मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
देवांचा वसंत महोत्सव

श्रीदत्त भजन गाथा - देवांचा वसंत महोत्सव

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


शिखी केका गाती पिसारा करिती । औत्कण्ठ्ये नाचती रसभरे ॥१॥
हरिणशावके कौतुके क्रीडती । नेत्र विस्तारिती प्रमोदित ॥२॥
कस्तूरीच्या वासे मोहित वन्यमृग । डुलताती दंग होवोनियां ॥३॥
सांडिती कस्तूरी सुवासे भरिती । वनश्री ती अति तयाकाळी ॥४॥
वनदेवतांचा नटोनियां मेळा । वसंत सोहळा आरंभिती ॥५॥
पुष्पांची बसने साजही पुष्पांचे । टोप सुमनांचे सेविताती ॥६॥
पुष्पांनी नटोनी थटोनी फ़ुलोनी । देवाचे सेवनी रत होती ॥७॥
कुसुम-संभार वरोनि हर्षती । देवासी स्नपिती पुष्पजले ॥८॥
पुष्पांचे आसन शय्या ही पुष्पांची । वसने पुष्पांची अर्पिताती ॥९॥
पुष्पे भूषविती देवाचे शरीर । पुष्पमधुसार पाजिताती ॥१०॥
घालिती प्रदक्षिणा देव यश गाती । चरण चुरिती मृदुकरे ॥११॥
देवाचिये अंगी उटी कुसुमांची । कौशल्ये लाविती सुकुमारा ॥१२॥
कोणी घेती पंखा विणला पुष्पांचा । घालिताती साचा मंदवारा ॥१३॥
विनायक म्हणे वसंत महोत्सव । सेवितसे देव निज इच्छे ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP