शिवचरित्र - लेख ५३
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[डावे अंगास शिक्क्याची मोकळी जागा]
श.१५९३ कार्तिक व.९
इ.१६७१ नोव्हें.१५
अजरखतखाने राजश्री शिवाजी राजे साहेब दवामु दौलतहु त। देशमुखानी व देशपाडियान व सेटे माहाजनानी व रयेत व आगरीयानी बागायेत मामले चेऊल बिदानद सुहुर सन हसने सबैन अलफ तुम्ही रयेत होऊन गव्हाई केली आहे म॥ राजश्री कृष्णाजी भास्कर सुभेदार यासी भेटत नाहीत नस्ते मुदे घालिता आणी हुजूर यावयासी मुस्तेद जाहाले आहा म्हणून हुजूर कलो आले तरी साहेबी लाखा होनाचा सुभेदार करुन पाठविला त्याचा रह तिही द्यावा यैसी गोष्टी असता नस्ते कथले करिता साहेब काम जाया करिता तरी रयेत होऊन हरकती करिता हे गोस्टी साहेबास मानत नाही याउपरी रोखा देखताच कुल रयेत सुभेदार म॥ इलेपासी जाऊन भेटोन कुल वर्तमान दखल करणे मग जो तह देणे तो देतील या उपरि हरकती येसी खबर कलताच जो कोलाई करीत असेल त्यास साहेब जोर ताकीद करितील काही मुलाहिजा होण्हार नाही येकीन समजोन दुरुस रयेत मोलियान वर्तन जाणे र॥ छ २२ रजब
N/A
References : N/A
Last Updated : February 25, 2019
TOP