शिवचरित्र - लेख ११
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[२ फार्शी शिक्के व सात ओळी फार्शी मजकूर]
श. १५०९-१०
इ. १५८७-८८
ई कौळू-दादे रख्तखाने सैद सादत सैद बाबा पोदखदी बिन सैद माहमद बोधला परिजादे इनामदार मौजे चिचवली तपे परहूर मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊल ताहा पदाजी बाबजी खेत्री सो॥ कसबे मजकुरु सु॥ सन समान समानीन व तिसमैया कारर्णे कौलदादे यैसाजे तुम्हास सारी फांगार देखील लागवट मौजे मजकुरु आपली मिरास विकत दिधली तीस रकम महसूल देखील कारुक सीगौटी बोखारटका व वेठी बेगार व जाबीतफर्मास व पिटिया सारे कदीम व जदीद व हरयेक बाब सारे मोईन योकदर दुर्ग स्यावणीची तसबीस लागो नेदू व खणते व आवीत व पाणवेठिया देखील रकम महसूल भात+खडि येक गावेली दीजे हेण्हे कौले खारी मजकुरीस कीर्द मामुरी कीजे हा कौल पाळून जाणिजे या कौलास तकरार करु तर आम्हास आपले पिराजी आण हा कौल सही भात खडी येक दर हरसाल दीजे गावैली - भात खडि
खारी मजकुरी प्रजा वसावेया चीचवली मजकुरीच टेंब
माज जा घरे दाहा बाराची जागा भुई टेब दीधले असे
त्यास घर देणे व कोहोले व कोबडे ने घो हा कौल सही
[पांच फार्शी सह्या]
N/A
References : N/A
Last Updated : February 11, 2019
TOP