शिवचरित्र - लेख ४९
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
N/Aहू नकल
श.१५८२ भाद्रपद व. १०
इ. १६६० सप्टें. १८
फरमान बमोहर अदलखान बिज्यापुरी अज करार बतारीख २२ बावीस मी माहे मोहरम सन १०६१ येक हजार येकसष्ट अरबी आक .॥१ फरमान हुमायून वतन करुन दिल्हे .॥ ता बजानब आमलान व कारकुनान व आदकारयान व देशमुखान व देशपाडान हाल व इस्तकबाल मामले बादशाहाबाद उर्फ चेऊल आक अज सुर सन इहिदे सितैन व अलफ दरी विला मुकदमी येस मेहतरी सालवी फरजंद बाल मेहतरी सालवी .॥२॥ सरकारात येऊन हकीकत जाहीर करुन अर्ज केला .॥ की मुकदमी मामले मजकूर बर हुकम बुराहान निज्यामशा खुर्दखतहाये मुलकगैर अज बुजरुगान खुद रवा बुद .॥३॥ हे मोकादम मामले मजकूर याणी बुराहान निजामशायाचे हुकमावरुन व जागाजागाचे वतनदार याचे पत्रावरुन व कुलोपार्जित वतन चालवीत आलो .॥ गोंद मेहतरी वलद राम मेहतरी साकीन पेण .॥ गैरवाजवी माळुमाती हकीकत सांगोन आपले नावाचे पत्र तकराल करुन घेतले आणि कजिया करावयास लागले .॥ इजत व सुज्यायेत दस्तगाहा मिजाजदान काराआगाह उमदे उजराये उजाम जुबदे उमराये गीराम निहंग दरयाये मर्दी व मर्दानगी गोहर का न फिरोजमंदी व फरमनगी फारस मुजमार सुज्यायेत निशारजी मैदान शाहामत शाईस्ते फिरावान आतफत व तहसीन फरावार फराशान मरहीमत व आफरीन खान आलीशान फरजंद रसीद सिपे शालार दौरान खुलासे नेकखोव्हान तिलकगीर किसवरसितान अफजलखान महमदशाई अहेवाल खातरेस आणून इनसाफ वाजवी केला पाहिजे .॥४॥ मोकादमी व बुनयाद याची मनास आणिली त्याजवरुन वतनपत्र मेहरबान होऊन करार करुन दिल्हे .॥ ता महमात मुकदमी मामले मजकूर व कसबे व पुरे व नवा कर व करके विलायत किले घेरदरक व आमूर मुकदमी ताळुक मामले म॥र व देहरे व मुशाहरे सरमाह येक पैसा व कानून व कानुनात व करपावा हरनी व गैर लवाजम बरहुकम सालाबाद मुजेब भोगवटे की दर कारकीर्द निज्यामशा व मुलगगैर .॥५॥
सदरहु बो वतनाचा भोगवटा चालत आला असे त्यावरुन भोगवटा चालता केला. ॥ बिनाबरान इलतमास मशारनिले मनास आणून मुकदमी मामले मार अज गोंद मेहतरी बिन राम मेहतरी साकीन पेण यास दूर केला ॥६॥ येस मेहतरी बिन बाल मेहतरी सालवी यास वतन मुकरर करुन दिल्हे .। व जे मुकदमी सरमाह येक पैसा मुजेब साबक मेहरनवानगी करुन करार करुन दिल्हा असे .॥७॥ मे बायेद की महमात मुकदमी मामले मार व कसबे व पुरे व नवा कर व करपावा हरनी व विलायेत किले घेरदर्क माफक कानून कदीम येस मेहतरी विन बाल मेहतरी याचे वतन जारी करीत जावे .॥८॥ सरमाहा येक पैसा रोजारोज आदा करीत जाणे मनसब मुकदमीचा हमेशगीचा मुकरर करुन दिल्हा अए तरी हरयेकविसी मदत व रयायेत व हिमायेत करीत जावे तो सुक्र सरकारकुन हररोज करीत जाईल .॥ मनसब मुकदमी बांअद याची व बअवलाद याची व अफलाद याची जारी करीत जावे हरसाल नव्या पत्राची दिकत न करणे हे वतनपत्र करार असे दरी बाब ताकीद दानंद. ॥
सदरहु हस्ताक्षर विठल पाडुरग दि॥ देशाई व देशकुलकर्णी सु. सलास समानीन मया व अलफ.
N/A
References : N/A
Last Updated : February 24, 2019
TOP