मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ७२

शिवचरित्र - लेख ७२

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.

फा. वा.शि. व ९ ओळी म.
श.१६१०-११
इ.१६८८-८९

खत फरोख्त कर्दे बेस्मी -----------
रामाजी सोनाजी अदिकारी मामले चेऊल
[सही]
माणकाई अयाल प्रताबजी सोनाजी
मुगताई अयाल हिराजी प्रताबजी.
[काकणाचें चित्र] नि॥ कांकण

वाडीकर मा॥ नागवि तो अस्टागर मामले चेऊल सुहुर सन तिसा समानीन व अलफ कारणे सेखजी बिन हुसैनजी जमुरे वस्ती वस्ती दादर कसबे चेऊल यासी खत फरोख्त लेहोन दिधले यैसे जे आपली मिलकत बीत॥
वाडी पेड किता १ येकूण तकसीमा ११ येकूण रकम कास टके १४१ वजा अलाहिदे तकसीमदार १० येकून कास टके १२१ तपसील
वाडी दुरभाट किता १ येकून
भाटे ३
भाट किता १  खार भाट किता १
तकसीम विसोवा माहजन व नारोबा माहजन तकसीम १ येकूण कास टके १० तकसीम बाल करदीकर तकसीम १ येकूण कास टके १० रघु बालाजी ता। १ येकून कास टके १० रघुजी कुलकर्णी तकसीम १ येकूण टके ११ टोल भट कढा तो १ येकून कास टके १० कृस्णाजी रिसबूड ता। २ येकूण का टके ३० ळुगा पाईक तकसीम १ येकूण कास टके १५ माहाद वर्तक तकसीम १ येकूण कास टके १० ळुग वर्तक हर वर्तक हर वर्तक तकसीम १ येकूण कास टके १५ भाट किता १ खार भाट किता १ आबे भाट किता १ वर्णमाला किता १ येक येकूण तकसीमदार ११ ब॥ रकम पेडी यासी वजा तकसीमा बाजे तकसीमदार १० येकूण रमारमी वर्णमला याच्या तकसीमा ब॥ रकम ६ बाकी आपली मिलकत तकसीम सातवी येक १
बाकी आपली मिलकत तकसीम १ येकूण कास टके २० येकूण तकसीम १
सदरहु मिलकत आपण आपले अत्मसुखे फरोख्त केली असे याच्या इदा च्यार ४ बीत॥
पूर्व हद मला ता। पेडी हाद दक्षेणे हद वाडी पेडी पकी त॥ माहजन व ळुग वर्तक परमे हद रवार अदिकारी मामले चेऊल उतरे हद खार [भा]ट
या चहु हदासहीत देखील जलस्थल व राहटराहटवट व माड व सुपारी व बाजे हरजिनसी झाडे देखील फरोख्त केली असे तुम्ही व तुमची अवलाद अफलाद भोगवटा कीजे आपणासी व आपले अवलादेसी अर्थाअर्थी समध नाही व आपला वारीसदार अगर हर कोण्ही सदरहु मिलकतीसी दगदावा करील तरी आपण सोडऊन देऊन सदरहु मिलकतीची किमती चौघचारे केली बसरी लारी १२५० साडे बारासे केली हे पैके आपणासी रोख तुम्हापासून पावले हे आपले खत फरोख्त सही किमती बसरी लारी साडेबारासे रास १२५० [ष.ब.फा.मो.]
गौही
कृस्णाजी महादेऊ देसाई मामले चेऊल पत्रप्रमाणे साक्ष
साक्षे बावाजी विठोजी अधिकारी मामले चेऊल
पत्रप्रमाणे साक्षे-जी माहादाजी अदिकारी
मामले चेऊल
खतप्रमाणे साक्षे विसोबा विठोवा माहाजन म॥ मजकूर
रायाजी प्रभु द॥ खाने अजम हबसखान
लिहिलेप्रमाणे साक्षे बकाजी उधव प्रभु
लिहिलेप्रमाणे साक्षे पुतलाजी माहादेऊ कुलकर्णी
आगर चेऊल
लिहिलेप्रमाणे साक्ष कवालजी राम प्रभु प॥ अभेपूर’

N/A

References : N/A
Last Updated : February 27, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP