मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
व्यासपूजा ( गुरुपौर्णिमा )

श्रीदत्त भजन गाथा - व्यासपूजा ( गुरुपौर्णिमा )

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुपौर्णिमा गुरुवार ता. १०-७-१९३०

गुरुपूजनाचा दिवस मंगल । सेवन प्रेमळ स्वये घेती ॥१॥
आज साक्षात्कारे प्रगटोनी गुरु । पूजनसंभारु स्वये घेती ॥२॥
शिष्यां हाती पूजा घेवोनियां आज । कृपा महाराज करिताती ॥३॥
अनुग्रह देती थोर आशीर्वाद । होवोनी वरद निज शिष्यां ॥४॥
आज दिवसाचे महत्व अनिवार । उपमा साचार नाही नाही ॥५॥
पर्वणी हे थोर थोर कल्याणाची । पर्वणी पुण्याची पातली हे ॥६॥
प्रगटपणे सेवा घेती गुरुराज । तुष्ट महाराज आज जाणा ॥७॥
आज व्यासपूजा संन्यासी करिती । चातुर्मास राहती एक्याठाय़ी ॥८॥
आज शिष्य प्रेमे करिती गुरुपूजा । प्रसादाचे काजा ज्ञानासाठी ॥९॥
गुरुप्रसादाने ज्ञानप्राप्ति होत । क्लेश निवारत अविद्येचे ॥१०॥
धन्य पुण्य दिन आजिचा उत्तम । जे का ज्ञानकाम, साधिती ते ॥११॥
विनायक म्हणे गुरु वासुदेव । त्यांच्या पदी भाव समर्पिला ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP