शिवचरित्र - लेख ५८
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
हू
श.१६०२ माघ व.१
इ.१६८१ जाने.२४
रामाजी आपाजी हवलदार तौ तुडिल ब आफियेत बासेंद
॥ र्द इजतमाब [मो.जा.] बाद ... खैरियेत मकसूद आकी दरीविला सेख दावल हुजूर येऊन पोहोचला अमा तुम्ही बखैर पाठऊन तौ मजकूरची हकीकत लिहिलीत नाही व सेख मसूदचे सोबत ५० पणास रुपये पाठविले होते ते पोहचले त्याची जाब पेसजीच रवाना जाहला असे हिसाब पाठविला होता तो त्याचा कुम (?) पेसजीच लिहिला गेला असे ईशा आलाहु ताला सालगुदस्ता नजादाब होईल व सेख दावलनी तो मजकूरची हकीकत जाहीर केली सेख दावलचे जबानी मालूम होऊन आले की १२॥ खंडी भात व नागली खडी ५ सात येसा साठा केला असे यास आठ प्रो ६। सवासा खंडीचे पैसे हुजूर रवना केले बाकी गल्याचे पैसे निरर्व नवाप्रमाणे जाहाला आहे याबदल पैसे घेतले नाही हाली घेऊन पाठवितील व दरकाचे तसरेचे वणटका व लगनटका व मोहतर्फा जमा जाहाला आहे हुजुरामधी येऊन पोचले अलबत॥ इजतमाब किफायतीने काम करितील ये अपल्यास येकीन असे अमा गल्याचे गल्याचे फरुख्तीचे पैसे वगैरा आबवाबचे तफरका न करुन जलदीणे सेख हमजाचे व मभरम अलीचे सोबत रवाना करणे आपले घरी शादी असे याबदल खर्चाचा जरुर आहे व मुर्गिया वगैरा सामान शादीबदल रवाना केले पाहिजे व फडावर गला जमा जाहाला असेल तो त्याची तफर्का न करणे सियादतमाब सेख आबदला व सेख हसन कदीमपासून सरकारातून परवरीस पावले आहेत परागंदगीन ते जागा राहात असत कदीम आपले सरकारचे पाबस्त आहेत त्याने आपले तंगीचा अहवाल जाहीर केला यावरुन लिहिले जात आहे की त्यांवर जी बाकी असेल ती दस्तर्गीदा देविली असे कुल १ येस खंडी गला यास देविला आहे त्याची बाकी वजा करुन जे कांही बाकी खडीपैकी राहील ती त्यास दुसरे गावी देविले अदा करणे व मसीखतपन्हा महमद इभराईम यांस र्गीयास रवाना केले आहेत व चिठी खर्चाची दिली आहे व येक याचे सोबत सिपाई देऊन र्गीयालग रवना करणे व हरणई पावेतो यांस येक बेगारी देऊन रवाना करणे व सेख हमजा व इभरम अली यास पैसे देऊन जलदीने प्रवाना पोहचताच रवाना करणे व याचे सोबत सिपाई जाईल त्याची राहादाराची सरजामी करोन रवना करणे व वरी फरोख्त करुन त्याचा घोड्याबदल दाना रवना करणे ज्यादा लिहिणे हाजत नसे र॥ छ १३ माहे मोहरम सन २४ जुलूस
N/A
References : N/A
Last Updated : February 25, 2019
TOP