शिवचरित्र - लेख ५६
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[डावे अंगास मोरो त्रिमलचा लंबवर्तुळी शिक्का]
श.१५९९ चैत्र शु.१५
इ.१६७७ एप्रिल ७
॥ र्द म॥ राजमान्य राजश्री कृस्णाजी देसाई व बाबाजी कुलकर्णी व बावाजी अदिकारी मामले चेऊळ यांसि मोरि त्रिमल पिगळ संवत्सर उपरि मामळे मजकूरचे तहरचे तुमचे व रयतांचे राजीपणे ज्याणे जैसे म्हटिळे तैसेच केले असतां हाली ठोंगळ मिलोन कोटात जाऊन बैसळे आहेत आणि तहारहावरी येत नाहीत र॥ अनाजीपंताची वाट पाहताती म्हणून कलो अळें तरी हे काये गोस्टी कोणावरी जलल अगर जुलुम जाजती जाली नसतां उगेच जाऊन बैसळे आहेत हे काये गोष्टी अहे तुमचेच राजीपणे व त्यांचेही राजीपणे तह दिल्हा असता कायेबदळ ऊजर करिताती बहुतकी केलियाने काही सुटणार नाही पडत्या पाउसांत मारतां मारतां पैके अणऊन हें त्यांस परिछिन सागणे जर्ही राजश्री अनाजीपंत अळे तर्ही अम्ही तह जो तुमचे राजीपणे जिल्हा आहे तो मोडितीळ की काये व .... प्रभुचे बोळे तहरह होतात की काये हे आपळे जागा [न स] मजता उगाच डहुलाडळा आहे तुम्ही त्यास दबाऊन सांगोन कोण कोण बहुतकीस मिळाले आहेत त्यांस बोलाऊन अणुन तहरहप्रमाणे कार्यभाग चाळवणे कीर्दी करवणे उसुलाचे कार्य चाळू लावणे हजार हुनर केले तर्ही जो तह अम्हीं तुमचे व त्या रयताचे राजपिणे दिल्हा (आ) हे तो दूर होत नाही अखेर त्यांसच वसूल करितां जड जाईल येसें परिछिन सांगणें र॥ अनाजीपंत तूर्त येत नाहीत तुम्ही कोटात जाऊन त्यास मा (लूम) करुन सांगणे आणि इकडे अणणे त्यामधे जे कोण्ही थोर असतील त्यास हुजूर पाठवणे तो अम्हीही लौकरीच पंचमी इतुके रायेगडीहून स्वार होतो ते चेहुलासच येत असों तुम्ही अगोधरच सजवज करुन ठेवणे आणि उतर ळेहून पाठवणे व नागांव थळकर तहरहवरी अळे म्हणून र॥ (भान) जी पंती लि॥ होते त्यावरुन त्यांस दिलाशाचें पत्र पाठविले असे ते त्यास देऊन त्यास समजाऊन सांगणे व ठोगलासही येक रोखा पाठविला असे हाही त्यास पावणे आणी ल॥प्रमाणे वर्तणूक कर्णे चैत्र शुध १५ शनवार अज्ञाप्रमाण [‘विलसति । लेखना । वधिर्मुद्रा असा वा. मो.]
N/A
References : N/A
Last Updated : February 25, 2019
TOP