तृष्णेची संप्राप्ति .
भयश्रमाभ्यां बलसंक्षयाद्वाप्यूर्ध्वं चितं पित्तविवर्धनैश्च ॥
पित्तं सवातं कुपितं नराणां तालुप्रपन्नां जनयेत्पिपासाम् ॥१॥
भय , श्रम किंवा बलक्षय या कारणांमुळे व दुसर्या उपवास वगैरे पित्तवर्धक कारणांच्या सेवनामुळे , वातदोषासहित कुपित झालेले पित्त ऊर्ध्वगति होऊन रोग्याचा ताडुस्थानीं जाते व तृष्णारोग उत्पन्न करिते .
तृष्णेचे सात प्रकार , स्नोतस्वपांवाहिषु दूषितेषु दोषैश्च तृष्णा भवतीह जन्तो ॥
तिन्न : स्मृतास्ता : क्षतजा चतृथी क्षयात्तथा ह्यामसमुद्भवा च ॥२॥
भक्तोद्भवा सप्तमिकेति तासां निबोधलिङन्यनुपूर्ववशश्च ॥
तृष्णारोगाचे सात प्रकार आहेत ते --- वात , पित्त व कफ या तिन्ही दोषांच्या प्रको पा पासून पृथक् पृथक् होणारे तीन व क्षत , क्षय , आम आणि अन्न या प्रत्येकापासून होणारा एकेक असे चार , मिळून सात जाणावे , या सर्वांची लक्षणे पुढे अनुक्रपाने सांगितली आहेत . उदकवाहिनी ना डी दूषित झाल्या असता अन्न , कफ व आम यांपासून तृष्णारोग उत्पन्न होतो .
वातजन्य तृष्णा .
क्षामास्यता मारुतसम्भवायां तोदस्तथा शङ्खशिर : सु चापि ॥
स्नोतोनिरोधो विरसं च वक्त्रं शीताभिरद्भिश्च विवृद्धिति ॥३॥
वातदोषामुळे होणार्या तृष्णांरोगांत रस व उद वाहिनी नाडयांचा रोध होतो , आणि तोंड सुकणे व बेवव होणे , थंड पाणी प्याले असतां तहान अधिक लागंणे व कानशिले आणि मस्तक यांत सुया टोचल्यासारख्या वेदना होणे ही लक्षणे रोग्याच्या ठायी उत्पन्न होतात .
पित्तजन्य तृष्णा ,
मूर्च्छान्नविद्वेषविलापदाहा रक्तेक्षणत्वं प्रततश्च शोष : ॥
शीताभिनन्दा मुखतिक्तता च पित्तात्मिकायां परिदूयनं च ॥४॥
पित्तजन्य तृष्णारोग रोग्याच्या ठायी मूर्च्छा , अन्नद्वेष , बडबड , दाह , डोळयास लाली , तोंडास कडवटपणा , पाण्याचा सतत शोष , संताप व थंड पदार्थ सेवनाची इच्छा अशा प्रकारची लक्षणे उत्पन्न करितो .
कफजन्य तृष्णा ,
बाष्पावरोधात्कफसंवृतेऽग्नौ तृष्णाबलातेन भवेत्तथा तु ॥
निद्रागुरूत्वं मधुरास्यता च तृष्णार्दित : शुष्यति चातिमात्रम् ॥५॥
प्रकोप पावलेल्या कफामुळें जठराग्नि आच्छादित होऊन त्याच्या उष्णतेचा अवरोध झाला असतां ( उदकवाहिनी नाडयांचे शोषण होऊन ) कफजन्य तृष्णारोग उत्पन्न होतो , या रोगांत झोंप , जाडय व तोंडास गुळचटपणा ही लक्षणे रोग्याच्या ठायी उत्पन्न होऊन त्यास फार पीडा करितात व तो अत्यंत शुष्क होतो .
क्षतस्य रुक्शोणितनिर्गमाभ्यां तृष्णा चतुर्थी क्षतजा मता तु ॥६॥
चवथ्या प्रकारचा जो क्षतजन्य तृष्णारोग तो रोग्याच्या ठायी ( शस्त्रादिकांच्या प्राहारामुळें ) क्षत पडून होणारी पीडा व रक्तस्राव या कारणांमुळें उत्पन्न होतो .
क्षयजन्य तृष्णा .
रसक्षयाद्या क्षयसम्भवा सा तयाभिमूतस्तु निशादिनेषु ॥
पेपीयतेऽम्भ : स सुखं न याति तां सन्निपातादिति केचिदाहु : ॥७॥
रसक्षयोक्तानि च लक्षणानि तरयामशेषेण भिषग्व्यवस्येत् ॥
क्षयजन्य तृष्णारोग हा कोणी सन्निपातामुळे होतो असे म्हणतात ; परंतु रोग्याच्या शरीरांतील रसांच्या क्षयामुळें हा रोग होतो ; कारण रसक्षयाची सांगितलेली सर्व लक्षणे यांत आलेली असतात ती वैद्यानी जाणावी . या रोगांत रोगी अहोरात्र वारंवार पाणी पितो तरी त्याची तहान पुरी होत नाही .
त्रिदोषलिङ्गामसमुद्भवा तु हृच्छूलनिष्ठीवनसादकर्त्री ॥८॥
आमजन्य तृष्णारोगात वात , पित्त व कफ या तिन्ही दोषांपासून होणार्या तृष्णारोगाची लक्षणे रोग्याच्या ठायी असून शिवाय हृदयांत वेदना , लाळ गळणे व ग्लानि येणे हे प्रकार द्दष्टीस पडतात .
स्निग्धं त्थाग्लं लवणं तु भुक्त गुर्वन्नमेवाशु तृषं करोति ॥
स्निग्ध , आंवट , जड , खारट असे अन्न अतिरिक्त सेवन केल्याने तत्काळ अन्नजन्य तृष्णारोग उत्पन्न होतो .
उपसर्गजन्य तृष्णा ,
दीनस्वर : प्रताम्यत् दीनाननशुष्कह्रदयगलतालु : ॥९॥
भवति खलु सोपसर्गात्तृष्णा सा शोषिणी कष्टा ॥
ज्वरमोहक्षयकासश्वासाद्युपसृष्टदेहानाम् ॥१०॥
वर सांगितलेल्या तृष्णारोगाच्या सात प्रकारांशिवाय उपसर्गापासून जो उद्भवतो त्यांत रोग्याचा शब्द खोल जातो , तो मूर्च्छा पावतो , त्याच्या मनास ग्लानि येते व त्याचे ह्रदय , घसा व टाळू यांस कोरड पडते . हा प्रकार ज्वर , मूर्च्छा , क्षय , खोकला , श्वास वगैरे रोगांपासून उत्पन्न होतो . यांत रोगामुळे आधीच त्याचे शरीर क्षीण झालेले असते व तशांत हा प्रकार उत्पन्न होऊन त्यास अगदी क्षीण करून टाकतो . मग यांतून तो रोगी वांचलाच तर मोठया कष्टाने वांचंतो .
असाध्य तृष्णा .
सर्वास्त्वतिप्रसक्ता रोगकृशानां वमिप्रसक्तानाम् ॥
घोरोपद्रवयुक्तास्तृष्णा मरणाय विज्ञेया : ॥११॥
रोग्याच्या ठायी वातादि सर्व प्रकारच्या दोषांपैकी कोणत्याही दोषापासून उत्पन्न होऊन अत्यंत वाढलेला , वांतीपासून झालेला , भयंकर उपद्रवाने युक्त असलेला अथवा रोगाने शरीर क्षीण झाले असता जडलेला अशा प्रकारचा तृष्णारोग त्याच्या मरणास कारण होतो .