छर्दीचे प्रकार .
दुष्टैर्दोषै : पृथक् सर्वेर्बीभत्सालोकनादिभि : ॥
छर्दय : पञ्च विज्ञेयास्तासां लक्षणमुच्यते ॥१॥
वात , पित्त व कफ यांच्या प्रकोपामुळे पृथक् पृथक् होणारे तीन , तिन्ही दोष मिळून होणारा एक व ओंगळ पदार्थ खाणे , पाहणे अथवा हुंगणे यामुळे उत्पन्न होणारा एक मिळून छर्दिरोगाचे पांच प्रकार असतात ; त्यांची लक्षणे पुढे सांगितली आहेत .
छर्दीची कारणे .
अतिद्रवैरतिस्निग्धैरहृद्यैर्लवणैरपि ॥
अकाले चातिमात्रैश्च तथाऽसात्म्यैश्चभोजनै : ॥२॥
श्रामाद्भयादथोद्वेगादजीर्णात्कृमिदोषत : ॥
नार्याश्चापन्नसत्वायास्तथातिद्रुतमश्नत : ॥३॥
बीभत्सैर्हेतुभिश्चीन्यैदृतमुत्क्लेशितो बलात् ॥
छादयन्नाननं वेगैरर्दयन्नङ्गभञ्जनै : ॥४॥
निरुच्यते छर्दिरिते दोषो वक्त्रं प्रधावति ॥
अत्यंत पातळ , अत्यंत स्निग्ध , न आवडणारे व खारट पदार्थ सेवन केल्यामुळे , अवेळी किंवा अतिरिक्त असे भोजन केल्यामुळे , न सोसणारे अन्न खाल्लयामुळे , घाईने जेवल्यामुळे , आणकी इतरही अजीर्ण अथवा कृमि झाल्यामुळे , स्त्रीच्या ठायी गर्म राहिल्यामुळे , कोणत्याहि बीमत्स कारणानें शिसारी आल्यामुळे आणि तसेच ओंगळवाण्या कारणांनी डुष्ट झालेले वातादिक दोष आपले स्थान सोडून झटकन् वर तोंडाकडे धांव घेतात , शरीर तोडतोडून व्याकुळ करितात व तोंडावाटे बाहेर पडतात . या प्रकारच्या होणार्या रोगास छर्दि ( ओकारी ) असे म्हणतात .
छर्दिचे पूर्वरूप
ह्रल्लासोद्नरसंरोधौ प्रसको लवणस्तनु : ॥
द्वेषोऽन्नपाने च भृशं वमीनां पूर्वलक्षणम् ॥५॥
तोंडास मळमळ व खारट व पातळ पाणी सुट्णे , ढेकर न येणे आणि अन्न व पाणी यांचा द्वेष उत्पन्न होणे या प्रकारची लक्षणे वांती होण्यापूर्वी रोग्याच्या ठायीं उत्पन्न होतात .
वातछर्दीची लक्षणें .
ह्रत्पार्श्वपीडामुखशोषशर्षिनाभ्यर्तिकासस्वरभदेतोदै : ॥
उद्नारशद्वप्रबलं सफेन विच्छिन्नकृष्णं तनुकं कषायम् ॥६॥
कृच्छ्रेण चाल्पं महता च वेगेतार्तोऽनिलाच्छर्दयतीह दुःखम् ॥
वातदोषामुळें छर्दि ( वांती ) झाली असता रोग्याचे ह्र्दय व बरगडया यांत दुखते , डोके आणि नाभी यांत शूल उत्पन्न होतो , सर्व शरीरांत सुया टोचल्याप्रमाणे वेदना होतात व तसेच तोंडास कोरड , स्वरभेद आणि खोकला ही लक्षणे असतात . याशिवाय त्यास वांती होते ती मोठया वेगाची असून ती होते वेळी त्यास दु : ख फार होते . ढेकर व शब्द पुष्कळ उत्पन्न होतात ; ती राहू न कष्टाने होते किंवा थोडी होते . तसेच ही पातळ व तुरट असते आणि तिचा रंग काळा असून तिच्या ठायी फेस पुष्कळ असतो .
पित्तछर्दिची लक्षणें .
मूर्च्छापिपासामुखशोषशीर्षताल्वक्षिसन्तापतमाभ्रेमार्त : ॥
पीत्तं भृशोष्णं हरितं सतिक्तं धूम्रं च पित्तेन वमेत्सदाहम् ॥७॥
पित्तदोषामुळे होणारी वांती पिवळी , हिरवी , कडवट , धुरकट , कढत व दाह करणारी असते . रोग्याचे ठायी तहान , तोंडास कोरड , डोळ्यास अंधारी , चक्कर आणि डोके , टाळू व डोळे यांचा संताप ही लक्षणे द्दष्टीस पडतात .
कफछर्दीचिं लक्षणें .
तन्द्रास्यमाधुर्यकफप्रसेकसन्तोपनिद्राऽरुचिगौरवार्त : ।
रिनग्धं घनं स्वादु कफाद्विशुद्धं सरोमहर्षोऽल्परूजं वमेत्तु ॥८॥
कफदोषापासून जी वांती होते ती स्निग्ध . घट्ट , पांढर्या रंगाची व तोंडास गोड करणारी असते ; ती होते वेळी रोग्यास वेदना थोडया होतात , पण त्याच्या अगांवर शहारे येतात ; शिवाय त्याच्या ठायी झांपड व झोप येणे , तोंड बेचव व गोड होणे , अंग जड होणें . कफ पडणे व अन्नावर वासना नसणे या प्रकारची लक्षणे उत्पन्न होतात .
सन्निपातछर्दीचीं लक्षणें .
शूलाविपाकाऽरूचिदाहतृष्णा
श्वासप्रमोहप्रबला प्रप्तक्तम् ॥
छार्दीस्त्रिदोषाल्लवणाम्लनील -
सान्द्रोष्णरक्त वमतां नृणां स्यात् ॥९॥
रोग्यास सन्निपातापासून होणारी वांती एकसारखी होत असून ती खारट , आंबट ’ घट्ट , ऊन , लाल आणि निळया रंगाची व जोराची अशी असते . ती झाली असता शूल , अन्नाचे अपचन , अरुचि , दाह , तहान , श्वास व मूर्च्छा ही लक्षणे त्याच्या ठायी उत्पन्न होतात .
आगंतुक छर्दि .
बीभत्सजा दोहदजाऽमजा च
याऽसात्म्यजा वा कृमिजा च याही ॥
सा पञ्चमी तां च विभावयेत्तु
दोषोच्छ्र्येणैव यथोक्तमादौ ॥१०॥
आतां पांचव्या प्रकारची जी आगंतुक वांती ती घाणरडे पदार्थ पाहणे , खाणे किंवा हुंगणे या कारणांमुळे , गदोदर स्त्रीचे डोहाळे न पुरविल्यामुळे , अन्न पचन न झाल्यामुळे , पोटांत कृमि झाल्यामुळे झाल्यामुळे अथवा असात्म्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे उत्पन्न होत असते . ती झाली असता वर जी वातादि दोषधिक्यापासून होणार्या वांतीची पृथक् पृथक् लक्षणे सांगितली आहेत त्यांपैकी ज्यांची लक्षणे रोग्याच्या ठायी द्दष्टीस पडतील त्या दोषापासून ती उत्पन्न झाली असे समजावे .
कृमिजन्य छर्दीचीं लक्षणें .
शूलह्रल्लासबहुला कृमिजा च विशेषत : ॥
कृमिह्रद्रोगतुल्येन लक्षणेन च लक्षिता ॥११॥
कधीकधी पोटांत कृमि झाल्यामूळे जी वांती होते ती झाली असता रोग्यास पुष्कळ उम्हासे येतात व त्याच्या शरीरांत वेदना होतात . याशिवाय या वांतीची इतर लक्षणे मागे सांगितलेल्या कृमिरोग व ह्रद्रोग यांच्या लक्षणाप्रपाणे जाणावी .
छर्दींचीं साध्यासाध्य लक्षणें .
विट्स्वेदमूत्राम्बुवहानि वायु :
स्नोतांसि संरुध्य यदोर्ध्वमेति ॥
उत्सन्नदोषस्य समाचितं तं
दोषं समुद्धय नरग्य कोष्ठात् ॥१२॥
विण्मूत्रयोस्तत्समगन्धवर्णं
तृट्श्वासकाससार्तियुतं प्रसक्तम् ॥
प्रच्छर्दयेददुष्टमिहातिवेगात्
तेनार्दितञ्चशु विनाश्मेति ॥१३॥
क्षीणस्य या छर्दिरिति प्रसवता
सोपद्रचा शोणितपूययुक्ता ॥
सवन्द्रिकां तां प्रवदेदसाध्यां ॥
साध्यां चिकित्सेन्निरुपद्रवां च ॥१४॥
ज्यावेळी रोग्याच्या मलमूत्रस्वेदोदकपाहिनी नाडयांना रोध करुन वायु वर येतो त्यावेळी तो त्याचे सांचलेले ( मलादि ) दोष कोठयातून बाहेर काढतो ; मग त्या रोग्यास वारंवार होणारी व फार जोराची अशी दुष्ट वांती होते , तिला मलमूत्रासारखी घाण असते व रंगहि त्यासारखाच असतो . या उलटीमुळे श्वास , खोकला , तहान व शूल ही लक्षणे रोग्याच्या ठायी उत्पन्न होतात व तो लवकरच मरण पावतो . असाच आणखी जो रोगी क्षीण झालेला असून त्यास वारंवारं एकसारखी होणारी , खोकला वगैरे उपद्रव उत्पन्न करणारी , रक्त व पूं यांनी मिश्रित आणि मोराच्या पिसांवरील डोळयाप्रमाणे डोळयांनी युक्त अशा प्रकारची वांती होते तोहि चिकित्सा करून साध्य न होतां मरण पावतो . जी वांती पुढें सांगितलेला कोणताहि उपद्रव रोग्याच्या ठायी उत्पन्न करीत नाही ती मात्र साध्य जाणावी .
छर्दीचे उपद्रव .
कास : श्वासो ज्वरो हिक्का तृष्णा वैचित्यमेव च ॥
ह्रद्रोगस्तमकश्वैव ज्ञेयाच्छर्देरूपद्रवा : ॥१५॥
वांतीमुळें , श्वास , खोकला , ज्वर , तहान , उचकी , डोळयास अंधेरी येणे , मन उद्विग्न होणे व ह्रद्रोग हे उप द्भ व रोग्यास जडतात .