शिवचरित्र - लेख ४२
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[फा.शि.]
श.१५६६ पौष व. ९
इ. १६४५ जाने. ११
ई कौलुनामे अज दिवाण समत सैद व महमद सरहवालदार माहालानिहाये त॥ आपाजी ताउजी देसाई व देसकुलकर्णी मामले मुर्तजाबाद उ॥ चेऊल व अदिकारी तपे आठागर व तपे झिराड मामले मजकुरु सु॥ खमस आरबैन अलफ दादे कौलुनामा यैसाजे तुम्हास हुजूर बोलाऊन फर्माविले की हुजुरुन रजा सादर आहे जे मिरासदारापासून सिस्त करुन घेऊन रसद पाठवणे तरी तुम्ही हजरती साहेबास मुकासा मामले मजकुर आर्जानी जाहाला आहे तुम्ही हुजूर जाऊन भेटोन कांही तोफा भेटविला नाही तरी तोफा दिधला पाहिजे म्हणौनु फर्माविले यावरी तुम्ही अर्ज केली की आपण सेरीकर नफर आहो जे खातो ते आपले आहे ते साहेबाचे आहे आपणासि बाजे मिरासदारासारिखा हक लाजिमा इसाबती नाहीं जे आहे ते लाबुद आहे त्यासी पेसकसी तोक व किताबती पडते व लिहिणेयाचे कामासी दोनी यारिदी लागताती त्यासि मुशाहिरा देणे लागते येण्हेकरुन जो हक लाजिमा आहे पुरत नाही व चाकरीस रातदिवस हाजीर राहाणे लागते लुगडे कापडाचे इजतेसी राहिले पाहिजेत सदरहूप्रमाणें आपला अहवाल आहे येसियामधें तोफियाची रजा फर्माविली तरी आपले जितरबासारिखे बेरीज देखील मिरासपटि घेतली पाहिजे यावरी कतखुदा केला येही दरम्याने पडोन तुम्हास मोईन केली तेबदल तोफा देखील मिरासपटी लारी १८५०० साडे अठरासे तुम्हास मोईन केली ते बदल तोफा देखिले सीस्त मिरासपटी तुमचे सिरी ठेविली असे सदरहु बेरिजेची उगवणी कीजे कोण्हेबाबे काही अदेसा न कीजे तुम्ही मिरासदार आहा संचणी मामुरीस तकसीर न कीजे मिरासपटीची अज बाबहा तसवीस न लगे येण्हे कौले कवीहाल होऊन कीर्दी मामुरी कीजे दर ई बाबे काही तालु [क] अदेसा न कीजे [फा.मो.]
तेरीख २२ जिलकादी.
N/A
References : N/A
Last Updated : February 24, 2019
TOP