श्रीदत्त भजन गाथा - वासुदेवाचा धांवा
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
वासुदेवा येई येई । माझी अससि तूं आई ॥१॥
करी कृपेची पाख्रर । बोधमृतीं सोडी धार ॥२॥
तृप्त करी मज पाजोनी । बोधसुधा तूं येवोनी ॥३॥
मजवरी करी साउली । कृपेची तूं आई भली ॥४॥
निजअंकी मज घेई । झांकी मजलागी आई ॥५॥
बोधमृत धार आतां । श्रवणी सोड भगवंता ॥६॥
प्रबुद्ध करी मजलागी । येई आतां लगबगी ॥७॥
जन्म दिन तुझा पातला । उत्सवाचा असे भला ॥८॥
धरीतों मी तुझे पाय । कृपावंत होई माय ॥९॥
जन्मदिन तुझा पातला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१०॥
म्हणोनि आतां प्रगटावे । मजठायीं संचरावेम ॥११॥
चित्त माझे आनंदावे । तुझ्या ठायी रमवावे ॥१२॥
असे करी माझे आई । वासुदेव गुरुमाई ॥१३॥
विनायक तुझा बाळ । परम असे लडिवाळ ॥१४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 05, 2020
TOP