मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ७०

शिवचरित्र - लेख ७०

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


ले.६९ प्रो शि. व मो.]
श.१६०९ कार्तिक शु.४
इ.१६८७ आक्टो. ३०

ई कौलनामे अज दिवाण मामले मुर्तजाबाद उर्फ चेऊल ताहा तो सराफ कसबे चेऊल सुहुर सन समान समानीन व अलफ कारणे दादे कौलनामा यैसाजे तुमचे बाबे देस[क] मामले मजकूर मामला येऊन मालुम केले की सन सीतामधे गनीम राजपूरकर येऊन शाहार जालहाल करुन गेले याकरिता रयती कुल परागदा जाहाली शाहार दोन वरशे खराब पडिले यामुले तो मजकूरचे सराफ परागदा होउनु जागाजागा गेळे तरी साहेबी सराफावर मेहरवानी करुन मकसूद मनास आणून मकसूदप्रमाणे कौल दिलियानी सराफ शाराहामधे जाऊन ताफा मामूर करितील म्हणौन माळूम केले त्या ..... मकसूद मनास आणून मकसूदप्रमाणे .... सकलम मनास आणून कौल दिधला .... कलम बीत॥
किता कलम शाहार खराब पडिले ते तागाईत आमचा उदीमव्यापार गेळा यैसेयास साहेब मेहरवान होऊन श्याहार मामूर जाहलियान आम्ही श्याहारात येऊन उदीमव्यापार करुन तेण्हेप्रमाणे उदीममाफीक आमचे सिरी टकामार ठेवाल त्याचा उसुल बारमाही घेतला पाहिजे म्हणोन तरी उदीम मावाफिक बारमाही उसुल घेऊन सालमजकुरी देणे माफ केले असे [नि.] मोर्तब सुद [मो.] किता कलम आम्ही पोटाचे दाणे तगाव्याबदल खाचपेम करुन ठेविले होते ते दिवाण लोकानी नेळे तरी मेहरबान होऊन देविले पाहिजे म्हणौन तरी मनास आणून बाजे लोकाची नेली आहेत त्याची त्याची विल्हे करुन त्याप्रमाणे तुमचीही विल्हे करुन देऊन [नि.] मोर्तब सुद किता कलम घरटका व मीठ व दारमाड आहेत याचे देणेयाची तसवीस न लाविली पाहिजे देणे माफ केले पाहिजे म्हणौन तरी मीठटका घेऊन वरकड साल मजकुरापासून माफ [नि.] मोर्तब सुद [मो.]
किता कलम आमचे कर्ज मागील दिवा [णा]कडे नख्त मामलाकडे व माहलाकडे असत आहे ते साहेबी मेहरवान होऊन देविले पाहिजे कर्ज हाती [आलि] यावर उदीमव्यापार करुन आणि साहेबाचा ताफा मामूरां करुन म्हणौन तरी हिसेब मनास आणुन विल्हे करुन देऊन साल मजकुरी विल्हे करुन देऊन [नि.] मोर्तब सुद [मो.] किता कदम पुढे शाहार मामुरी जाहलियावर आम्ही शाहारात जाऊन वस्ती करुन आणि हर कोण्ही सराफ म्हणोन कर्जवाम उसनेपासने मागेल ते आमचेयाने देवत नाही म्हणौन तरी हेविसी तुम्हास [कौल] असे येकदर कर्ज कोण्ही नेदावे दाटजोरे कोण्ही कर्ज कोण्ही नेदावे दाटजोरे कोण्ही कर्ज मागेल त्या हुजुरुन ताकीद करऊन [नि.] मोर्तब सुद [मो.]
सदरहुप्रमाणे कलमाचे कलम मनास आणून तुम्हास कौल सादर केला आसे येण्हे कौले कवीहाल होऊन सुखे शाहारात येऊन घरे बाधोन वसाहती करणे कोण्हे बाबे शकआदेशा न धरणे येण्हेच प्रमाणे मकसूदच्या तालिका करुन हुजूर लिहून राजश्री [मो.जा.] पंताचा व सुभेदाराचा कौल तुम्हास आणून देऊन बेसक होऊन शाहरात वसाहत करणे दरी बाब कौल आसे
तेरीख ३ माहे मोहरम


References : N/A
Last Updated : February 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP