संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
स्वरभेदनिदान

माधवनिदान - स्वरभेदनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


स्वरभेद रोगाचें कारण व प्रकार .

अत्युच्चभाषणविषाध्ययनाभिघात -

सन्दूषणै : प्रकूपिता : पवनादयस्तु ॥

स्नोत : सु ते स्वरवहेषु गता : प्रतिष्ठां

हन्यु : स्वरं भवति चापि हि षडिवध : स : ॥१॥

उंच स्वराने बोलणें , मोठयाने घोकणे , कंटस्थानी आधात करणे वि विष भक्षण करणे अशा दुष्ट कारणांमुळे रोग्याच्या शरीरातील वात , पित्त व कफ हे त्रिदोष प्रकोप पावून त्याच्या स्वरवाहिनी ज्या ( चार ) नाडया , त्यांत जातात व तेथे वाढून स्वराचा नाश करितात . या रोगास स्वरभेद रोग म्हणतात . याचे ( वातस्वरभेद , पित्तस्वरभेद . कफस्वरभेद , सन्निपातस्वरभेद , क्षयस्वरभेद आणि मेदस्वरभेद असे ) सहा प्रकार आहेत .

वातस्वरभेदाचीं लक्षणें .

वातेन कृष्णनयनाननमूत्रवर्चा .

भिन्नं स्वरं वदति गर्दभवत्‌ स्वरं च ॥

वातस्वरभेद झालेल्य रोग्याचे डोळे , तोंड , मूत्र व मल हे काळया रंगाचे असून त्याचा स्वर गाढवाच्या स्वराप्रमाणे कर्कश , फुटल्यासारखा असतो .

पित्तस्वरभेदाचीं लक्षणें .

पित्तेन पीतनयनाननमूत्रवर्चा

ब्रूयाद्नलेन स च दाहसमन्वितेन ॥२॥

डोळे , तोंड , मूत्र व मल पिवळया रंगाचे झाले असून रोग्यास बोलते वेळी गळयाचे ठायी दाह होत असला तर त्यास पित्तस्वरभेद झाला आहे म्हणून समजावे .

कफस्वरभेदाचीं लक्षणें .

ब्रूयात्कफेन संततं कफरुद्धकण्ठ :

स्वल्पं शनैर्वदति चापि दिवा विशेषात्‌ ॥

कफस्वरभेदांत रोग्याचा कंठ निरंतर कफाने भरलेला असून , तो हळूहळू व थोडे बोलतो व त्यात विशेषेकरून दिवसा तर फारच हळूहळू बोलतो .

सन्निपातस्वरभेदाचीं लक्षणें .

सर्वात्मके भवति सर्वविकारसम्पत्‌

तं चाप्यसाध्यमृषय : स्वरभेदमाहु : ॥३॥

वात , पित्त व कफ या तिन्ही दोषांपासून होणार्‍या स्वरभेदांची लक्षणे सन्निपात स्वरभेदांत असतात व हा रोग्यास झाला असतां असाध्य होतो असे वैद्यक जाणणारे ऋषि सांगतात .

क्षयस्वरभेदाचीं लक्षणें .

धुम्येत वाक्‌ क्षयकृते क्षयमाप्नुयाच्च

वागेष चापि हतवाक्‌ परिवर्जनीय : ॥

रोग्यास क्षयजन्य स्वरभेद झाला असता तो बोलतेवेळी घशातून धूर निघाल्याचा त्याला भास होतो व त्याचा स्वर क्षीण होतो . स्वर नष्ट झालेला हा रोग असाध्य असतो .

मेदजन्यस्वरभेदाचीं लक्षणें .

अन्तर्गतस्वरमलक्ष्यपदं चिरेण

मेदोऽन्वयाद्वदति दिग्धगलस्तृषार्त : ॥४॥

रोग्याचा गळा कफ आणि मेद यांनी दाटणे व त्यामुळे स्वरवाहिनी नाडयांचा रोध होऊन तो उशिरा बोलतो व बोलत असता त्याचा शब्द खोल जाणे ( म्हणजे त्याचा स्पष्ट उच्चार न होणे ) गळा लेप बसल्यासारखा होणे व फार तहान लागणे , या प्रकाराची असतात .

स्वर - भेदाचीं असाध्य लक्षणें .

क्षीणस्य वृद्धस्य कृशस्य चापि

चिरोत्थितो यस्य सहोपजात : ॥

मेदस्विन : सर्वसमुद्भवश्च

स्वरामयो यो न स सिद्धिमेति ॥५॥

व्रद्ध . कृश व रोगामुळे क्षीण झालेल्या पुरूषाचा , मेद झालेल्याचा , फार दिवसांचा आणि तसाच जन्मापासून असलेला किंवा सन्निपातापासून उद्भवलेला असा स्वरभेद रोग असाध्य होय .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP