कष्टसाध्य व्रण म्हणावा , आणि सर्वांचाच अभाव असल्यास तो व्रण असाभ्य जाणावा ,

दुष्टव्रणाचीं लक्षणें .

पूतिपूयातिदुष्टासृक्‌स्नाव्युत्सङ्गी चिरस्थिति : ॥

दुष्टव्रणोऽतिगन्धादि : शुद्धलिड्गविपर्यय : ॥८॥

ज्या व्रणांतून नेहमी नाप्तलेले रक्त व दुर्गंधयुक्त पू वहात असून आतून पोकळ पण वरून उंच दिसणारा आणि फार दिवस ( रोग्यास पीडा देत ) राहणारा व याशिवाय पुढे सांगितलेल्या शुद्ध व्रणाच्या सर्व लक्षणांनी रहित असा तो व्रण त्याला दुष्ट व्रण म्हणतात .

शुद्ध वणाचीं लक्षणें .

जिव्हातलाभोऽतिमृदु : श्लक्ष्ण : स्निग्धोऽल्पवेदन : ॥

सुव्यवस्थो निरास्नाव : शुद्धो व्रण इति स्मृत : ॥९॥

जिभेच्या वरच्या भागाप्रमाणे अत्यंत मऊ , गुळगुळीत , स्निग्ध , स्नाव न करणारा , व्यवस्थित असलेला ( उंच वगैरे नसलेला ) आणि थोडया वेदनायुक्त असा जो व्रण असेल तो शुद्ध व्रण जाणावा .

भरत असलेल्या व भरलेल्या व्रणाचीं लक्षणें .

कपोतवर्णर्पतिमा यस्थान्ता : क्लेदबर्जिता : ॥

स्थिराश्च पिटिकाबन्तो रोहतीति तमादिशेत्‌ ॥१०॥

रूढबर्त्मानमग्रस्थिमशूनमरूजं व्रणम्‌ ॥

त्वक्सवर्णं समतलं सम्यप्रढं तमादिशेत्‌ ॥११॥

व्रण भरत असता त्याच्या कडा स्थिर व पारख्या रंगाच्या असून त्यावर बारीक मोबोर उत्पन्न होतो आणि त्यातून वाहणारी लस बद होते , आणखो तो भरून आला म्हणजे खोलगटपणा व गाठ राहत नाही , सूज व ठणका नाहीसा होतो आणि रोग्याच्या त्वचेप्रमाणे त्याचा वर्ण असतो .

व्रणास असलेलें अपथ्य .

व्रणे श्वयथुरायासात्‌ स च रागश्च जागरात्‌ ॥

तौ च रुक्च दिवास्वापात्ताश्च मृत्युश्च मैथुनात्‌ ॥१२॥

व्रण उद्भवला असता रोग्याने श्रम केले तर त्याच्या जणास सूज येते , जागरण केले तर त्यास सूज येऊन तो तांबडा होतो ; दिवसा झोप घेतल्याने ( त्यास ) सूज व लाली येऊन शिवाय ठणका लागतो आणि त्याने स्त्रीसंग केला तर केवळ ( सूज , लाली व ठणका ) या तिन्ही प्रकारांनी न भागता त्यास मृत्यूच येतो .

व्रणाचें कष्टसाध्यत्व व असाध्यत्व .

कुष्ठिनां विषजुष्टानां शोषिणां मधुमेहिनाम्‌ ॥

व्रणा : कृच्छ्रेण सिध्यन्ति येषां चापि व्रणे व्रणा : ॥१३॥

वसां मेदोऽथ मज्जानं मस्तुलुङ्गं च य : स्नवेत्‌ ॥

आगन्तुजो व्रण : सिध्येन्न सिध्येद्दोषसम्भव : ॥१४॥

मद्यागुर्वाज्यसुमनापद्मचन्दनचम्पकै :

सगन्धादिव्यगन्धाश्च मुमुर्षूणां व्रणा : स्मृता : ॥१५॥

ये च मर्मस्वसम्भूता भवन्त्यथर्थवेदना : ॥

दह्यन्ते चान्त्रत्यर्थं बहि : शीताश्च ये व्रणा : ॥१६॥

दह्यन्ते बहिरत्यर्थं भवन्त्यन्तश्च शीतला : ॥

प्राणमांसक्षयश्वासकासारोचकपीडिता : ॥१७॥

प्रक्षृद्धपूवस्रधिर्रा व्रणा येपां च मर्मसु ॥

क्रियाभि : सम्यगारग्धा न सिद्ध्यान्ति च ये व्रणा : ॥

वर्जयेदेवतान्धैद्य : संरक्षन्नात्मनो यश : ॥१८॥

कुंडरोग , क्षय व मधुमेह , या रोगांनी वयपलेले आणि दुषित विषाने पीडित झालेले अशा रोग्यांचे व्रण व तसेच शरीरावर ज्या ठिकाणी पूर्वी उत्पन्न होऊन वरे झाले त्याच ठिकाणी पुन : उद्भवणारे असे व्रण हे कष्टसाध्य असतात . ज्या व्रणांतून

चरबी , मेद , मज्जा व डोक्यांतील मेंदू हे वहात असतात तो व्रण जर आगंतुक असेल तर साध्य होतो ; पण शारीरदोषज असला तर रोग्याचा प्राण घेतो . त्याचप्रमाणे ज्या जणास मद्य , धूप , तूप , फूल , कमल , चंदन , व सोनचाफा यासारखा अथवा दुसर्‍या एकाद्या दिव्य गधासारख्या सुवास येतो तो व्रणरोगी मरणोन्मुख जाणावा , याशिवाय शरीराच्या मर्मंस्थानी नसताही जे वेदना उत्पन्न करतात अथवा ज्यातून रक्त व पू यांचा अतिशय स्राव होत असतो , तसेच ज्यांच्या ( व्रणांच्या ) अंतर्याभी दाह असून बाहेर थंडावा असतो अथवा बाहेरून दाह होत असून अंतर्यामी थंडावा असतो हे व दुसरे जे उत्पन्न होऊन त्याच्या ( रोग्याच्या ) बलमांसाचा क्षय कस्तात व श्वास खोकला अरूचि या उपद्रवांनी त्यास पीडा देतात आणि त्याचप्रमाणे वैद्यशस्त्रोक्त योग्य उपचार केले असताही जे बरे होत नाहीत असे अति पू रक्तस्रावी व मर्मस्थानी झालेले ते सर्व शारीरव्रण असाध्य समजून वैद्याने त्यावर चिकित्सा करू नये त्यात त्यास यश येणे नाही .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP