मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ६५

शिवचरित्र - लेख ६५

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


श्रीशंकर
श.१६०७ पौष शु.६
इ.१६८५ डिसें. २१

मशहुरुल राजमान्य राजेश्री रायाजी सदक प्रभु हवालदार व कारकून मामले चेऊल यासि प्रती नीलकंठ मोरेस्वर आश्रीवाद सु॥ सीत समानीन व अलफ म॥ बाबाजी माहादेऊ देसाई व देसकुलकरणी मामले मजकूर याणी विनती केली की साल गुदस्ता खंडोजी मोहिता सेवक राजमडल याणी रामनाक [भ] डारी प्रज मौजे गोठी तो बाम्हणगौ याजकडे राजयुहीचा राजभ [ग] बाकी देण असता दरम्याने खंडोजीने त्याचं टोणग दोन व ....... मापे दाहा मण घेउनु गेल्याउपरि रामनाक मजकुराचे ........चिमणाजी आउजी यासि फिर्याद जाहाला त्याउपर म ............. जी प्रभु नेमून चौकसी केली की प्रज मजकुराकडे राज [मधला पाच ओळी मजकूर कांही फाटला’ कांही अस्पष्ट] आपलियापासून उसूल ....... कृपाळु होऊन चिमणाजी आउजी प्रभूनें तह करुन ........ प्रमाण मोहिते याच्या नावे ब॥ मु॥ सदरहु लेहोनु ......... जरा दिले पाहिजे म्हणून विनती केली तरी म॥ चिमणाजी प्रभु ........... तहकीक काये केली टोणगयाची किमती चौघाच्या मते केली असेली - केला असल तो चौकस खराखुरा मनास आणून खंडोजी मोहिते याचे - बदल मु॥ लेहोन बाबाजी कुलकरणी यासि मुजरा देण अनमान न करणे तुम्ही हे मनास आणणे आणि चौकसीने मनास अणून मजरा देण र॥ छ ५ सफर

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP