मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख २१

शिवचरित्र - लेख २१

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


श.१५२८ माघ शु.१४
इ.१६०७ जाने.३१

[आरंभी फार्शी मजकूर व त्याखालीं चार वाटोळे फार्सी शिक्के]
अज दिवाण र॥ खास बजानेबु सरसंमत व कारकुनानी हाळ व इस्तकबाळ मामले मुर्तजाबाद उर्फ चेऊळ बिदानद सु॥सन सबा अळफ देसाई व अदिकारी व रवाया मामले मजकूर हुजूर येऊन बदगी हजरती आपळा हाळहवाल मकसूद मालूम केला तेणेंप्रमाणें हुजुरुन खातिरेसी आणौन सरंजाम केला असे बीत॥

कानु व कमाविस कारदीर्दी दर कारकीर्दी ब॥ साळाबाद चालिले आहे व माहाळास सरसंमत व कारकून आले होते तेही तमाम खातीरेसी आणोन ब॥ साळाबादप्रमाणे चालवीत गेले हाली कारकीर्दी सुरुरखान हवालदार नवी कानु करुन गैर केले तेणेकरुनु रयेती खराब जाली व मफलीस व बेमवसर होऊन परागंदा जाली तरी कारकीर्दी सुरुरखान नवी कानु जाली आहे ते नजर अनायेती करुनु दुरी करणे म्हणौन तरी जाब सरंजाम कारकीर्दी सुरुरखान गैरकानु जाली असेल ते दुरी केली असेनमोर्तब मुटु. गैरहंगामी मुस्तकबाळ तहसील करिताती ते वख्ती रयेती दर मुड्यासि काढा ळारि ७॥८ प्रमाणे काढून देताती व सन सबाकारणे फिरंगियाचे तहवेली करितां माहालीं बाणी वेव्हारा नाही व तहसीलेची ताकीद बहुत याबदल रयेतीन आपले गुरुं ढोर व बीज विकून उगवणी केली तेणेंकरुन रयेती मफलीस बेमवसर जाली तरी मुस्तकबल दिधले नव चे मुस्तकबळाची तसवीस न लवणे फसल हगामी उगवणी करुन घेणे म्हणौन तरी जाब सरंजाम ब॥ मामुरी साले तीन मुस्तकबाळाची तसबीस ने दणे महसुलावरी घेणे मामुरी जालियावरी ब॥ साळाबादप्रमाणे कमाविस करणे +मोर्तब सुटु. जुजबी गावास मनसुरखानी रकमेसी गावी ढेप नाही म्हणोन ते गाव खोत खोती करीत नाहीं तरी ते गाव खराब पडितो तरी कारकून व देसकीं ते गावचे ळावगण मनास आणौनु त्यामधें सेरी कामत वजा करुन संचणी करणें गाव बीत॥ कावीर तपे ब्राह्म - मजरे दिवी तपें णगौ उमटें म्हणौन तरी जाब सरंजाम खराब गावास हस्तावेप्रमाणें कौळु दीजे रकमेसी जे बेरीज नुकसान होईल तबदळ रोजमरे उगवणी कीजे वरकड गाव ज्यास खोती आहेती त्या करवी ब॥ संचणीप्रमाणें उगवणी करंवीजे + मोर्तब मुटु. गैरमहसूल व बिळा सोहळा बदळ कूल आणोन राखताती त्याचे बाबे देसक गुन्हे पाहोन व मवसर पाहोन अर्दास करिताती ते खातीरेसी जाणोन संगीन करार देताती जेणेंकरुन तें कुळ आपलें जीण जितरब भरीस घाळूण मफलीस होऊन परांगदा होताती तरी बदल मामुरी गैरमहसूल माफ करणें म्हणौन तरी जाब सरंजाम ब॥ मुनसिफी गुन्हा ळाजीम होईल त्याचा गुन्हा व मवसर पाहोन ताजीळहाळ घेणें + मोर्तब सुटु. सुरुरखान व किलेकरी याचे तसविसेकरितां रयेती होऊन जागाजागा गेली व मुस्तकबळ सन सबा बहुत सिताबीन तहसील जांले येणेकरुन गळा व गुरे व वीज भरीस पडोन रयेती परागंदा जाली तेणेकरुन गाव खराब पडिले बीत॥ मौजे बढुं खु॥ ये गावीचे खोत मफलीस त्याचे इस्तावे जाले हाली यासि खोती देता रकम उगवणी नव्हे म्हणौन खोत खोती न करीत तरी बदल मामुरी सन समानाकारणें अमानत कमावीस करणे अगर दुसरेया खोतास इस्तावेयानि खोती देणे म्हणोन तरी जाब सरंजाम खराब गावास इस्तावेयानि सिसाळा कौलु देऊन इ॥ समान त॥ असर संचणी मनसूरखान उगवणी करणे+मोर्तब सुटु. सन सीतामधें सुरुरखान हवळदार चेउलास येऊन खराब गाव खोतास खोती घातले यावरी सुरुरखान स्वार जालेयावरी गडकरी किले खेडदुर्ग यामधें व अतसखानामधें झगडा ळागळा होता म्हणोन देसकीं अतसखान व उकाजीस सांगौनु जलित मनास आणावया कारकून व देसक पाठविले तेही गाव पाहिले बित।
त॥ सनसीत खराब होते ते सन सबा कारणें जलित जाले
सागावे  वाडगौ
पोवेले  निगुडें
गवसणी  भाईमले
कावाडें  ब्राह्मणवली त॥
रुइवलें  तिसरी

मामूरपैकी जलित जाले
मेरसें  कुमुर
खाडाले  खानु

सदरहु गाव जलित जलि पैकीं त॥ सन सीत खराब होते ते सन सबाकरणे जलित जाले त्यासी महसूल व पटी माफ केले व मामूरपैकी जलित जाले ते ब॥ हिसेबे घणे म्हणोन मोईन केले यावरी मामूरखान ठाणदार हुजुरुन मामले मजकुरासी आले येसे आतसखानें आइकोनु कुळकरणीयाचे यारेदियापासून हुकूम मुस्यादे संचणीस सदरहु गाव जमा करविले संचणीस जमा आहे म्हणौन कारकून जळिताची तसवीस ळाविताती तरी जलिताची तसवीस न ळवणें म्हणोन तरी जाब सरंजाम त॥ सन सीत खराब ते सन सबा कारणें मुसलम जलित जाले व ब्राह्मणवलीचे त॥ तिसरी सन सबाचे सचणीस जमा करुनु घेतले त्याचे पोटीं बाहुजती कारकीर्दी सुरुरखान मजुरा देऊन बाकी राहिली असेंली ते बदल मामुरी माफ केली असे सन समाना पासून सिसाला इस्तावा देऊन रकम प्रमाणें उगवणी करणें + मोर्तब सुटु. खारी बोळाडी तपे उमटे खराब होती ते खोज बहिराम यासि इस्तावेयानी खोती देऊन बदिस्त करविली इस्तावे ब॥ सन सबाकारणें ठाणाहून वरात मोहतादी फिरंगी मुस्तकबळ सन सीतामधें करुन दीधले यावरी दरियाचे उधाण होऊन बंदिस्ता फुटोनु खारीच्या खडिया गेळ्या बीज पेरिले होते ते नाजात गेले सबाकारणें येक दाणा व येक रुका जागा नाही कपितानाचे तहसीळदार पैकेयाचा तगादा करुं लागले व पेस्तर खारीचे बदीस्तीस पैका मबलग खर्च केला पाहिजे म्हणौन खोज माइले बेदलि होऊन खारी मजकूर साडू लागले यावरी मामळाचे कारकुनी खोज मसारुनइलेसी बदल बदिस्त मवासुला मधें ळारि दोनींसे मजुरां देऊन म्हणोन कौलु देऊन खारीची बदिस्त मामुरी करविली तरी सन सबाकारणें खारी मजकुरीचे महसुलामधे ब॥ कौलु खारी मजकुरीचे महसुलामधें ब॥ कौलु मामळा ळारी दोनीसे मजुरां देणे मोहतादीची वरात केली आहे ते तगादा करिताती त्यासि मामळाहून मुबादला देववणें म्हणोनु तरी जाब सरंजाम सन सबाचा इस्तावा बद्ळ मामुरी बदळे मामुरी त॥ बाकी त॥ सन सन सबा माहे सौसीत माफ केली वालु माजी जो असे गुन्हो केला असेली तो माफ केला असे प्रजा ळोक जेथे गेलिया असतील तेथून आणौन मामूर कीजे + मोर्तब सुटु. रयेतीवरी ळोकांचे मबलग आहे रयेती बेमवसर मफलीस आहे खावयासि नाही तरी कर्जदारांचे कर्ज सिसाला देववणें म्हणोन तरी जाब सरंजाम ज्यास मवखर नसेली त्यासि खिस्ती देऊन कर्जाची उगवणी करवीजे+मोर्तब सुटु राई आगरसुरें तेथीळ माड कितीयेक मयेती जाले व कितीयेक ढांक जाले आहेती येणेकरितां वाडी खराब पडिली आहे कारकीर्दी सुरुरखान खोताचे मुतालीक मानें धरुन उगवणी करविली येणें करि [तां] खोत मजकूर खराब जाले आहे त्यासि राई मजकुरीची रकम संगीन दिधली न वये रकम संगीन आहे तरी माहोलोहून खातीरेसी आणौन संचणी करणें म्हणौन तरी जाब सरंजाम बेरीज संचणी मनसूरखान कदीम चालिलें आहे तेणेंप्रमाणें उगवणी करणें साळमजकुराप्रमाणें प्रभावली करणें ज्यादती होईले त जमा करणें मुकासा होईळ नुकसान ते मजुरां देणें येणेप्रमाणें उगवणी करणें+मोर्तब सुटु.

कोरळांचे राजीक जालें यावरी कारकीर्दी ब॥ बुर्‍हान निजामस्या खोजगी पोखरदी सुळो करुनु मामुरी फर्माविली गांवीचे ढेप ळावगण पाहोन संचणी केली येणेंप्रमाणें त॥ सन इसनें अळफ चालिलेयावरी सन सळासामधें सुरुरखान हवाळदार माहाळासि आळे त्या बराबरी अमीननमुलूक होते तेही खंचणी मनास आनौन साधणुक रोजमरा मनसूरखानाचे कारकीर्दी येलीकडे ज्यादती चढ जमा जाले आहेती ते दुरी करुन यैन रकम जमा करविली यावरी कितेक गावी साधणुक रोजमरहा व जादती चढ हुकूम मुसाबे उगवणी करविली तरी त्या रकमेस ढेंप नाही म्हणौन खोत खोती न करीत तरी यैन मनसूरखानी रकम घेणे साधणुक रोजमरहा व जादती चढ दुरी करणें गाव बीत॥ केलवली तामनये भाजाणे बोरघर निडी पोसिवे ढवर माजनें म्हणोन चढ ब॥ ढेप नाही मवाजें रोजमरे उगवणी निडी पोसिवें वलकरणें वली ढवर तामनें बोरघार या गावास कारकून भाजाणें माजने व देसक जाऊन ढेप पाहोन संचणी करणें.
दरियाचे किनारे जुजवी गाव आहेती यासि दरियाचे तसवीस ळागोनु कितीयेक सेतें गर्क दरियां जाली आहेती त्या करितां गावांची रकम नुकसान जाली आहे म्हणोन खोत खोती न करीत तरी कारकून व देसकीं ते गावीची सेते गर्क दरिया जालीं आहेती ते खातीरेसी आणौन रकमेचे पोटीं मजुरां देऊन संचणी करणे गाव बीत॥ कोपरवली तपे कावाडें तपे आठागर आटागर चेंढरें तपे खाडालें भांसणें तपे परहूर पोइनल तपे श्रीगौ म्हणौन तरी जाब सरंजाम माहाली कारकून व काजी व देसकी सदरहू गाव नजरे पाहोन ज्या गावीची सेते गर्क दरिया जांली असतील ते पाहोन मजुरां दीजे महजर व अर्दास हुजूर पाठवीजे+मोर्तब सुटु पेसजी थोर कुळ गुन्होगारी बदल राखती त्यासि सोडवावयाबदळ परवानगी पाठऊन सोडवीत जो परवानगीबदळ ये तो पानसुपारी मागोन घे हाली गुन्होगार अगर न्याव मुनसिफी बदल राहाताती मवसरदार अगर गैरमवसरदार त्यासि सोडवावयाबद्दल परवानगी पाठविताती त्यापासून हुकूम मुस्तादे परवानगी ळारि १। घेऊन जमा करिताती तरी हे साळाबाद कानु नव्हती हाली रयेती मफलीस जाली आहे तरी हे तसवीस दुरी करणें म्हणौन तरी जाब सरंजाम कारकीर्दी ब॥ बुर्‍हान निजामस्या जैसी कमाविस चालिली असेली तेणेंप्रमाणें कमाविस कीजे हालीं नवी जिकीर जाली असेली ते दुरी केली असे+मोर्तब सुटु मुबारखबाद र॥ खास सन सीतामधे सुरुरखाने उचापती केली आहे तरी मुबारखबादाची निसबती न लावणें म्हणौन तरी जाब सरंजाम ब॥ हुजती सुरुखान मजुरा होईल + मोर्तब सुटु बाजारांत साकसबाजी विकावया आणिताती त्यासि वानगी ब॥ फर्मान माफ आहे दरी वख्त तसवीस होते ते दुरी करणें म्हणौन तरी जाब सरंजाम ब॥ फर्मान बसिकेखास सालाबाद चालिले असेली तेणेंप्रमाणें चाळवणे नवी जिक्री दुरी केली असे + मोर्तब कितेक कुळास व खुमास वर्‍हाडटका अ बोखारटका साळाबाद नाही तरी ब॥ साळाबादप्रमाणें चाळवणें व जुजबी खुमास आहे ते बेमवसर व मफलीस जाली आहेती तरी त्या खुमास वर्‍हाडटका व बोखारटका ई॥ सबा अलफ पासुनु साले ५ माफ करणें म्हणौन तरी जाब सरंजाम बोखारटका व वर्‍हाडटका साळाबाद जैसी कमानिस असेली तेणेंप्रमाणें कमावीस कीजे+मोर्तब सुटु आगरची उगवणी बारमाहा करणें ये बाबे हजरती दिवाणचा फर्मान पेसजी सादर आहे ब॥ फर्मान उगवणी होत असे दरीवरुन मुस्तकबळ तहसीळ करिताती येणेंकरुन अगर खराब जाळा आहे तरी मुस्तकबळ तहसील न करणें बारमाहा उगवणी करणें म्हणोन तरी जाब सरंजाम ब॥ फर्मान साळाबाद जैसी कमावीस जालते तेणेंप्रमाणें करणें + मोर्तब सुटु कोतवाली व आंगरी गैर महसूल किरकोल पाच टके सोळा रुके वरी करीत हाली दाहावीस ळारी गैरमहसूल परबाहिरे करिताती दखळ होत नाही तरी कोतवाली व आगरी गैरमहसूल करुं ने दणे म्हणौन तरी जाब सरंजाम कोतवाली व आगरी गैरमहसूल पाच टके सोला रुके साळाबाद कमावीस होते तेणेंप्रमाणें करणें या खेरीज संगीन कुलगुन्होगारे असेली ते कारकुनी हुजूर कमावीस करणे कीजे+मोर्तब सुटु निपुत्रिकाचे बाबे पेसजी फर्मान सादर होतां जे निपुत्रिक ने घणे तो फर्मान फितरतीमध्यें जळाळा हालीं निपुत्रीकाची तसवीस देताती तरी निपुत्रिकाची तसवीस ळागो ने दणें म्हणोन तरी जाब सरंजाम निपुत्रिकाची कमाविस कारकीर्दी ब॥ बुर्‍हान निजामस्या साळाबाद जैसे चालिले असेली तेणेंप्रमाणें चालवणें+मोर्तब सुटु कपितानाचे तहसिळे जाताती ते मबलग रोजमुरा भाते घेताती व सर तहसिळे दरसदे ळारी ५ भांते घेताती व कुळ बेमवसर मफलीस त्यासि नेऊनु रेवदंडा राखताती तरी रयेती जाद मफलीस जाली आहे तरी पचोतरी दरसदे ळारी ५ नवी कानु जाली आहे ते दुरी करणें व रोजमरा दरोज रुके बुजरुक .।. देववणे व येथील कुळ खेदडीयासि नेताती ते नेऊ नेदणें म्हणोन तरी जाब सरंजाम कपितानाचे तहसिले मोहतादीच्या पैकेयाबदल जाताती ते रयेती पासून दरसदे ळारी ५ घेताती तेणेंप्रमाणें कारकीर्दी सुरुरखान सन सबामधें जमा जाली आहे ते बदळ मामुरी हुजुरुन दुरी केली असे ठाणाहुन जो तहसिळा जाईल त्यासि रुके बारा बुजरुखी भता देत जाणे कारकीर्दी सुरुरखान लारी ५ जमा जाली आहे ते बदल मामुरी माफ केली असे कपितानाचा पैका मोहतादी कारकुनी तहसील करुन देणें+मोर्तब सुटु
माहालीचे कारकून कसबा व विळायेतीची संचणा करिताती ज्यास कौलु बोल देतीळ तो कौळुबोळ पालीत जाणें म्हणोन तरी जाब सरंजाम मुसलम खराब व दिवेलावणी असेली त्यासि कारकुनानी खातीरेसी आणौनु इस्तावेयाचा कौलु देतील तेणेंप्रमाणें पाळणुक कीजे + मोर्तब सुदु जकाती हिदु वानी माहाळहाये मामले मजकूर साळ मजकुराकारणें रामाजी श्रीपाजी प्रभु यासि माहाळाहून इस्तावेयानी हजारती दिधले आहे कौल मामलाचा आहे तरी ब॥ कौलु मामलाप्रमाणे पाळणे जादती कौलु मर्‍हामती करणें म्हणोन तरी जाब सरंजाम माहाली कारकून खातीरेसी आणौन दिवाण सरफ पाहोन सरंजाम देवणे+मोर्तब सुदु चेउलीचे क्षेत्री रेवदेडियासि जाऊन राहिले आहेती त्यासि तेथे जकाती पडती नाही चेउली जकाती ळारि ८॥ व पेठेस ळारि ६। दर मणे रसेमास कानु आहे चेउली कानु संगीन म्हणोन यावयां काईस करिताती तरी ब॥ पेठा जकाती घेणे म्हणोन तरी जाब सरंजाम बदळ मामुरी नव्या प्रजा येतील त्यासि जकाती साळ मजकुराप्रमाणे निमे कानूप्रमाणे घेणे दुसरे सालीं ब॥ पेठ कमाविस करणे तिसरे सालापासून ब॥ कानु कसबाप्रमाणे कमावीस करणे किले खेडदुर्गास पेसजी मांमळा ईतळाख टके हजार अठावीस होते त्याबदळ किलांचे नाजीर व सबनीस व नाईकवाडी ठाणा येऊन इतळाखाचे वराता घेती याकरितां किळांचे तरफेहून विळायतीस व रयेतीस तसवीस नव्हती हाली किलयासि मामळांचे गाव मुकासा दीधले आहेती तेणेकरी तां] किलेकरी संगीन होऊन विळायेतीमधें रयेतीस तसवीस देऊन रयेती खराब केले किळाचे तसविसेकरितां मामुरी नव्हे तरी पेसजी जैसा ठाणाहून हतलाख देत होते तेणेंप्रमाणे देववणे मुकासा गाव आहेती ते दुरी करणे म्हणौन तरी जाब सरंजाम ये बाबे हुजूरुन माहाळासी फर्मान सादर केला आहे जैसी कदीम कमावीस होत होती तैसी होईल+मोर्तब सुदु डोगरीच्या राई रकम संगीन आणि तेथीळ माडें होती ती मयती जालीं व कितेक फिरंगी तोडिली याकरितां त्या राईचे रकमेसी जागा नाही राई खराब आहेती तरी तेथील संचणी करीत जाउ जे संचणी होत जाईल तेणेंप्रमाणें उगवणी करीत जाऊन म्हणोन तरी जाब सरंजाम माहालीं कारकून व देसक जाऊन राईची संचणी करतील तेणें प्रमाणें मजुरां देणें + मोर्तब सुदु.

सदरहुप्रमाणे कमावीस व पाळणुक कीजे ज्यादती तसवीस न दीजे जागजागा कुठे गेली असतील ते आणोन कीर्दी मामुरी कीजे तकरार फिर्यादी येऊ ने दीजे तालीक घेऊन असेली फिराऊन दीजे [फा.मो.] मोर्तबु सुदु
रुज मुश्रीफ रुजु सुरुनिवीस रुजु सुदु
तेरीख १२ माहे सौवाल खमस असर व अलफ
प॥ मिर्जा अबदुल फते.
[कागदामागें] -
ली
सबा सुदु
मुश्रीफ
बार सुदु
ली
तालिक सुदु
दफ्तर खास
बार सुदु
ली
बार सुदु
ली
सब्त सुदु
न्याबती
बारु सुद
लि
सडाते सुदु
सुरुनिवीस
बारु सुदु
ताळिक सुदु
[कागदामागें जोडांवर चार-जागी फार्सी शिक्के]


References : N/A
Last Updated : February 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP