प्रमेहपिटिकानिदान
पिटिका व त्यांचीं स्थानें .
शराविका कच्छपिका जालिनी विन्ताऽलजी ॥
मसूरिका सर्षपिक्रा पुत्रिणी सविदारिका ॥१॥
विद्रधिश्चेति पिटिका : प्रमेहोपेक्षया दश ॥
सन्धिमर्मसु जायन्ते मांसलेषु च घामसु ॥२॥
प्रमेह रोगाच्या शराविका , कच्छपिका : जालिनी , विनता , अलजी , मसूरिका , सर्षपिका , पुन्निणी , विदारिका व विद्रधिका अशा दहा पिटिका ( पुळ्या ) आहेत ; त्या प्रमेह झालेल्या रोग्याची उपेक्षा केली असता त्याच्या शरीराचे सांधे , मर्मस्थाने व मांसल भाग यांच्या ठिकाणी उद्भवतात . त्यांचे आकार व लक्षणे पुढे सांगितल्याप्रमाणे जाणावी .
सर्व पिटिकांचे आकार व लक्षणें .
अन्तोन्नता च तदुपा निम्नमध्या शराविका ॥
सदाहा कूर्मसंस्थाना ज्ञेया कच्छपिका बुधै : ॥३॥
जालिनी तीव्रदाहा तु मांसजालसमावृता ॥
अवगाढरुजोत्क्लेदा पृष्ठे वाप्युदरेऽपि वा ॥४॥
महती पिटिका नीला सा बुधैर्विनता : स्मृता ॥
रक्ताऽसिता स्फोटवती दारुणा त्वलजी भवेत् ॥५॥
मसूरदलसंस्थाना विज्ञेया तु मसूरिका ॥
गौरसर्षपसंस्थाना तत्प्रमाणा च सर्षणी ॥६॥
महत्यल्पचिता ज्ञेया पिटिका चापि पुत्रिणी ॥
विदारिकन्दवद्वृत्ता कठिना च विदारिका ॥
विद्रधेर्लक्षणैर्युक्ता ज्ञेया विद्रधिका तु सा ॥७॥
पहिली पिठिका शराविका , ही परळासारखी कडेला उंच च मध्ये खोलगट असते ; दुसरी कच्छपिका , कासवाच्या पाठीसारखी असते व ती किंचित् दाह करते ; तिसरी जालिनी , ही मांसाच्या वाळयांनी व्यापलेली असून अत्यंत दाहकारक असते ; चवथी विनता , निळया रंगाची , मोठी , खोल व अत्यंत वेदना करणारी व ओलसर अशी असून ती पाठीवर किंवा पोटावर उद्भवते ; पांचवी अलजी , ही फेडांनी युक्त , भयंकर आणि तांबडया अथवा काळया रंगाची असते ; सहावी मसूरिका , मसुरेच्या डाळीसारखी दिसते ; सातवी सर्षपिका , पांढर्या मोहरीसारखी व तिच्याच आकाराची होते ; आठवी पुत्रिणी , ही मोठी व सभोवती लहान लहान फोड असलेली असते : नववी विदारिका , विदारीच्या कांद्याप्रमाणे वाटोळी व कठीण अशी उद्भवते ; आणि दहावी विद्रधिका ही विद्रवीच्या लक्षणानी युक्त असते .
पिटिका कशा उत्पन्न होतात .
ये यन्मया : स्मृता मेहास्तेषामेतास्तु तन्मया : ॥
विनाप्रमेहमप्येता जायन्ते दुष्ठमेदस : ॥८॥
तावच्चेता न लक्ष्यन्ते यावद्वास्तुपरिग्रह : ॥९॥
ज्या दोषामुळे जे मेह ऊद्भवले असतात त्याच दोषामुळे त्यात पिटिका ( पुळया ) उद्भवतात . कधी कधी प्रमेह झाला नसूनहि मेदाने दूषित झालेल्या पुरुषाच्या शरीरावर ह्या पिटिका उठतात व त्या त्याचा ( शरीराचा ) काही एक भाग व्यापीपर्यंत लक्षात येत नाहीत .
पिटिकांचे उपद्रव
तृटकासमांससङकोचमोहहिक्कामदज्वरा : ॥
विसर्पमर्मसंरोधा : पिटिकानामुपद्रवा : ॥१०॥
पिटिका झाल्या असता तहान , मूर्च्छा उचकी , गुंगी , ज्वर , विसर्परोग , मांससंसकोच आणि मर्मसंरोध हे उपद्रव उत्पन्न होतात .
पिटिकांचीं असाध्य लक्षणें .
गुदे ह्रदि शिरस्थंसे पृष्ठे जर्मखु खोत्थिता : ॥
सोपद्रवा दुर्वलाग्ने : पिटिका : परिवकयेत् ॥११॥
गुदद्वार , हृदय , डोके , खांदे , पाठ व मर्मस्थाने यांवर उद्भवलेल्या पिटिका ( पुळया ) असाध्य समजाव्या : व तशाच जठराग्नि मंद झालेल्या गेग्याच्या ठायी उपद्रवयुक्त असलेल्या पिटिकाही सोडून द्याव्या .