संस्कृत सूची|शास्त्रः|आयुर्वेदः|सार्थ माधवनिदान|
शूलनिदान

माधवनिदान - शूलनिदान

" शरिरेंद्रिय-सर्वात्मा संयोगधारी जीवितम् " अशी जीवनाची आयुर्वेदीय, व्यापक व्याख्या आहे.


शूलाचे प्रकार .

दोषै : पृथक्‌ सैमस्तांमद्वन्द्व : शूलोऽष्टधा भवत्‌ ॥

सर्वेष्वेतेषु शूलेषु प्रायेण पवन : प्रभु : ॥१॥

वात , पित्त व कफ या तिन्ही दोषांपासून पृथक्‌ होणारे तीन ; दोन दोन दोषांच्या संबंधाने होणारे तीन , व्रिदोषापासून होणारा जो सान्निपातिक तो एक आणि आमापासून उद्भवणारा एक , असे या शूलरोगाचे आठ प्रकार असून त्या सर्वात बहुतकरून वायूचेच प्राधान्य असते .

वातशूलाचीं कारणें व लक्षणें .

व्यायामयानादतिमैथुनाच्च प्रजागराच्छीतजलातिपानात्‌ ॥

कलायमुद्नाढकिकोद्रुदोषादत्यर्थरूक्षाध्यशनाभिघातात्‌ ॥

कषायतिक्तादिविरूढकान्नविरूद्धवल्लूरकगुष्कशाकात्‌ ॥२॥

विट्‌शुक्रमूत्रानिलवेगरोथाच्छोकोपवासादतिस्यभाषात्‌ ॥३॥

वाय : प्रवृद्धो जनयेद्धि शूलं ह्रत्यार्श्वपृष्ठत्रिकबस्तिदेशे ॥

जीर्णे प्रदोषे च घनागमे च शीते च कोपं समुपैति गाढम्‌ ॥४॥

मुहुमुंहुश्चोपशमप्रकोपौ विण्मूत्रसंस्तम्भनतोदभेदै : ॥

स स्वेदनाभ्यञ्जनमर्दनाद्यै : स्निग्धोष्ण भोज्यैश्च शमं प्रयाति ॥५॥

व्यायाम , मार्गगमन , जाग्रण , अति स्त्रीसंग , थंड पाणी व अति रूक्ष अन्न यांचे अति सेवन करणे , जेवणावर जेवणे , आघात करणे , ( दूध , मासे वगैरे ) विरूद्व पदार्थ , वाळलेले मांस , सुकविलेल्या भाज्या , तुरट , कडू व मोड आलेल्या घान्यांची उसळ तसेच वाटाणे , लाख , कोद्रु व तुरी आणि मूग हे खाणे , शुक्र , मळ व मूत्र , अपान वायू यांच्या वेगाचा रोध करण , क्रोध , शोक उपवास करणे आणि अति हसणे व बोलणे या कारणांनी प्रकोप पावलेला वायू ह्रदय , बरगडया , पाठ , बस्ति व माकडहाड यामध्ये शिरून शूल ( वेदना ) उत्पन्न करतो ; तो पुन ; पुन ; उठतो व शांत होतो . पण त्याचा जोर अन्नपचन झाले असता प्रदोषकाळ किंवा वर्षाऋतु असता आनि थंडी पडली असता फार असतो . हा झाला असता मळमूत्राचा अवरोध आणि टोचणी व फूट ही लक्षणे उत्पन्न होतात . या वातजन्य शूलाचे स्वेदन , अभ्यंजन व मर्दन वगैरे उपचार आणि स्निग्ध व उष्ण पदार्थ खाल्लयाने शमन होते .

पित्त - शूलाचीं कारणें व लक्षणें .

शारातितीक्ष्णोष्णविदाहितैलनिष्पोवपिण्याककुलत्थयूषै : ॥

कट्वम्लसौवीरसुराविकारै : क्रोघानलायासरविप्रतापै : ॥६॥

ग्राम्यातियोगादशनैर्विदग्धै : पित्तं प्रकुप्याशु करोति शुलम्‌ ॥

तृण्मोहदाहार्तिकरांहि नाभ्यां संस्वेदमूर्च्छाभ्रमशोषयुक्तम्‌ ॥७॥

मध्यन्दिने कुप्यात चार्धरात्रे विदाहकाले जलदात्यये च ॥

शीते च शीतै : समुपैति शान्तिं सुस्वादुशीतैरपि भोजनैश्चा ॥८॥

अतिशय खारट , अति तीक्ष्ण , दाहकारक , तिखट , आंबट व तेलकट असे पदार्थ व तसेच तिळाची पेंड , वाल , वाटाणे व हुलगे वगैरे कडधान्ये यांचे सेवन करणे , करपट अन्न खाणे , शिरका व मद्य पिणे , क्रोध , विस्तवाजवळ शेक घेणे , कडक उन्हात फिरणे आणि मनस्वी श्रम व अति स्नीसंग करणे , या कारणामुळे पित्त प्रकोप पावून नाभिस्थानी शूलरोग उत्पन्न करते . या रोगात वेदना , तहान , चक्कर , मूर्च्चा , दाह , घाम शोष व भ्रम ही लक्षणे असतात ; तसेच शरत्काळी , मध्यरात्री . दोन प्रहरी व अन्नपचनच्या वेळी याचा जोर जास्त होतो व शीतकाळी कमी असतो . थंड पदार्थ सेवन केल्याने व अत्यंत मधुर व थंड असे अन्न खा ल्ल्या नेही हा पित्तजन्य शूढ संप तो .

कफशूलाचीं कारणें व लक्षणें .

आनूपवारिजकिलाटपयोविकारै -

र्मांसेक्षुपिष्टकृशरातिलशष्कुलीभि : ॥

अन्पैर्बलासजनकरैपिहेतुभिश्च

श्लेष्माप्रकोपमुपगम्य करोति शुलम्‌ ॥९॥

हृल्लासकास सदनाऽरुचिसंप्रसेकै -

रामाशये स्तिमितकोष्ठशिरोगुरुत्वे : ॥

भुक्ते सदैव हि रुजं कुरुतेऽतिमात्रं

सुर्योदये च शिशिरे कुसुमागमे च ॥१०॥

अनूप ( झाडी व पाणी फार असलेल्या ) देशातील प्राण्यांचे व पाण्यातील मत्स्यादि जीवांचे मांस खाणे , दुधापासून होणारे ताक , दही , खरवस , लोणी हे पदार्थ , मांसाचा रस , खिचडी , करंज्या , तीळ व पिठाचे केलेले पदार्थ याचे सेवन करणे व याप्रमाणे कित्येक दुसरे कफकारक पदार्थ सेवनात येणे यामुळे कुपित झालेला कफ अमाशयात शूलरोग उत्पन्न करतो . याची लक्षणे - तोंड वेचव होणे , त्यास मळमळ व पाणी सुटणे , खोकला , डोकेजड होणे , ग्लनि व कोठयामध्ये जडत्व याप्रमाणे जाणावी . हा रोग झाला असता सदोदित जेवण होताक्षणी अत्यंत वेदना होतात व वसंत आणि शिशिर ऋतूंत व सूयोंदय काळी हा जोर करतो .

आमशूल .

आटोपहृल्लासमीगुरुत्वं स्तभित्यमानाहकफप्रसेकै : ॥

कफस्य लिङ्गेन समानलिङमामोद्भवं शूलमुदाहरन्ति ॥११॥

आमजन्य शूलाची लक्षणे बहुतेक वर सांगितलेल्या कफशूलाच्या लक्षणांसारखी असून शिवाय पोट फुगणे व गुडगुड शब्द होणे , मळमळ , ओकारी , मांद्य , जडत्व व मुखावा टे कफस्त्राव हे प्रकार त्यात अधिक द्दष्टिस पडतात .

द्वंद्वज शूलांची लक्षणें .

द्विदोषलक्षणैरेतैर्विद्याच्छूलं द्विदोषजम्‌ ॥

बस्तौ ह्रत्कण्ठपार्श्वषु स शूल : कफवातिक : ॥१२॥

कुक्षौ ह्रन्नाभिमध्ये तु स शूल : कफपैत्तिक : ॥

दाहज्वरकरो घोरो विज्ञेयो वातपैतिक : ॥१३॥

दोन दोन दोषांपासून जो शूल उत्पन्न होतो तो द्वंद्वज शूल जाणावा . यापैकी कफवातजन्य शूल बस्ति , ह्रदय , गळा व पार्श्वभाग यांच्या ठायी उत्पन्न होतो ; कफपित्तजन्य शूल कुक्षि , ह्रदय , नाभि व पर्श्वभाग यांत उद्भवतो आणि वातपित्तजन्य शूल कोठेही प्रादुर्भूत होतो . हा तिसरा द्वंद्वज शूल भयंकर असून दाह व ज्वर उत्पन्न करणारा असतो .

सन्निपातजन्य शूल .

सर्वेषु दोषेषु च सर्वलिङ्गं विद्याद्भिषक्‌ सर्वभवं हि शूलम्‌ ॥

सुकष्टमेनं विषवज्रतुल्यं विवर्जनीयं प्रवदन्ति तज्ज्ञा : ॥१४॥

त्रिदोषजन्य अथवा सन्निपातिक शूलांत वात , पित्त व कफ या तिन्ही दोषांपासून होणार्‍या शूलाची लक्षणे एकवटलेली असतात . हा शूल विष किंवा वज्र याप्रमाणे पीडा देणारे असून असाध्य आहे , म्हणून यावर चिकित्सा करू नये असे वैद्य म्हणतात .

शूलाचे उपद्रव .

वेदना च तृषा मूर्च्छा आनाहो गौरवारूची ॥

कासश्वासौ च हिक्का च शूलस्योपद्रवा : स्मृता : ॥१५॥

पोट फुगणे , तोंड बेचव होणे , अंग जड होणे ; तसेच वेदना , तहान , मूर्च्छा ; खोकला , श्वास व उचकी हे उपद्रव शूलरोग असता उत्पन्न होतात .

एकदोषोत्थित : साध्य : कृच्छ्रसाध्यो द्विदोषज : ॥

सर्वदोषोत्थितो घोरस्त्वसाध्यो भूर्यूपद्रव : ॥१६॥

एक दोषापासून उद्भवलेला शूल साध्य , दोन दोषापासूनचा कष्टसाध्य आणि त्रिदोषजन्य व अनेक उपद्रवयुक्त असलेला भयंकर व असाध्य होय .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP