मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख १

शिवचरित्र - लेख १

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


चौल-अधिकारी-दप्तर

॥ श्री महागणपतिर्जयति ॥
श. १४४६ मार्ग. शु. १ इ. १५२४ नोव्हें. २६

शके १४४६ तारण मार्गशिर्ष शुद्ध १ प्रतिपदा सोमे तद्विनी चंपावतरिस्छ सभ्य स्मार्थ समक्ष [केशव] जोइसी बाल जोइसी यांस हर जोइसी एही विभागपत्र लिहोन दिधले तुमचे [व] आमचे शुने व रुपे व कांशे व शीशे तांबे वशा लोखंड व संचिक्‍ व रंचिक्‍ व रुण व गोरु व वांछरु यथांशे खंडले तामी घरवाडी व वाईशेथ व कोलपलीचे शेत व खार शंकरभटीचा चतुर्थांश ज्योती [स वृ] त्तिचा चतुर्थांश व बंदरीची वृत्ति वो चारे मोहल इतुकें तुमी पुत्रपौत्री उपभोगणे आपणास राहा [व] याकारणे घराचें उत्तरीं ठाव दिधला असे तेथे घर बाधीत व कुटकापासून उत्तरीलेकडची चिरटी ज [व] पर्यंत वझांचि वइ व गोवणपांदे तितुका आवड दिधला असे त्या आवाडामध्ये झाडमाड लाऊन त्यास बावीचें पाणी चतुर्थांशे केलें व आवाडामध्ये राहाटिचे पाणि न्यावा कारणे कुडकाकडील मार्ग दिधला असे तेणें मार्गे पाणि निऊन घडमाल लोटा इआस आपणास संबंध नहि व आपणास गणेशचें पुराण दिधले असें व वाडियाच कोण वैजालांची दिधली असे व घरवाडीचे सीलोत्तर जवपर्यंत्ग पालनें तमपर्यंत आपणास पालावे जेधवा देवाण शेलोत्तर पली तधवा आपलेकडे जे कांहि झाडमाड असेल तेणेपरमाणे देवान महसुलाची उगवणि करुन शीलोत्तर पालतां जो कांहि देवानसंबंध पडेल तो तुमे जाणावें आपणास संबंध नहि आपणास देहशुद्धी जावाकारणें अडपखला कांठे ठाव दिधला असे तेथे स्त्रीमनुष्ये देहशुद्धिस जाऊन एणेप्रमाणे तुमी पुत्रपौत्रे उपभोगणे हे आपले विमापत्रे सत्य.

साक्षि
रामेश्वरभट अग्निहोत्री ठसेर
माहादप्रभु देसाई
रामेश्वर भट अग्निहोत्री
हरिभट्ट धर्माधिकर्णी
हर जोइसी
जानभट हरिभट
वैजनाथ जोइसी
भान वझा गोविंद वझा
वामन जोइसी हर जोइसी
विस्वनाथ जोइसी कृष्ण जोइसी
कुकभट वाघभट
कृष्णभट बलाळभट वैद्य
वाघोराम देसाई
बाब ठाकूर अधिकारी
अंतभट कृष्ण भट
पिलंभट चांगदेभट
माहाद वर्तक दडाड
नार कमंत राम क्रमंत बिलनाक सिधोरे
बाल वझा विटल वझा
भोळनाक अगोशकर
कुकभट जोमनभट

N/A

References : N/A
Last Updated : February 11, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP