मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
दर्शनलालसा

श्रीदत्त भजन गाथा - दर्शनलालसा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. ८-८-२९
ये ये ये ये माझ्या स्वामी दत्तात्रेया । छंद मम ह्रदया लागलासे ॥१॥
कधी मी पाहिन सुंदर वदन । सुधावलोकन अनुभवीन ॥२॥
सुकुमार काया कधी आलिंगीन । दृष्टी भिडवीन त्वदृष्टीसी ॥३॥
तुझे वक्षस्थळी ठेविन मी गाल । बाळ लडिवाळ शोभेन मी ॥४॥
निजकरी तुझा कर मी धरीन । तयासी खेळेन आवडीने ॥५॥
कधी माझी आळी हेतु पुरवीसी । मज जवळि घेसी कधी देवा ॥६॥
कधी मजसवे हांससी खेळसी । गुज तूं वोलसी कधी सांग ॥७॥
लहानासम सांग कधी तूं बनसी । मजसवे क्रीडसी कधीं सांग ॥८॥
उतावीळ झालो तुजसि भेटाया । वाट दत्तात्रेया किती पाहूं ॥९॥
नटवा मज म्हण कांही मज म्हण । तूं प्रगटपण येथे धर ॥१०॥
माझे साठी येई लेकूरा जशी आई । मज झाली घाई किती सांगूं ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP