शिवचरित्र - लेख ८७
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक
श्री
श.१६१९ मार्गशीर्ष शु.४
इ.१६९७ नोव्हें.७
राजेश्री माहादजी दादाजी देशाई व देशकुलकर्णी मामले चेऊल गो यासि र्द स्नो जनाजी पवार सरनौबत जजीरे पदमदुर्ग रामराम सु॥ समान तिसैन अलफ उपरी येथील कुशल जाणुनु श्वकीये श्वानलेखन करण विषेस पत्रे पाठविले पावोन वर्तमान अवगत जाले येशेच क्षिणक्षिणा लिहीत असिले पाहिजे यानतर मौजे [काविरे] येथील पाटील व लिहिण्हार पाठविला आहे तर खासगत गाव समजोन जमाबदी करुन घेणं अमचे खासगत गावच खावद तेथ तुम्हीच आहा लावगण लेहून देण म्हणानु मणता म्हणानु कलो अस्ले तर आमचे खासगत गावेची लावगण तुम्ही मागता हे अर्पू वाटले जे गोस्टीन आमचा फायेदा होईल तेच गोस्टी तुम्ही कराल हा भरवसा माणुन तुम्हाकडे पाठविल आहे कले ते करण येविसी अजम महमदखान हवालदार यासही लिहिले असे व मौजे सुरय हा गाव आम्ही खाजगव केला आहे तर त्याचेही हर यक धोआणु (?) लिहीत जाण बहुत लिहिण तर जाण असा पाटी वहुबर (?) सांगल त्याप्रमाण जमाबदी करुन घेण जाणिजे र॥ छ २ माहे जमादिलाखर [मोर्त । ब सुद’ असा ष.मो]
[डावे अंगास ‘श्री राजजिसुत । जनाजी इति नाम । ता मुद्रा सर्वगुणोपे । ता राजसन्मानव । र्धिनी’ असा अ.शि.]
N/A
References : N/A
Last Updated : February 27, 2019
TOP