मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
भीष्म प्रतिज्ञा

श्रीदत्त भजन गाथा - भीष्म प्रतिज्ञा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


भारती युद्धांत भीष्म प्रतिज्ञा करी । पाण्डवां साचारी मारीन मी ॥१॥
अपुल्या शिबिरांत बोले पितामह । कोणासी सन्देह तेव्हां पडे ॥२॥
दूतमुखे वार्ता ऐकतां श्रवणी । कोणा अंत:करणी पीडा झाली ॥३॥
कोण गडबडला पाण्डवांचे साठी । सांग जगजेठी तुजवीण ॥४॥
कोणें द्रौपदीसी भीष्मपदांवरी । नेउनी शिबिरी घातले बा ॥५॥
विचारितां तये गडी दौपदींचा । कोण अशि वाचा बोलियेला ॥६॥
सांडुनियां लाज झालासि चाकर । भक्तांचा साचार दत्तात्रेया ॥७॥
विनायक म्हणे माझा अभिमान । कोण दयाघन तुजवीण ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP