देवीचीं कारणें .
कट्वस्ललवणक्षारविरुद्धाध्यशनाशनै : ॥
दुष्टनिष्पावशाकाद्यै : प्रदुष्टपवनोदकै : ॥१॥
क्रुद्धग्रहेक्षणाच्चापि देशे दोषा : समुद्धता : ॥
जनयन्ति शरीरेऽस्मिन् दुष्टरक्तेन सङ्गता : ॥२॥
संप्राप्ति व प्रकार , मसूराकृतिसंस्थाना : पिडका : स्युर्मसूरिका : ॥
तिखट , आंबट , खारट व क्षार पदार्थ खाणे , संयोगविरूद्ध पदार्थ व त्याचप्रमाणे नासलेले अन्न व वाल , वाटाणे , उडीद वगैरे कडधान्य बक्षण करणे , जेवणावर जेवणे , वायु आणि पाणी बिघडणे आणि शनि वगैरे दुष्ट ग्रहाची प्रतिकूलता होणे या सर्व कारणांमुळे वातादि दोष प्रकुपित झाले असता ते दुष्ट रक्ताअशी मिळून रोग्याच्या शरीस्भर मसुराच्या दाण्याएवढया व तशाच वर्णाच्या ज्या पुळया उत्पन्न करतात त्यांना प्रसुरिका अथवा देवी असे म्हणतात . या तिन्ही दोषांपासून पृथक पृथक होणार्या अशा तीन , सान्निपातिक एक , रक्तजन्य एक , रक्तजन्य एक , चर्मपिटिका एक आणि रोमांतिक ( गोवर ) एक मिळून एकंदर सात प्रकारच्या असतात .
देवींचें पूर्वरूप .
तासां पूर्वं ज्वर : कण्डूर्गात्रभङ्गोऽरुचिर्भ्रम : ॥३॥
त्वचि शोफ : सवैवर्ण्यो नेत्ररागस्तथैव च ॥
देवी उत्पन्न होण्यापूर्वी रोग्यास प्रथम ताप येतो , अंगास कंड सुटते व ते फुटू लागते . त्वचैचा वर्ण बदलतो व ती सुजते आणि तसेच त्यास अरुचि होते घेरी येते व त्याचे डोळे लाल होतात .
वातजन्य देवींचीं लक्षणें .
स्फोटा : कृष्णारुणा रुक्षास्तीव्रवेदनयान्विता : ॥४॥
कठिनाश्चिरपाकाश्च भबन्त्यनिलसंम्भवा : ॥
सन्ध्यस्थिपर्वणां भेद : कास : कम्पोऽरति : क्लम : ॥५॥
शोषत्ताल्वोष्टजिव्हानां तृष्णा चारुचिसंयुता ॥
वातजन्य देवीमध्ये रोग्याच्या शरीरावर उद्भवलेल्या काळया पुळया व तांबूस वर्णाच्या , रूक्ष , कठिण व लौकर न पिकणार्या अशा असून त्यांना अत्यत ठणका असतो व त्यांमुळे सांधे , हाडे व बोटाची पेरी ही फुटतात ; अंग कापते , खोकला येतो , अरुचि उत्पन्न होते , टाळू , ओठ व जीभ यास कोरड पडते , तहान . लागते , आयासावाचून त्यास थकवा येतो व अस्वस्थपणा वाटतो .
पित्तजन्य देवींचीं लक्षणें .
रक्ता : पतिऽसिता : स्फोटा : सदाहास्तीव्रवेदना : ॥६॥
भवन्त्यचिरपाकाश्च पित्तकोपसमुद्भवा : ॥
विटभेदश्चाङ्गमर्दश्च दाहस्तृष्णऽरुचिस्तथा ॥७॥
मुखपाकोऽक्षिपाकश्च ज्वरस्तीव्र : सुदारुण : ॥
पित्तजन्य देवीमध्ये रोग्याच्या शरीरावर उद्भवलेल्या पुयळा तांबडया , पिवळया व काळया वर्णाच्या अशा असून त्यांना ठणका व दाह अत्यंत असतो व त्या लौकर पिकतात , यापासून रोग्यास भयंकर ताप येतो , त्याच्या तोंडास व डोळयास पिकलेले फोड येतात , अंग मोडून येऊन त्याचा दाह होतो व त्याचप्रमाणे अरुचि , तहान व शौचास पातळ होणे ही लक्षणे होतात .
रक्तजन्य देवी .
रक्तजायां भवन्त्येते विकारा : पित्तलक्षणा : ॥८॥
वर सांगितलेले पित्तजन्य देवीचे सर्व प्रकार व लक्षणे हीच रक्तजन्य देवी आल्या असता द्दष्टीस पडतात .
कफजन्य देवींची लक्षणें .
कफप्रसेक : स्तैमित्यं शिरोरुग्गात्रगौरवम् ॥
ह्रल्लास : सारुचिर्निद्रा तन्द्रालस्यसमन्विता : ॥९॥
श्वेता : स्निंग्धा भृंशं स्थूला : कण्डूरा मन्दवेदना : ॥
मसूरिका : कफोत्थाश्च चिरपाका : प्रकीर्तिता : ॥१०॥
कफजन्य देवीतील फोड फार मोठे , पांढरे , तुळतुळीत व त्याचप्रमाणे किंचित् ठणका होणारे पण फार खाजणारे व फार दिवसांनी पिकणारे असे असून या रोगात रोग्याच्या तोंडातून कफ पडतो , अंग चिधळते व ओले वस्र गुंडाळल्यासारखे होते ; त्यास आळस येतो आणि उम्हासे , अरुचि , झोप व झापड या लक्षणांनी तो युक्त असतो .
सान्निपातिक देवी .
नीलाश्विपिटविस्तीर्णा मध्ये निम्ना महारुजा : ॥
चिरपाका : पूतिस्रावा ; प्रभूता : सर्वदोषजा : ॥११॥
सान्निपातिक देवीचे फोड रोग्याच्या शरीरावर फार दाट येतात व ते निळया वर्णाचे , पोह्यासारखे चपटे , पसरट व मध्यभागी खोलगट अशा प्रकारचे असून त्यांस अत्यंत ठणका लागलेला असतो व त्यांचा पाक फार दिवसांनी होऊन त्यांतून दूर्गंधयुक्त पुवाचा स्राव होतो .
चर्मपिटिका .
कण्ठरोधोऽरुविस्तन्द्राप्रलापारतिसंयुता : ॥
दुश्चिकित्स्या : समुद्दिष्टा : पिडकाश्चर्मसंज्ञिता : ॥१२॥
ज्या देवींच्या फोडामुळे रोग्याचा घसा घरतो व अरुचि , झापड , बडबड व अस्वस्थपणा या लक्षणांनी तो पीडित होतो त्यास चर्मपिटिका अशी संज्ञा असून त्याची चिकिस्सा करणे कठिण पडते .
रोमांतिक अथवा गोवर ,
रोमकूरोन्नतिसमा रागिण्य : कफपित्तजा : ॥
कासापोचकसंयुक्ता रोमान्त्यो ज्वर र्विका : ॥१३॥
रोग्यास प्रथम ताप येऊन मग त्याच्या शरीरावर केसांची छिद्रे उंचावून जो बारीक व तांबडया वर्णाचा पुर्ळ येतो त्यास रोमांतिक अथवा गोवर असे म्हणतात . हा तुरळक असतो व कफपित्त याच्या प्रकोपापासून उद्भवतो व हा उद्भवल्यावर त्याच्या तोंडाची चव जाते व त्यास खोकला उत्पन्न होतो .
येथपर्यंत देवींचे प्रकार व त्यांची लक्षणे सांगितली ; आता त्या देवी रसादि सप्तधातूंशी संयुक्त झाल्यामुळे जे प्रकार होतात ते क्रमाने खाली सांगितल्याप्रमाणे जाणावे .
रसगत देवींचीं लक्षणें .
तोयबुद्बुदसंकाशास्त्वग्गताश्च मसूरिका : ॥
स्वल्पदोषा : प्रजायन्ते भिन्नास्तोयं स्नवन्ति च ॥१४॥
रस ( त्वचा ) गत देवी पाण्याच्या बुडबुडयासारख्या असून त्या फुटल्या असता त्यांतून ( फोडातून ) पाणी वाहते . या देवी अल्प दोषयुक्त असल्यामुळे सुसाध्य असतात .
रक्तगत देवींचीं लक्षणें .
रक्तस्था लोहिताकारा : शीघ्रपाकास्तनुत्वच : ॥
साध्या नात्यर्थदुष्टाश्च भिन्न रक्तं स्रवन्ति च ॥१५॥
रक्तगत देवी तांबडया वर्णाच्या व लौकर पिकणार्या व पातळ त्वचेच्या अशा असून त्या फुटल्या असता त्यातून रक्त वाहते . या रक्त फार बिघडले नसल्यास साध्य होतात .
मांसगत देवींचीं लक्षणें .
मांसस्था : कठिना : स्निग्धाश्चिरपाकास्तनुत्वच : ॥
गात्रशूलोऽरति : कण्डूर्मूर्च्छादाहतृषान्विता : ॥१६॥
मांसगत देवी या कठिण , तुळतुळीत , पातळ स्वचेच्या व फार दिवसांनी पिकणार्या अशा असून या झालेल्या रोग्याच्या अंगास कंड सुटते व कळा लागतात आणि याशिवाय मूर्च्छा , तहान , दाह व अस्वस्थपणा ही लक्षणेही द्दष्टीस पडतात .
मेदोगत देवींची लक्षणें .
मेदोजा मण्डलाकारा : मृदव : किञ्चिदुन्नता : ॥
घोरज्वरपरीताश्च स्थूला : कृष्णा : सवेदना : ॥
सम्मोहारतिसन्तापा : कश्चिदाभ्योविनिस्तरेत् ॥१७॥
मेदोगत देवी या वाटोळया , किंचित वर उचललेल्या , फुगलेल्या , मऊ व काळया दर्णाच्या असून त्यांच्या फोडास ठणका असतो व या उद्भवलेल्या रोग्याच ठिकाणी दाह , भयंकर ताप , इंद्रिये व मन यास व्याकुलपणा व अस्वस्थता ही लक्षणे द्दष्टीस पडतात . या अत्यंत कष्टसाध्य असल्यामुळे एखादाच रोगी यातून क्वचित पार पडतो .
मज्जागत व अस्थिगत देवींचीं लक्षणें .
क्षुद्रा गात्रसमारूढाश्चिपिटा : किञ्चिदुन्नता : ॥
मज्जोत्था भृशसम्मोहवेदनारतिसंयुता : ॥१८॥
छिन्दन्ति मर्मधामानि प्राणानाशु हरन्ति ता : ॥
भ्रमरेणेव विद्धानि भवन्त्यस्थीनि सर्वत : ॥१९॥
अस्थि व मज्जागत झालेल्या देवी बारक्या चिपटया , किंचित् वर आलेल्या पण बहुतेक अंगासरशा अशा असून त्यांस ठणका असतो व त्या अस्थींना भुंग्याने पोखरल्याप्रमाणे वेदना होतात ; तसेच यांच्यामुळे रोग्याच्या मनास ग्लानि व अस्वस्थपणा येतो व या ( देवी ) शेवटी त्याच्या मर्माचा भेद करून प्राण घेतात .
शुक्रगत देवींचीं लक्षणें .
पक्वाभा : पिडका : स्निग्धा : श्लक्ष्णाश्चात्यर्थवेदना : ॥
स्तैमित्यारतिसम्मोहदाहोन्मादस्र मान्विता : ॥२०॥
शुक्रजायां मसूर्यां तु लक्षणानि भवन्ति च ॥
निर्दिष्टं केवलं चिन्हं द्दश्यते न तु जीवितम् ॥२१॥
शुक्रगत देवी तुळतुळीत , गुळगुळीत व पिकल्याप्रमाणे दिसतात आणि त्यांस अत्यंत ठणका असून त्या दाह , ओले वस्त्र गुंडाळल्यासारखे वाटणे , मूर्च्छा , उन्माद व अस्वस्थपणा या लक्षणांनी रोग्यास पीडा देतात , या असाध्य आहेत .
दोषमिश्रास्तु सप्तैता द्रष्टव्या दोषलक्षणै : ॥
आता सांगितलेल्या निरनिराळया लक्षणांच्या सप्तधातुगत देवींमध्ये ( वर सांगितलेल्या ) वातादि दोषांपकी ज्या दोषांची लक्षणे द्दष्टीस पडतील त्या दोषाने त्या मिश्रित झाल्या आहेत म्हणून समजावे .
त्वग्गता रक्तजाश्वैव पित्तजा : श्लेष्मजास्तथा ॥२२॥
पित्तश्लेष्मकृताश्वैव सुखसाध्या मसूरिका : ॥
एता विनापि क्रियया प्रशाम्यन्ति शरीरिणाम् ॥२३॥
वातजा वातपित्तोत्था वातश्लेष्मकृताश्च या : ॥
कृच्छ्रसाध्यामतात्तास्तु यत्नादेता उपाचरेत् ॥२४॥
असाध्या : सन्निपातोत्थास्तासां वक्ष्यामि लक्षणम् ॥
प्रवालसद्दशा : काश्चित् काश्चिज्जम्बूफलोपमा : ॥२५॥
लोहजालसमा : काश्चिदतसीफलसन्निभा : ॥
आसां बहुविधा वर्णा जायन्ते दोषभेदत : ॥२७॥
कासो हिक्का प्रमोहश्च ज्वरस्तीव्र : सुदारुण : ॥
प्रलापारतिमूर्च्छाश्च तृष्णादाहोऽतिघूर्णता ॥२७॥
मुखेन प्रस्नवेद्रक्तं तथा घ्राणेन चक्षुषा ॥
कण्ठे घुर्घुरकं कृत्वा श्वसित्यत्यर्थदारुणम् ॥२८॥
मसूरिकाभिभूतो यो भृशं घ्राणेन नि : श्वसेत् ॥
स भृशं त्यजति प्राणान् तृष्णार्तो वायुदूषित् ॥२९॥
सर्वं प्रकारच्या देवींपैकी रस व रक्तगत झालेल्या व त्याचप्र मा णे पित्तजन्य , कफजन्य व पित्तकफजन्य ज्या देवी असतात त्या साध्य असून औष धा वाचून वर्या होणार्या असतात व तशाच वातजन्य , वातपित्तजन्य व वातकफजन्य असलेल्या देवी कष्टसाध्य असून चिकित्सा केली असता बर्या होतात , पण ज्या देवी सान्निपातिक असून दोषमे दा ने भिन्न भिन्न वर्णाच्या म्हणजे काही पोवळयासारख्या लाल वर्णाच्या , काही जांभळासारख्या निळया वर्णाच्या , व काही लोखंडी गोटयासारख्या काळया व र्णा च्या व काही जवसाच्या बोंडासारख्या चमत्कारिक अशा होतात त्या असाध्य असतात . या देवीरोगाने पीडित झालेल्या रोग्याचे ठिकाणी जेव्हा भयंकर ताप , दाह , खोकला , तहान , उचकी , मूर्च्छा , बडबड व अस्वस्थपणा ही लक्षणे उत्पन्न होऊन तो डोळे वेडेवाकडे फा डतो , त्याचे तोंड , नाक व डोळे यांवाटे रक्त वाहते , त्यास दम लागातो व घसा घुरघुरतो , तो वायूने पीडित होतो व त्यास शोष पडतो आणि तो केवळ नाकाने श्वास टाकतो तेव्हा तो तात्काळ प्राण सोडतो .
मसूरिकान्ते शोथ : स्यात् कूर्परे मणिबन्धके ॥
तथांसफलके चापि दुश्चिकित्स्य सुदारूण : ॥३०॥
देवी य़ेऊन गेल्यानंतर रोग्याचे कोपर व मनगट अथवा खांदा यावर सूज येते , ती असाध्य असते . आपल्यात तिला गुरु म्हणतात .