शिवचरित्र - लेख ८१
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक
हू
नकल
श.१६१५ चैत्र शु.१३
इ.१६९३ एप्रिल ८
सुरत मजालीस लिहिली जाते बीहुजुर मुसलमानानी व जमीदारानी व मोत बरां वगैरा बीतपसील
चांद वलद याकुब १
आगा हसन वलद
इभ्रम दलवी १
हाजी हुसेन मखदुम १
हुसैन दलवी १
सेख हुसैन सेखानी १
आगा महमद १
सैद नसरुला वलद
सैद मिरां १
गोविंद कृस्णाजी
देशाई म॥ चेऊल
इभ्राइमजी देशमुख
आगसी १
रघुजी कुलकणी नागाव
आगासी
गोवरोजी चोधरी कसबे
चेऊल
महमद जाफरखान सिलोत्री खार जाफर १
आपाजी माहादाजी अदिकारी मामले मुर्तजाबाद
उर्फ चेउल हिराजी रंगाजी चिटनीस
म॥ आगसी वीत वर्तक
बालबलास रयेती
सैद इभ्राईम सैद नसरुला १
दामाजी आपाजी देशाई व देसकुलकर्णी मामले मु॥
जाद व अदिकारी तो झिराड अस्टागर पिलाजी येस प्रभु
मामले मुर्तजाबाद उर्फ चेऊल सन ३६ जुलुस मवाफीक सन हजार ११०४ सन सलास तिसैन अलफ कारणे कमालदी हुसैन व॥ शेरीफ अहमद इब्न खोजे नुरदीन सेकीन कसबे चेऊल येही येऊन अर्ज केला की मिलकत सिदी अंबर खुदावंदखानी याचे नउदर बेली व दिवेराई तों खाडाले हे जागा असे ऐसियास सिदी अंबर फौत जाहाले यावर त्याचा बेटा सिदी अबदुल अली भोगवटा करीत होते तेही फौत जाहाले यावर सिती सारा अयाल शेरीफ हबसखान बेटी सीदी अंबर खुदावंदखांनी भोगवटा करीत होते सिती सारा व शेरीफ हबसखान बेटी सीदी अंबर खुदावंदखांनी भोगवटा करीत होते सिती सारा व शेरीफ अली हबसखान हर दूजणे हयात असतां सिदी अबदला वलद सिदी अंबर हे सुरतेस होते यावर सिद्दे अबदुल अली वफात जाहाले हे खबर सिदी अबदलास जाहीर जाहाली त्याजवर हे चेवलास आले आण आपले बहिणीस व खान शेरीफ अली हबसखान यांचे बहुणेयाची मुलाकात जाहाली यावर सिती सारा व सिदी अबदला हर दुजणे मानभाई नऊदराचा भोगवटा करीत असतां येथे सिदी मशारनुले याचा शेरीफ अली हबसखान हे फौत जाहाले सिती सारा ही आपली मिलकत कमाविस भोगवटा करीत असतां त्यास पोटीं फर्जद नाही म्हणून सिदी अबदलांचा फरर्जद सिदी महमद सिदी अंबर खुदावद्खांने याचा पोता यासी बेलीची वारिसी पोहचत असे सिती सारा येही फर्जद लुत्फी केलियान याचे तर्फेन त्यास मिलकत हिसा पोहोचला कितीयेक मुदत भोगवटा करीत असत तेही फौत जाहाले यावर सिदी महमद याचे बाप सिदी अबदला याचे फर्जंद व कबिला सुरतेस होते दरम्याने फितरत जाहाली यावर त्याचे वारीस पैठण व औरंगाबाद तर्फेस गेली आहेत याची मिलकत बेली व दिवेराई बगर तामिरात खराब होती म्हणून मिलकत मार कमालदी हुसैन वा शेरीफ अहमद वारीस शेरीफ अली हबसखान याचे म्हणून तामिरात नउदर मजकूर याचें हवाले केले असे येहीं तामिरात करुन दिवाण देणे जें पडेल तें देऊन तरीके अमानत त्याचा फातियास खर्च लागेल तो करीत जाणे हे तरीकेने नउदर बेली व दिवेराई याची कमावीस करीत जाणे जे वख्ती सिदी अबर खुदावंदखानी याचे तर्फेन वारीस हाजीर होतील ते वख्ती त्याची मिलकत त्याचे हवाले करुन तौवर आम्ही तुमचे हवाले केली असे तुम्ही नउदर मजकूरची कमावीस करीत जाणे तेरीख छ ११ साबान
सदरहु पत्राचे असल अयाल खोजे अली व॥ कमालदी हुसैन इचे श्वाधीन असतां त्याचें औलाद अफलाद नाही म्हणून ते कागद जजिरे राजपुरीस तलब करुन नेले असत
N/A
References : N/A
Last Updated : February 27, 2019
TOP