श्रीदत्त भजन गाथा - दत्तभक्ताची स्थिति
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
शांतिसुखे अनुभवी । प्रीति ज्याची दत्तदेवी ॥१॥
निर्विकार मन होय । वृत्ति त्याची पावे लय ॥२॥
आपणाठायींच रमे । भूक तहान त्याची शमे ॥३॥
न जेवितां जेविला । उपभोगित तृप्तिला ॥४॥
सकळ लाभत्यासी झाले । मिळायाचे नाही उरले ॥५॥
अंकुर सारे मावळले । प्रत्यय विरोनियां गेले ॥६॥
दत्तात्मक विश्व झाले । दत्तरुप प्रगटले ॥७॥
आनंदासी सीमा नाही । निवृत्त होई लवलाही ॥८॥
विनायक म्हणे कृपा । थोर केली मायबापा ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : January 05, 2020
TOP