श्रीदत्त भजन गाथा - योग्याची लक्षणे
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता. २४/१०/१९२९
समाहित चित्त तोचि जाणा योगी । शोभतो बैरागी संसारी तो ॥१॥
असुनी प्रापंची विरक्ति तो भोगी । शान्ती अंतरंगी खुलवात ॥२॥
निजस्वरुपांत लीन चित्तवृत्ति । आनंद-संपत्ति निर्भर ती ॥३॥
चित्तवृत्ति स्थिर स्तब्ध ते स्फ़ुरण । सत्व आवरण तयावरी ॥४॥
रजस्तमोवृत्ति नि:शेष हरती । वृत्ति प्रकाशती सत्वरुपी ॥५॥
शुभ्रस्फ़टिकमय चित्त हे होतसे । ब्रह्म प्रकाशतसे तयालागी ॥६॥
परब्रह्मरुप चित्त त्याचे होय । होतां वृत्तिलय परात्परी ॥७॥
मन:समाधान हेच की कैवल्य । वैराग्य जाज्वल्य विकासते ॥८॥
हरीचिया भक्ता योग हा साधत । जीवनमुक्त होत हरिदास ॥९॥
विनायक म्हणे साधन परम । भक्ति अनुपम दत्तजीची ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : January 05, 2020
TOP