शिवचरित्र - लेख ८४
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक
श.१६१६ मार्ग.शु.९
इ.१६९४ नोव्हें.१५
इजतमाब इसाजी मा .... कसबे चेऊल हाली वस्ती वाडी पीरकुरेल कोत रवदडे दे अजी दिल येकलास नारोवा माहाजन व अत वर्तक व विठोजी कुलकर्णी व रयेती म॥ नागावे सु॥ खमस तिसैन व अलफ वाडीपेढी ब॥ रामाजी अदिकारी माहाल मजकूर हे वाडी तुम्ही विकत घेतली पैके दिल्हे आणि वाडी मजकुरीचे खत सराई जाले नाही व खतावरे आमच्या साइदा नाही म्हणऊन वाडी तुम्हाकडे गाहाण दाखल असे यैसेयासि ते वाडी बाल म्हात्रा वाडवल यासि झाडेपेसेयाने वाडी कदीम पासुन होती त्याचा इजारा काढून विसोवा माहाजनास दिल्हा होता तोही फौत जाला यावर वाडीचे सिरी बाकी रिघाली बाकीची निसबती बाल म्हत्रा मजकुरास लाविली ते [ण्हे] करार केला की आपली वाडी आपाजी अदिकारी यांहि काढिली यावर [अदि] कारी याचा व तुमचा कथला लागला यैसेयासि इजतसार मुसाजी परि महमद व र॥ बहिरोजी त्रिमल हे दरम्यान पडोन वाडीची बाकी सन आर्बाची मि॥ रु॥ ३० रिघाली होती त्यापैकी असर्फी २५० पंचवीस तुम्हापासून आम्हास देविल्या त्या मारुफत सीनोर [मो.जा.] कपितान मोर आम्हास पावल्या बाकी बेरीज राहिली ती आम्ही माफ केली असे पेस्तर वाडी मजकुरीचा इजारा हर कोण्हास देऊन वाडीमधे जो हासील होईल तो इजारदार खाईल आणि मोगलाचे तर्फेचा महसूल व मराठेयाचे तर्फेचे जे दिवाणदेणे हक नाहक पडेल ते देईल दिवाणदेणेयासी व तुमसी निसबती नाही ह्याखेरीज बाकी बकायाची निसबती तुम्हास लागो देण्हार नाही वाडीचे खत सराई होईल व आमच्या स्याइदा खतावर होतील ते वख्ती वाडीची निसबती तुमसी असे जोवर खत सराई जाले नाही व आमच्या स्याइदा नाही तौवर वाडीसी व तुमसी निसबती नाही हे किताबत सही छ ७ रबिलाखर
[डावे बाजूस समासांत] नारोवा माहाजन व अत वर्तक व गावगावकर
N/A
References : N/A
Last Updated : February 27, 2019

TOP