शिवचरित्र - लेख १८
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[वर सुमारें दहा ओळी
फा.म. शिल्लक; बाकी फाटला]
श.१५२८ भाद्रपद वद्य १४
इ. १६०६ सप्टें. २०
दं देसक मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊल सु॥ सन सबा अलफ अर्दास छ १९ माहे जमादिलौबल इरसाल केली मजमुन जे मामुरखान ठाणदार व मोरो तिमाजी मजुमदार माहालासि पैवेस्ता जाले त्यांसी सेरीकर भेटीनु माहाळीचा हालहवाल रोसन केला त्यावरुन तेही साहेबांचे बदगीस अहवाल लिहिला असेली त्यावरुन रोसन होये म्हणौन लिहिलें माळुम जालें व माहाळीं फिरका दर फिरका व तहवेली दर तहवेलीकरितां व माहालदारांच्या वराता समतेहुन चेउलावरी बाकी सनवात करुन तेही तसवीस देताती याकरिता रयेतीस तकवा होत नाही तरी ता॥ सन सीन बाकी माफ जालेयावरी रयेती जागा जागा गेली आहे तीस तकवा होऊन येक जागा होऊन आपला मुदा मकसूद रोसन करितील म्हणौनु लिहिलें मालुम जालें ये बाबे पेसजी कारकुनासी जवाबु सादर केला असे तुम्ही मोख्तस [र] लोक घेऊन हुजूर येणें तुमचा मुदा खातीरेसी आणौन स सरंजाम करुन बहुडाऊन व सन सीत अवलसाली विलायतेमधें निमे सीस्तीची तहसील पैके तमाम घेतले ये तसविसेबदल रयेती परागंदा जाली निमे सीस्ती फिरंगियासी बाकी राहिली होतां ते सिरजोरी करुन येक रुका दीधला नाही यावरी मामुरखान महालासी आले येही कपितानासी बोलौनु फिरंगियासी बोलाउनु आणौनु ताकीद करुन सीस्ती केली आहे दर सदे लारी वीस देऊ पाहाताती म्हणौनु लिहिलें मालुम जालें येबाबे पेसजी कारकुनासी जवाबु सादर केला असे रयेती लोकासी तकवेती दिलदारी देऊन मामुरी कीजे हाली जे सीस्ती करुन दिधली आहे याची उगवणी कीजे व मामुरखान ठाणदार कपितानासी भेटोन तपे माडले तेथील गाव फिरंगी खोती केले आहेती व काबीज केले आहेती तेथील महसूल सिरजोरीन देत नव्हते तेथील हिसेबु करुन ये बाबे कपितान मदती होऊन पैके देववितो म्हणौन लिहिले मालुम जालें व वाडी रामराज आतसखान स्वार होते वख्ती किले खेडदुर्गीचे कारकुनाचें हवालां केली ते कमावीस करिताती तरी वाडी मजकूर देसाई मजकूराची मिरासी आहे देसाई मजकुरासी मर्हामती केलियां नफर मजकूर कवीहाल होऊण दिवाणकाम चालउनु म्हणौनु लिहिले माळुम जालें देसाई व देसंक हुजूर येतील वख्ती याची सरंजामी होईल. [फा. मोर्तब] [नि] तेरीख २७ माहे जमादिलौवल प॥ हुजूर
N/A
References : N/A
Last Updated : February 22, 2019
TOP