अर्बुदरोगाची संप्राप्ति .
गात्रप्रदेशे व्कचिदेव दोषा : सम्मूर्छिता मांसमसृक प्रदूष्य ॥
वृत्तं स्थिरं मन्दरुजं महान्तमनल्पमूलं चिरवृद्धिपाकम् ॥१॥
कुर्वन्ति मांसोच्छ्र्यमत्यगाधं तदर्बुदं शास्त्रविदो वदन्ति ॥
वातादि दोष दूषित झाले असता ते रक्त व मांस यास दूषित करून शरीराच्या कोणत्याही भागावर जो मोठा , स्थिर , वाटोळा , मूळ खोल गोलेला , थोडी पीडा करणारा व तसाच चिरकालाने वाढणारा व न पिकणारा असा मांसोच्छ्रय ( मांसाचा गोळा ) उत्पन्न करतात त्यास वैद्य अर्बुदरोग असे म्हणतात .
अर्बुदरोगाचे प्रकार .
वातेन पित्तेन कफेन चापि रक्तेन मांसेन च मेदसा च ॥
तज्जायते तस्य च लक्षणानि ग्रन्थे : समानानि सदा भवन्ति ॥२॥
अर्बुदरोगाचे वातजन्य , पित्तजन्य , कफजन्य , रक्तजन्य , मांसजन्य , वमेदजन्य असे सहा प्रकारचा असून त्यांची लक्षणे मागे सांगितलेल्या त्या त्याप्रकारच्या ग्रंथिरोगाशी , नेहमी समान असतात .
असाध्य रक्तार्बुद .
दोष : प्रदुष्टो रुधिरं शिराश्च सङ्कुच्य सम्पीडय ततस्त्वपाकम् ॥
सास्नावमुन्नह्यति मांसपिण्डं मांसाङ्कुरैराचितमाशुवृद्धम् ॥३॥
करोतित्यजस्नं रुधिरप्रवृत्तिमसाध्यमेतदुधिरात्मकं तु ॥
रक्तक्षयोपद्रवपीडितत्वात्पाण्डर्भवेत्सोऽर्बुदपीडितस्तु ॥४॥
प्रकुपित असा दोष रोग्याच्या शिरांतील रक्ताचा संकोच करून व तो ( रक्त संकोचित केलेला ) शरीराचा भाग वेदनायुक्त करून तेथे जो मांसाचा गोळा उठवितो तो गोळा किंचित पिकणारा व किंचित सावणारा आणि तसाच मांसांकुरांनी व्यापलेला व लवकर वाढणारा असा असतो . या अर्बुदरोगांत निरंतर रक्त वहात असून हा असाध्य असतो व यामुळे ( अशा प्रकारच्या या रक्तार्बुदामुळे ) पीडित असलेला रोगी रक्तक्षयाच्या उपद्रवांनी पछाडल्यामुळे पांढरा फटफटीत पडतो .
असाध्य मांसार्बुद .
मुष्टिप्रहारादिभिरदिंतेऽङ्गे मांसं प्रदुष्टं जनयेद्धि शोथंम् ॥
अवेदनं स्निग्धमनन्यवर्णमपाकमश्मोपममप्रचाल्यम् ॥५॥
प्रदुष्टमांसंस्य नरस्य गाढमेतद्भवेन्मांसपरायणस्य ॥
मांसार्बुदं त्बेतदसाध्यमुक्तं साध्येष्वपीमानि तु वर्जयेच्च ॥६॥
सम्प्रस्त्रुतं मर्मसु यच्च जातं स्त्रोत : सुबा यच्च भवेदचाल्यम् ॥
नित्य मांस खाणारा व ज्याचे मांस बिवडले आहे अशा रोग्याचे शरीर मुष्टिप्रहारादिकांमुळे दुखावले गेले असतां त्यातील दूषित झालेले मांस ( शरीरावर ) तुळतुळीत , दगडासारखी कठीण व शरीराच्याच वर्णाची असून न दुखणारी , न हालणारी व न पिकणारी अशी जी सूज उत्पन्न करते तिलाच मांसार्बुद म्हणतात ; व हे ( दुषित मांसामुळे उत्पन्न झालेले ) मांसार्बुद खोल असून असाध्य असते . तसेंच साध्य अर्बुदां पैकीही निरंतर वहात असणारे , मर्मस्थानी उद्भवलेले , धमन्यांचे ठिकाणी झालेले किंवा स्थिर असणारे या चार प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारचे अर्बुद चिकित्सा करून साध्य होणारे नसते .
अध्यर्बुद व द्विरर्बुद .
यज्जायतेऽन्यत्खलु पूर्वजाते ज्ञेयं तदध्यर्बुदमर्बुदज्ञै : ॥
यद्द्वन्द्वजातं युगपत्क्रमाद्वा द्विरर्बुदं तच्च भवेदसाध्यंम् ॥७॥
पूर्वी ज्या ठिकाणी एक अर्बुद झालेले असते त्याच ठिकाणी जे दुसरे अर्बुद होते त्यास अध्यर्बुद असे म्हणतात ; व एकाच वेळी एका शेजारी जे दुसरे अर्बुद उद्भते त्यास द्विरर्बुद अशी संज्ञा देतात . या दोहोंपैकी द्विरर्बुद असाभ्य जाणावे .
न पाकमायान्ति कफाधिकत्वान्मेदोबहुत्वाच्च विशेषतस्तु ॥
दोषस्थिरत्वाद्ग्रथनाच्च तेषां सर्वार्बुदान्येव निसर्गास्तु ॥८॥
सर्वच अर्बुदे कफाच्या व विशेषेकरून मेदाच्या बाहुल्यामुळे व दोष घट्ट होऊन गाठळल्यामुळे पिकत नाहीत , अथवा न पिकणे हा त्यांचा स्वाभाविक धर्म होय . ( ज्यात रक्ताचा व पित्ताचा संबंध असतो ती अर्बुदेदेखील उशीराने पिकतात .)