उर : क्षत रोगाचीं कारणें व लक्षणें .
धनुषाऽऽयस्यतोऽत्यर्थं भारमुद्वहतो गुरुम् ॥
युध्यमानस्य बलिभि : पिततो विषमोच्चत : ॥ १ ॥
वृषं हयं वा धावन्तं दम्यं चान्पं निगृण्हत : ॥
शिलाकाष्ठाश्मनिर्घातान क्षिपतोनिघ्नत : परान् ॥ २ ॥
अधीयानस्य वाऽत्युच्चैर्दूरै वा वज्रतो ढुतम् ॥
महानदीवी तरतो हयैर्वा सह धावत : ॥ ३ ॥
सहसोत्पततो दुरात्तूर्णं वातिप्रनृत्यत : ॥
तथान्यै कर्मभि : ऋरैर्भृशमभ्याहतस्य च ॥ ४ ॥
विक्षते वक्षसि व्याधिर्बलवान् समुदीर्यते
स्त्रीषु चातिप्रसक्तस्य रुक्षाल्पप्रमिताशन : ॥ ५ ॥
उरो विभज्यतेऽत्यर्थं भिद्यद्यतेऽथ विरुज्यते ॥
प्रपीडयते तदा पार्श्वे शुष्यत्पङ्गं प्रवेपते ॥ ६ ॥
क्रमाद्वीर्यं बलं वर्णो रुचिरग्निश्च हीयते ॥
ज्वरो व्यथा मनोदैन्यं विदभेदोऽग्निवधादपि ॥ ७ ॥
दुष्टश्याव : सुदुर्गन्धि : पीतो विग्रथितो बहु : ॥
कासमानस्य वार्भाक्ष्णं कफ : सास्र : प्रवर्तते ॥ ८ ॥
स क्षयी क्षीयतेऽत्यर्थं तथा शुक्रोजसो : क्षयात् ॥
अव्यक्तलक्षणं तस्य पूर्वरूपमिति स्मृतम् ॥ ९ ॥
घनुष्य ओढण्याचा अभ्यास करणारा , अत्यंत जड ओझे वाहणारा , शक्तिमान् पुव्घाशी बुद्ध करणार , उंचावरून खाली पडणारा , बैल . घोडा , हत्ती , उंट वगैरे जनावर धावत असता त्यांस मध्येच धरून आवरणारा , दगड , लांकूड , शिला व अस्त्र वगैरे फेकणारा व शत्रूस ठोकणारा , उंच स्वराने धोकणारा , लांब व जलद पळणारा , महानदीत पोहयासा घोडयाबरोबर धांवणरा ; उंचावरून उडी मारणारा , लौकर लौकर नाचणारा , आणि याच प्रकारची दुसरी उरांत फुटल्यासारखी भयंकर साहसाची कृत्ये करणारा ; तसाच अत्यत स्त्रीसंभोग करणारा व रुक्ष आणि थोडे अन्न खाणारा अशा पुरुषाचे त्या त्या कारणामुळे ऊर दुखावले असतां उर : क्षत रोग उत्पन्न होतो . यांत ऊर फुरल्यासारखे किंवा पुढुत दोन भाग झाल्यासाखे त्यास वाटते व त्याच्या ठायी अत्य्म्त वेदना होतात नंतर बरगडयांत दुखूं लागते , अंग कृश होते व थस्थर कांपते आणि क्रमाने बल , मांस , वर्ण रुचि वजठरग्नि हें क्षीण होत जातात . शिवाय ज्वर असणे , मलास औदासिन्य य़ेणे , मळ पातळ होणे , ठिकठिकाणी वेदना होणे आणि खोकताना तोंडावाटे दूषित , दुर्गंधियुक्त , काळसर , पिवळा गांठाळलेला आणि रक्तमिश्रित असलेला अम्रा पुष्कळ कफ पडणे ही लक्षणे त्याच्या ठायी उत्पन्न होतात आणि क्षतामुळे व ( स्वीसंओग केला असता ) शुक्र व ओज ( शरीरांतील सर्व धातूंचे तेज ) यांचा क्षय झाल्यामुळे तो उर : क्षतरोगी अत्यंत क्षीण होतो . या ( उर : क्षत ) रोगाच्या पूर्वरूपाची लक्षणे अस्यष्ट असतात .