मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ५७

शिवचरित्र - लेख ५७

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


[ले.५४ प्रो शि. व मो]
श.१५९९ ज्येष्ठ शु.५
इ.१६७७ मे २६

श्री सकल गुणमंडित सौजन्येसिंधु सिरोमणि अखडितलक्ष्मीआलंकृत राजमान्यें राजश्री बहिरो त्रिमल देसाधिकारी व देसलेखक वर्तमान व भावी देस प्राती पटण चेऊलु गोसावी यासीप्रत पोश मोरेस्वर पडितराये कृतानेक नमस्कार उपरि सके पिगल सवंछरे धर्मार्थ वेदमूर्ती राजश्री येसजी भट विस्णुभट मनोहर वास्तव मुख चेऊळ वेदस्यात्रसंपन्यें यासी प्रतिवार्सी देविले.
तादूल कैलि कोठीमापे आठ सेरी पाइलीने मोठे  गाई वण सर ४  तादुल खडि १
येवं तादुल केलि कोठीमापे येक खडी व गाई सर चार सोडविले आहेती तरी प्रतिवार्सी वेदमूर्तीचा समाचार घेउनु देत जाणे जवरी वेदमूर्त सुखरुप आहेती तववरी चालवणे प्रतिवारसी नूतन पत्राचा आक्षेप न करणे गाई स्व असतील येसा समाचार घेउनु मुख्य पत्र वेदमूर्तीस देणे लिखित ज्येस्ठ सुध पंचमी सुक्रवार [बालबोध नि.] हे विज्ञाप्ति

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP